Bengal : बंगालमध्ये हिंसाचारग्रस्त भागांमधून हिंदूंचे पलायन; भाजपची अफस्पा लावण्याची मागणी, बीएसएफच्या 5 तुकड्या तैनात
वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसक आंदोलनात मोठ्या प्रमाणात लोक हिंसाचारग्रस्त भागातील आपले घर सोडत आहेत. बंगाल विधानसभेत विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वर सांगितले की, कट्टरपंथीयांच्या भीतीमुळे मुर्शिदाबादच्या धुलियानहून ४०० पेक्षा जास्त हिंदू नदीपार करून लालपूर हायस्कूल, देवनापूर- सोवापूर हायस्कूल, देवनापूर जीपी, बैसनबनगर, मालदामध्ये आश्रय घेणे भाग पडत आहे.