Tahawwur Rana : तहव्वुर राणाला भारतात आणण्याचा मार्ग झाला मोकळा!
२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. याचे कारण असे की अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राणाची याचिका फेटाळून लावली आहे, ज्यामध्ये त्याने प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या सूचनेद्वारे हा निर्णय देण्यात आला.