Dr. Mohan Bhagwat : संघ सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??; कानपिचक्या की सूचना??
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??, असा परखड सवाल करून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संवादामध्ये उपस्थित असलेल्या सगळ्यांची आणि प्रश्नकर्त्यांची फिरकी घेतली. संघ संवादात तिसऱ्या दिवशी मोहन भागवत यांनी अनेक सवालांची स्पष्ट उत्तरे दिली. त्यापैकीच एक सवाल संघ आणि भाजप यांच्या संबंधांमधला होता. भाजपच्या सगळ्या गोष्टी संघच ठरवत असतो, असे एक विधान त्या सवालात होते.