आम आदमी पार्टीचे नेते सौरभ भारद्वाज, सत्येंद्र जैन यांच्या अडचणी वाढणार!
आम आदमी पार्टीच्या दोन माजी मंत्र्यांवर कारवाई होणार आहे. माजी आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज आणि सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध हजारो कोटींच्या रुग्णालय घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी दिल्ली सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेला (एसीबी) मान्यता मिळाली आहे.