द फोकस एक्सप्लेनर : Waqf Bill वक्फ विधेयकावर मुस्लिम संघटनांचा आक्षेप, पण अडचण नेमकी काय? वाचा सविस्तर
ईदनंतर चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक Waqf Bill मांडले जाऊ शकते. हे सत्र ४ एप्रिलपर्यंत सुरू राहील.
ईदनंतर चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक Waqf Bill मांडले जाऊ शकते. हे सत्र ४ एप्रिलपर्यंत सुरू राहील.
काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी औरंगजेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना केल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत प्रचंड संताप व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत एनटीटी डेटा ‘गेटवे टू द वर्ल्ड’ कार्यक्रम मुंबई येथे संपन्न झाला. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्यानमार, मलेशिया, भारत आणि सिंगापूर (MIST) यांना जोडणाऱ्या पाण्याखालील केबल यंत्रणेचा शुभारंभ केला.
सोमवारी, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने (AIMPLB) वक्फ दुरुस्ती विधेयकाविरुद्ध जंतरमंतरवर निदर्शने केली. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्याव्यतिरिक्त शेकडो लोक त्यात सहभागी झाले होते.
नागपुरातले औरंगजेब समर्थक दंगलखोर भालदार पुऱ्यातून महाल भागात घुसले. आधी त्यांनी सीसीटीव्ही फोडले. त्यानंतर दगडफेक आणि जाळपोळ केली.
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. पाच पैकी तीन जागांसाठी भाजपने काल उमेदवार जाहीर केले होते. आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेनेने चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने संजय खोडके यांच्या नावाची घोषणा केली.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सोमवारी विधानसभेत घोषणा केली की त्यांचे सरकार राज्यातील ओबीसी (इतर मागासवर्गीय) आरक्षण मर्यादा २३% वरून ४२% पर्यंत वाढवणार आहे. जर ते लागू झाले तर राज्यात आरक्षण मर्यादा ६२% पर्यंत वाढेल. हे सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेल्या ५०% आरक्षण मर्यादेचे उल्लंघन करेल. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने ओबीसी कोटा वाढवण्याचे आश्वासन दिले होते.
शिक्षकाने शाळेत विद्यार्थ्यावर केलेल्या कारवाईच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यापूर्वी आधी त्याची चौकशी व्हावी, असे केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती पी.व्ही. कुन्हिकृष्णन म्हणाले, दुर्भावना न बाळगता केलेल्या शिक्षेसाठी शिक्षकांचा गुन्हेगारी प्रकरणापासून बचाव केला पाहिजे. न्यायालयाने केरळच्या पोलिस महासंचालकांना यासंबंधी एक परिपत्रक काढण्याचे निर्देश दिले. ते एक महिन्यात लागू करण्याचेही आदेश दिले.
अहमदाबादमध्ये एका बंद फ्लॅटमधून ९५.५ किलोग्रॅम सोने व ६० लाख रुपये रोकड जप्त करण्यात आले.
नागपूर मध्ये Nagpur औरंगजेबाच्या कबरी विरोधात विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केले.
अमेरिकेत, अर्कांसस, कॅन्सस, मिसूरी, इलिनॉयसह सुमारे 6 पश्चिमेकडील राज्ये चक्रीवादळाच्या विळख्यात आहेत. एबीसीच्या अहवालानुसार, या राज्यांमध्ये आतापर्यंत २६ वादळे आली आहेत.
अमेरिकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रशासन सत्तारूढ झाल्यानंतर ट्रम्प यांनी जी अनेक कठोर पावले उचलली
अमृतसरच्या खंडवाला परिसरात असलेल्या ठाकुरद्वारा मंदिरावर मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्याचा भाजपने तीव्र निषेध केला आहे. केंद्रीय यंत्रणांकडून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने पाकिस्तानमध्ये ट्रेन हायजॅक केल्यानंतर, आता तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) देखील पाकिस्तानमध्ये हल्ल्यांची धमकी देत आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले आहेत की, जे लोक त्यांच्याविरुद्ध अपशब्द वापरतील त्यांना ‘रस्त्यावर नागडे करून फिरवले जाईल आणि मारहाण केली जाईल’. राज्यात दोन महिला पत्रकारांना अटक झाल्यानंतर रेड्डी यांचे हे विधान आले आहे. त्यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप आहे.
सध्या आपल्या देशात अनेक योजना सुरू आहेत, ज्यामध्ये राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा समावेश आहे. जर तुम्ही यापैकी कोणत्याही योजनेसाठी पात्र असाल, तर तुम्ही अर्ज करू शकता आणि त्या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकता.
महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे महिमा मंडन होईल. क्रूर औरंगजेबाच्या पाशवी विचारांचे महिमा मंडन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल
एका पत्रकाराचा माइक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर आदळला. या घटनेचा व्हिडिओ चर्चेत आहे. १४ मार्च (शुक्रवार) रोजी जॉइंट बेस अँड्र्यूज येथे पत्रकार परिषदेदरम्यान ही घटना घडली. यानंतर, ट्रम्प पत्रकाराशी विनोदी पद्धतीने बोलताना दिसले.
काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णम पक्ष सोडल्यापासून काँग्रेस आणि राहुल गांधींसह सर्व विरोधी पक्षांना सतत लक्ष्य करत आहेत. आता त्यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी आणि शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर मोठा हल्लाबोल केला आहे. संजय राऊत आणि राहुल गांधी भारत तोडून दुसरा पाकिस्तान निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केला आहे.
भारतासह सगळ्या जगात दहशतवाद एक्सपोर्ट करणाऱ्या पाकिस्तानने Pakistan बलुच आंदोलनाची एवढी हाय खाल्ली की आता बलुचिस्तानच्या सरकारने पेशावर मध्ये खेळण्यातल्या बंदुकांवरही बंदी घातली.
झारखंडमधील खुंटी जिल्ह्यातील पोलिसांनी रविवारी बंदी घातलेल्या पीएलएफआय (पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडिया) या संघटनेच्या तीन नक्षलवाद्यांना अटक केली, जे १३ वर्षांपासून हवे होते. यामध्ये बिरसा नाग उर्फ बिरसा मुंडा, टीनू नाग उर्फ सीनु मुंडा आणि फगुआ मुंडा यांचा समावेश आहे. हे तिघेही खुंटी जिल्ह्यातील सोयको पोलिस स्टेशन हद्दीतील अयुबहातु गावातील रहिवासी आहेत.
अजितदादांना मुख्यमंत्री करायची त्यांच्या शिलेदारांची घाई, पण फडणवीस सरकारच पाच वर्षे टिकण्याची अजितदादांना विधानसभेत द्यावी लागली ग्वाही!
भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटले आहे की, भारताचे आंतरराष्ट्रीय स्थान आता अधिक सक्रिय आणि मजबूत झाले आहे. त्यांनी यावर भर दिला की २०१५ मध्ये परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्या ऐतिहासिक विधानानंतर, भारताचे उद्दिष्ट संतुलित शक्तीऐवजी एक प्रबळ शक्ती म्हणून स्वतःला स्थापित करणे आहे.
केंद्रातील मोदी सरकारने चंद्रावर संशोधन करण्यासाठी भारताच्या महत्त्वाकांक्षी मिशन चांद्रयान-५ ला मान्यता दिली आहे. सरकारने अलिकडेच हा मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी ही माहिती दिली आहे. यासोबतच, भारताचे चांद्रयान-४ अभियान कधी सुरू होणार याची माहितीही समोर आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी म्हटले की, भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने बोडो करारावर स्वाक्षरी केली, तेव्हा काँग्रेसने त्याची खिल्ली उडवली होती, परंतु या करारामुळे या प्रदेशात शांतता आणि विकास झाला आहे. आसाममधील कोक्राझार येथे ऑल बोडो स्टुडंट्स युनियन (ABSU) च्या ५७ व्या वार्षिक परिषदेला संबोधित करताना शहा बोलत होते.