Akot BJP : अकोटमधील भाजप-MIM युती तुटली; देवेंद्र फडणवीसांच्या नाराजीनंतर निर्णय, आमदार भारसाखळेंना कारणे दाखवा नोटीस
सत्तेसाठी एमआयएमशी हातमिळवणी करणे अकोटमधील भाजप नेत्यांना चांगलेच महागात पडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही युती ‘तत्वशून्य’ असल्याचे सांगत कडक कारवाईचे संकेत दिल्यानंतर, अवघ्या काही तासांतच अकोटमधील भाजप-एमआयएम युती तुटली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत भाजप नेतृत्व आता स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांना ‘कारण दाखवा’ नोटीस बजावणार आहे.