• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 17 of 1313

    Pravin Wankhade

    OBC Mahasangh : ओबीसी महासंघाचा मराठा आरक्षणाला विरोध:नागपुरात साखळी उपोषण सुरू; मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास नकार

    मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. नोंदी मिळालेल्या ५४ लाख मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची त्यांची मागणी आहे. ते पाहता सरकार दबावात निर्णय घेण्याची भीती ओबीसी समाजात आहे. मात्र दबावात येऊन निर्णय घेतल्यास वा तसे दिसल्यास आम्हीही आंदोलनाची तीव्रता वाढवू, असा रोखठोक इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी माध्यमांशी बोलताना दिला. सरकारने कुणबी आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न केल्यास आम्हीही मुंबईत धडकू, असा सज्जड इशाराही तायवाडे यांनी यावेळी दिला.

    Read more

    Uddhav Thackeray : मराठा आरक्षण आंदोलनाला आता उद्धव ठाकरे यांची खुलेआम मदत

    मुंबई ते आझाद मैदानात मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करीत असलेल्या मराठा बांधवांना शक्य तितकी मदत करा असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू आहे. सध्या सरकार त्यांच्या उपोषणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. अशामध्ये अनेक पक्षांचे नेते हे त्यांची भेट घेत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीदेखील मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी दानवे यांनी मनोज जरांगे यांची पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा करून दिली. यानंतर स्वतः मनोज जरांगे यांनी याबाबत माहिती दिली.

    Read more

    Mohan Bhagwat मोहन भागवतांचा संदेश : मोदींचं नेतृत्व २०२९ पर्यंत सुरक्षित

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये ७५ वर्षांचे होणार आहेत. अशावेळी “ते बाजूला होणार का?

    Read more

    मराठा आरक्षणाचा विषय शरद पवारांनी घातला केंद्र सरकारच्या गळ्यात; अजितदादा म्हणाले, मला जायला लावू नका खोलात!!

    मराठा आरक्षणाचा विषय शरद पवारांनी घातला केंद्र सरकारच्या गळ्यात; अजितदादा म्हणाले, मला जायला लावू नका खोलात!! असे काका – पुतण्याचे राजकारण आज रंगले.

    Read more

    Gujarat : गुजरातेत माजी आमदार, IPS सह 14 जणांना जन्मठेप; सुरतेत बिल्डरचे अपहरण करून 12 कोटींचे बिटकॉइन ट्रान्सफर केले

    २०१८ च्या बिटकॉइन दरोडा आणि अपहरण प्रकरणात अहमदाबाद शहर सत्र न्यायालयाच्या एसीबी न्यायालयाने शुक्रवारी निकाल दिला. भाजपचे माजी आमदार नलिन कोटाडिया, अमरेलीचे माजी एसपी जगदीश पटेल, माजी पोलिस निरीक्षक अनंत पटेल यांच्यासह १४ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

    Read more

    Droupadi Murmu : जिनपिंग यांच्या गुप्त पत्रामुळे भारत-चीन संबंध सुधारल्याचा दावा; राष्ट्रपती मुर्मू यांना लिहिले- ट्रम्पच्या टॅरिफमुळे आम्हाला त्रास

    या वर्षी मार्चमध्ये जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनविरुद्ध व्यापार युद्ध सुरू केले तेव्हा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक गुप्त पत्र लिहिले.ब्लूमबर्गच्या एका अहवालात हा दावा करण्यात आला आहे. या पत्राद्वारे त्यांनी दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याच्या शक्यतांचा शोध घेतला होता. त्यानंतरच दोन्ही देशांमधील संबंध सुधारू लागले.

    Read more

    Amit Shah : गृहमंत्री शहा म्हणाले- पंतप्रधानांना जेवढी शिवीगाळ कराल तितके कमळ फुलेल; राहुल यांना थोडीही लाज असेल तर मोदीजींची माफी मागावी

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसाममध्ये पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईला शिवीगाळ केल्याबद्दल काँग्रेसवर निशाणा साधला. ते शुक्रवारी गुवाहाटीमध्ये म्हणाले- बिहारमध्ये काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या आईला शिवीगाळ केली. त्यांच्या घाणेरड्या प्रयत्नांवरून मला कळते की त्यांना जनतेचा पाठिंबा नाही.

    Read more

    Mahua Moitra : महुआ मोईत्रा पुन्हा बरळल्या, अमित शहांचे डोके कापण्याची भाषा, भाजपचा पलटवार- तृणमूलची हिंसक संस्कृती

    पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या खासदार महुआ मोईत्रा यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर वादग्रस्त विधान केले आहे. शुक्रवारी नादिया जिल्ह्यातील घुसखोरीच्या मुद्द्यावर त्यांनी म्हटले की सीमा सुरक्षेची जबाबदारी गृह मंत्रालयाची आहे. जर घुसखोरी होत असेल तर अमित शहा यांचे डोके कापून टेबलावर ठेवले पाहिजे.

    Read more

    जरांगेंच्या आंदोलनाला नाशकातून मुस्लिमांचा पाठिंबा; पाठविल्या 2500 भाकऱ्या!!

    मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मनोज जरांगे यांनी ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन सुरू केले. मनोज जरांगे यांचं आझाद मैदानावरील उपोषण आणखी एका दिवसासाठी सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली.

    Read more

    मोदींना गुंडाळायचे ट्रम्पचे प्लॅन फसले; भारताबरोबरचे संबंध बिनसले!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुंडाळायचे डोनाल्ड ट्रम्प यांचे प्लॅन फसले. त्यामुळे भारताबरोबरचे अमेरिकेचे संबंध बिनसले, याची कबुली अमेरिकन अधिकाऱ्याने दिल्याची बातमी न्यूयॉर्क टाइम्सने दिली.

    Read more

    Surat Court : सहमतीच्या संबंधांनंतर लग्नास नकार हा बलात्कार नाही; सुरत सत्र न्यायालयाने म्हटले- मुलीने हॉटेलमध्ये ओळखपत्र दिले, त्यामुळे जबरदस्ती झाली नाही

    लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अनेक वेळा बलात्कार केल्याच्या तक्रारीच्या सुनावणीदरम्यान सुरत सत्र न्यायालयाने गुरुवारी आरोपीला निर्दोष सोडले. न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, सहमतीने शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लग्न करण्यास नकार देणे हा बलात्काराचा गुन्हा नाही.

    Read more

    Mukesh Ambani : जिओचा IPO पुढील वर्षी जूनपर्यंत येणार; रिलायन्स इंटेलिजेंस नवीन कंपनी बनणार, 48 व्या वार्षिक बैठकीत घोषणा

    रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत, अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी जिओच्या आयपीओची घोषणा केली. त्यांनी सांगितले की हा आयपीओ पुढील वर्षी जूनपर्यंत येईल. हा आयपीओ जागतिक स्तरावर शेअरधारकांसाठी मूल्य अनलॉक करेल.

    Read more

    Trump Administration : ट्रम्प प्रशासनाची शिकागोत सैन्य तैनातीचा इशारा; म्हटले- दिल्लीपेक्षा 15 पट जास्त हत्या झाल्या, कठोर पावले उचलणे आवश्यक

    वॉशिंग्टन डीसी आणि लॉस एंजेलिसमध्ये नॅशनल गार्ड तैनात केल्यानंतर, ट्रम्प प्रशासनाने आता शिकागोमध्येही असेच करण्याची धमकी दिली आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, शिकागोमधील हिंसाचाराची परिस्थिती खूपच गंभीर आहे. त्या म्हणाल्या की, शिकागोमध्ये हत्येचे प्रमाण नवी दिल्लीपेक्षा १५ पट जास्त आहे. शहराच्या भल्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे.

    Read more

    तामिळनाडूत आरक्षण वाढू शकते, तर महाराष्ट्रात का नाही??, आधी मराठा आरक्षणाला वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या शरद पवारांचा सवाल!!

    महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या पण त्यापैकी एकाही वेळा मराठा आरक्षणाचे समर्थन न केलेल्या त्याचबरोबर मराठा आरक्षण न दिलेल्या शरद पवारांनी आज अचानक घुमजाव करून मराठा आरक्षणाची बाजू घेतली.

    Read more

    India Japan : जपानच्या रॉकेटद्वारे प्रक्षेपित केले जाईल चांद्रयान-5; भारत-जपान संयुक्तपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा अभ्यास करतील

    पंतप्रधान मोदी शुक्रवारी जपानच्या २ दिवसांच्या दौऱ्यावर आले. यादरम्यान त्यांनी टोकियो येथे झालेल्या भारत-जपान संयुक्त आर्थिक मंचाच्या बैठकीला संबोधित केले.त्यांनी आपल्या भाषणात भारताला गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणून वर्णन केले. जगाच्या नजराच नव्हे तर त्यांचा विश्वासही भारतावर आहे असे ते म्हणाले.

    Read more

    Rupee : रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर; अमेरिकी टॅरिफमुळे डॉलरच्या तुलनेत रुपया 64 पैशांनी घसरून 88.29 वर

    शुक्रवारी (२९ ऑगस्ट) भारतीय रुपया पहिल्यांदाच ८८ रुपयांच्या प्रति डॉलरच्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर घसरला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की रुपयातील ही घसरण अमेरिकेने भारतावर लादलेल्या शुल्कामुळे झाली आहे

    Read more

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा सरकारला प्रश्न- सीमेवर भिंत बांधायची आहे का? शेजारील देशांमध्ये आपल्यासारखेच बंगाली-पंजाबी भाषिक

    सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला विचारले की, त्यांना भारतीय सीमेवर अमेरिकेसारखी भिंत बांधायची आहे का? पश्चिम बंगाल स्थलांतरित कल्याण मंडळाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही टिप्पणी केली.

    Read more

    BJP Protests : राहुल गांधी-तेजस्वी यादवांच्या पुतळ्यांचे दहन; PM मोदींबद्दल वापरलेल्या अपशब्दाचा भाजपकडून निषेध

    जमुई येथे शुक्रवारी भाजप युवा मोर्चाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आई यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष अभिषेक सिंह यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढला. काँग्रेस कार्यालयाबाहेर राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांचे पुतळे जाळण्यात आले.

    Read more

    Russian Attack : रशियन हल्ल्यात युक्रेनचे सर्वात मोठे जहाज नष्ट; पहिल्या सागरी ड्रोनने हल्ला केला

    रशियन संरक्षण मंत्रालयाचा हवाला देत स्पुतनिक वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे की, गुरुवारी रशियन कट्रान सागरी ड्रोन हल्ल्यात युक्रेनियन नौदलाचे सर्वात मोठे जहाज सिम्फेरोपोल बुडाले.

    Read more

    Pakistani Minister : पाकिस्तानी मंत्री म्हणाले- भारत पाण्याला शस्त्र बनवतोय; जाणूनबुजून पाणी सोडले, ज्यामुळे पूर आला

    पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारमधील मंत्री अहसान इक्बाल यांनी भारतावर पाण्याचा वापर शस्त्र म्हणून करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, भारताने जाणूनबुजून आपल्या धरणांमधून पाणी सोडले, ज्यामुळे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात भीषण पूर आला.

    Read more

    Israeli : इस्रायली हवाई हल्ल्यात हुथी बंडखोरांचे पंतप्रधान ठार; संरक्षणमंत्र्यांचाही मृत्यू झाल्याची शक्यता

    येमेनची राजधानी सना येथे इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात हुथी बंडखोरांचे पंतप्रधान अहमद अल-राहवी यांचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या हल्ल्यांमध्ये हुथी संरक्षण मंत्री मोहम्मद अल-अती आणि चीफ ऑफ स्टाफ मोहम्मद अब्द अल-करीम अल-घमारी यांनाही लक्ष्य करण्यात आले होते, ज्यांचा मृत्यु झाल्याची भीती आहे.

    Read more

    PM Modi : पीएम मोदींचा जपान दौरा, जपान 10 वर्षांत भारतात 6 लाख कोटींची गुंतवणूक करणार, आराखडा तयार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की जपानी तंत्रज्ञान आणि भारतीय प्रतिभा या पॉवरहाऊसमध्ये जग बदलण्याची क्षमता आहे. दोन्ही देश कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सेमीकंडक्टर, क्वांटम कॉम्प्युटिंग, बायोटेक व अवकाश क्षेत्रात क्रांती घडवण्यास सक्षम आहेत. शुक्रवारी दोन दिवसांच्या जपान दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींनी अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला.

    Read more

    Despite Trump : ट्रम्पच्या टॅरिफच्या धमकी नंतरही भारतीय अर्थव्यवस्थेचे ‘अच्छे दिन’ सुरूच, जीडीपी 7.8 टक्क्यांवर

    अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावून दबाव आणण्याचा प्रयत्न केला असला तरी भारतीय अर्थव्यवस्थेच्या गाड्या वचा वेग कमी झालेला नाही. एप्रिल-जून 2025 तिमाहीत भारताचा सकल देशांतर्गत उत्पन्न (GDP) तब्बल 7.8 टक्क्यांवर पोहोचला असून, मागील पाच तिमाहीतील हा सर्वोच्च आकडा ठरला आहे.

    Read more

    Rahul Gandhi : राहुल गांधी पुन्हा तोंडावर पडले, बिहारमधील गावकऱ्यांनी उघड केला खोटा दावा

    बिहार विधानसभा निवडणुका जवळ येत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आणखी एक आरोप फोल ठरला आहे. त्यांनी असा दावा केला होता की गया जिल्ह्यातील निडाणी गावात एका घराच्या पत्त्यावर तब्बल ९४७ मतदार नोंदवलेले आहेत. हा आरोप सोशल मीडियावर जोरदार पसरला. मात्र, प्रत्यक्ष गावकऱ्यांनी आणि निवडणूक आयोगानेच त्यांचा दावा खोडून काढत सांगितले की हा आरोप दिशाभूल करणारा आहे.

    Read more

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड

    पश्चिम बंगालमध्ये घुसखाेरांना आश्रय देण्याचे काम तृणमूल काॅंग्रेस करत असल्याचे उघड सत्य आहे. मात्र, त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जबाबदार धरून . “गृहमंत्री अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवले पाहिजे,” असे वक्तव्य तृणमूल काॅंग्रेसच्या खासदार महुआ माेइत्रा यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झाेड उठली आहे.

    Read more