• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 153 of 1475

    Pravin Wankhade

    Netanyahu : दोहा हल्ल्याबद्दल नेतन्याहू यांनी कतारची माफी मागितली; ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधून फोन केला

    दोहा हल्ल्याबद्दल इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी कतारची माफी मागितली आहे. त्यांनी सोमवारी कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल-थानी यांना फोन केला, असे रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.

    Read more

    ओला दुष्काळ मॅन्युअल मध्ये नाही, पण शेतकऱ्यांच्या दुष्काळी निकषांमधली सगळी मदत देऊ; मुख्यमंत्री फडणवीसांचा शब्द!!

    ओला दुष्काळ मॅन्युअल मध्ये नाही. पण शेतकऱ्यांना दुष्काळी निकषांमध्ये सगळी मदत देऊ. तिच्यात हयगय होणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला.

    Read more

    Tomahawk : अमेरिका युक्रेनला टॉमहॉक क्षेपणास्त्रे देऊ शकते; 800 किमी वेगाने मॉस्कोला धडकण्याची क्षमता

    ट्रम्प प्रशासन युक्रेनला टॉमहॉक क्षेपणास्त्रे पुरवण्याचा विचार करत आहे, अशी घोषणा अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हॅन्स यांनी रविवारी केली. टॉमहॉक क्षेपणास्त्रांची रेंज २५०० किमी आहे. जर युक्रेनला ही क्षेपणास्त्रे मिळाली, तर ते रशियाची राजधानी मॉस्कोला लक्ष्य करू शकते.

    Read more

    India-Bhutan : भारत-भूतानदरम्यान पहिल्यांदाच रेल्वे धावणार; दोन राज्यांना शेजारील देशाशी जोडणार

    भारत आणि भूतान दरम्यान पहिल्यांदाच रेल्वे सेवा सुरू होत आहे. यासाठी दोन रेल्वे मार्ग टाकण्याची घोषणा करण्यात आली आहे.परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, हे रेल्वे मार्ग आसाममधील कोक्राझार ते भूतानमधील गेलेफू आणि पश्चिम बंगालमधील बनारहाट ते भूतानमधील समत्से पर्यंत टाकले जातील.

    Read more

    Sabarimala Temple : केरळच्या सबरीमाला मंदिरातून चोरीला गेलेले 4 किलो सोने सापडले; ज्याने चोरीची तक्रार केली, त्याच व्यक्तीच्या बहिणीच्या घरात आढळले

    केरळमधील शबरीमला मंदिरातून गायब झालेले चार किलो सोने २७ सप्टेंबर रोजी सापडले. केरळ उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या त्रावणकोर देवस्वोम बोर्डाच्या (टीडीबी) दक्षता शाखेने वेंजरमुडू परिसरातून ते सोने जप्त केले.

    Read more

    X Challenges : कर्नाटक हायकोर्टाचा आदेशाला आव्हान देणार X; लिहिले – हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला

    एलन मस्क यांची कंपनी आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) ने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अलिकडच्या आदेशावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. एका पोस्टमध्ये एक्सने लिहिले आहे की हा आदेश पोलिस अधिकाऱ्यांना गुप्त ऑनलाइन पोर्टलद्वारे मनमानीपणे सामग्री काढून टाकण्याचे आदेश जारी करण्यास सक्षम करतो.

    Read more

    60 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत दिवाळीच्या आत!!

    महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे तब्बल 60 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अजून नुकसानीच्या सर्व प्रकारच्या डेटाचे वर्गीकरण व्हायचे आहे.

    Read more

    मध्य प्रदेशात मदरशांमध्ये 500 पेक्षा जास्त हिंदू मुलांचे धर्मांतर करायचे कारस्थान उघडकीस; राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे सरकारला कठोर कारवाईचे निर्देश

    मध्य प्रदेशात भाजपचे सरकार असताना तिथल्या मदरशांमध्ये 500 पेक्षा जास्त हिंदू मुलांचे धर्मांतर करायचे कारस्थान उघडकीस आले आहे.

    Read more

    कर्करोगाच्या उपचारासाठी फडणवीस सरकारचे सर्व समावेशक धोरण जाहीर; त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा निश्चित

    महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारने राज्याचे सर्वसमावेशक कर्करोग उपचार धोरण जाहीर केले असून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने त्याचे तपशील सादर केले त्याला मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली.

    Read more

    Trump : ट्रम्प यांनी परदेशी चित्रपटांवर 100% टॅरिफ लादला; म्हणाले- जसे मुले चॉकलेट चोरतात, तसे इतर देशांनी आपला उद्योग चोरला

    अमेरिकेने आता परदेशी चित्रपटांवरही १००% टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोमवारी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ट्रुथ सोशलवर ही घोषणा केली. त्यांनी म्हटले की, अमेरिकन चित्रपट उद्योग परदेशी कंपन्यांनी “चोरला” आहे. हे एखाद्या मुलाने चॉकलेट चोरल्यासारखे आहे.

    Read more

    बिहारची निवडणूक वाऱ्यावर; राहुल गांधी दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर!!

    बिहारची निवडणूक वाऱ्यावर सोडून राहुल गांधी दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर निघून गेलेत. दक्षिण अमेरिकेतल्या कोलंबियात बोगाटाला पोहोचण्याचा व्हिडिओ स्वतः राहुल गांधींनीच आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केला.

    Read more

    Owaisi : असदुद्दीन ओवैसी म्हणाले- “फक्त पोस्टर नको, मोहम्मद यांचे विचारही मनात ठेवा”

    कोल्हापूर येथे एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मोठी सभा घेतली. या सभेत त्यांनी भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर राजकीय नेत्यांवर जोरदार टीका केली. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी

    Read more

    PM Modi : मोदींनी दिल्लीतील नवीन भाजप कार्यालयाचे उद्घाटन केले; म्हणाले- भाजपच्या स्थापनेला 45 वर्षे पूर्ण

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संध्याकाळी दिल्ली भाजपच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले. ते म्हणाले, “भाजपच्या स्थापनेला ४५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ज्या बीजापासून आज भाजप एवढ्या मोठ्या वटवृक्षात वाढला आहे, ते ऑक्टोबर १९५१ मध्ये रोवले गेले होते. त्यावेळी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली जनसंघाची स्थापना झाली.”

    Read more

    Udayanraje Bhosale : खासदार उदयनराजे भोसले यांचा ऐतिहासिक निर्णय- साताऱ्याचा शाही दसरा यंदा साधेपणाने; उत्सवाचा खर्च पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार

    पूरग्रस्तांच्या मदतीसाठी यंदाचा ऐतिहासिक शाहू नगरीतील अर्थात सातारा शहरातील शाही दसरा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतला आहे. तसेच समाजहित लक्षात घेऊन दसरा उत्सवासाठी होणाऱ्या खर्चाची रक्कम पूरग्रस्तांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.

    Read more

    Gavai family : आरएसएसच्या विजयादशमी निमंत्रणावरून गवई कुटुंबात वाद

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विजयादशमी सोहळ्यासाठी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलताई गवई यांना आमंत्रण देण्यात आले होते. यावरून आता गवई कुटुंबात मोठा वाद उभा राहिला आहे.

    Read more

    Eknath Shinde : बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; पूरस्थितीमुळे परीक्षा अर्ज भरण्यास 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

    राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि त्यामुळे मराठवाडा, नाशिक, सोलापूर, अहिल्यानगरसह इतर भागांमध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे बारावी बोर्डाच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य परीक्षा मंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

    Read more

    LPG Gas : मोबाईल नंबरप्रमाणे गॅस कंपनीही बदलता येणार; सध्या फक्त डीलर बदलण्याची सुविधा

    लवकरच तुम्ही मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीप्रमाणेच तुमचे गॅस कनेक्शन कोणत्याही कंपनीला स्विच करू शकाल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने (पीएनजीआरबी) यासाठी तयारी सुरू केली आहे. यामुळे ग्राहकांना अधिक पर्याय मिळतील आणि सेवा सुधारतील.

    Read more

    Revenue Minister Bawankule : वेळप्रसंगी निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत करू; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आश्वासन

    गत पन्नास वर्षात शेतकऱ्यांचे पावसामुळे जेवढे नुकसान झाले नसेल तेवढे नुकसान राज्यात सप्टेंबर अखेरपर्यंत झालेल्या पावसाने झाले आहे. मराठवाड्यासह राज्यातील अनेक भाग उध्वस्त झाले आहेत. राज्याच्या प्रत्येक भागात शासन शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करत आहे. या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळप्रसंगी ड्रोनच्या सहाय्याने व याचबरोबर प्रत्यक्ष पंचनाम्याच्या माध्यमातून अधिकाधिक मदत केली जाईल, असे सांगितले आहे. आम्ही वेळप्रसंगी निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत करू, असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

    Read more

    MLA Satej Patil : आमदार सतेज पाटील म्हणाले- असदुद्दीन ओवेसींचा ध्रुवीकरणाचा अजेंडा; कोल्हापूरचे वातावरण बिघडवण्याचे काम करू नये

    एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी आज, 29 सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्यांच्या या दौऱ्याला हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. ओवेसी हे भडकाऊ भाषणे करतात, त्यामुळे ऐन नवरात्र उत्सवाच्या काळात त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमांना परवानगी देऊ नये, अशी मागणी या संघटनांनी केली आहे.

    Read more

    CM Fadnavis : अहिल्यानगरात रांगोळीवरून तणाव; सीएम फडणवीस म्हणाले- सामाजिक आरोग्य बिघडवणाऱ्यांचा शोध घेऊन कठोर शासन करणार

    राज्याचे सामाजिक आरोग्य बिघडवणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर येथील धार्मिक मुद्यावरून निर्माण झालेल्या तणावाववर भाष्य करताना म्हटले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत अहिल्यानगर प्रकरणात कडक कारवाई होणार हे स्पष्ट झाले आहे.

    Read more

    कमलताई गवई संघाच्या कार्यक्रमाला राहणार हजर; राजेंद्र गवई यांनी दूर केला सगळा गैरसमज!!

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्षाच्या विशेष कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणे संदर्भात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री डॉक्टर कमलताई गवई हजर राहण्यावरून निर्माण झालेल्या गैरसमज दूर झाला

    Read more

    Russia’s Lavrov : रशियाचे परराष्ट्र मंत्री म्हणाले- भारत स्वतःचे मित्र स्वत: निवडतो, अमेरिकेला व्यापार वाढवायचा असेल तर त्यांच्याशी चर्चा करावी

    रविवारी संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) ८० व्या सत्रादरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह म्हणाले, ‘भारतीय पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की भारत आपले भागीदार देश स्वतः निवडतो.’

    Read more

    महिलांच्या आत्मरक्षणासाठी यवतमाळ पोलिसांचा पुढाकार; तब्बल 6000 हजार विद्यार्थिनींना कराटेचे प्रशिक्षण

    राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच महाराष्ट्रातले पोलीस वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेत असतात. त्यामध्ये ते प्रामुख्याने महिला, मुले यांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य देत असतात. महिलांच्या आत्मरक्षणासाठी पोलिसांनी पुढाकार घेतल्याचे उदाहरण यवतमाळ मधून समोर आले. महिलांनी अत्याचाराच्या विरोधात आत्मविश्वासाने उभे राहावे. आत्मरक्षण करावे यासाठी पोलिसांनी तब्बल 6000 विद्यार्थिनींना कराटेचे प्रशिक्षण दिले.

    Read more

    मराठवाडा आणि अन्य भागातल्या कुठल्या धरणातून किती क्युसेक पाण्याचा विसर्ग??, वाचा सविस्तर आकडेवारी आणि राहा सतर्क!!

    मराठवाड्यातील पूरस्थिती आणि राज्यातील विविध धरणांचा विसर्ग याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. काल रात्री सुद्धा ते स्थानिक प्रशासन आणि जलसंपदा विभागाच्या संपर्कात होते. आज सकाळी पुन्हा त्यांनी जलसंपदा विभागाकडून एकूणच राज्याच्या स्थितीचा आढावा घेतला.

    Read more

    Kamaltai Gavai : सरन्यायाधीशांच्या मातोश्री RSSच्या व्यासपीठावर जाणार; राजेंद्र गवई यांनी दिला दुजोरा; वैचारिक मतभेद – परस्पर संबंध वेगवेगळे

    सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री तथा माजी राज्यपाल दिवंगत रा. सू. गवई यांच्या पत्नी कमलताई गवई ह्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला हजेरी लावणार असल्याची माहिती त्याचे सुपुत्र डॉक्टर राजेंद्र गवई यांनी दिली आहे. कमलताई गवई यांनी संघाचे निमंत्रण स्वीकारले आहे. संघाशी वैचारिक मतभेद असले तरी एकमेकांच्या कार्यक्रमांना जाणे हे विचारांचा स्वीकार करणे नसते, असे राजेंद्र गवई यांनी या प्रकरणी ठणकावून सांगितले आहे.

    Read more