• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 137 of 1320

    Pravin Wankhade

    नागरी संरक्षणाच्या सर्व व्यवस्था चोख करा, हल्ल्यापासून बचावाची mock drill घ्या; केंद्रीय गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना महत्वपूर्ण आदेश!!

    देशातल्या सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये त्याचबरोबर महत्त्वाच्या संस्थांमध्ये नागरी संरक्षणासंदर्भातल्या सर्व व्यवस्था चोख करा. त्यासाठी आवश्यक ती mock drills 7 मे रोजी घ्या, असे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने आज सर्व राज्यांना जारी केले.

    Read more

    India-Pakistan : भारत पाकिस्तान तणवादरम्यान रशियाच्या पुतीन यांचा मोदींना फोन

    रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल त्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत त्यांनी भारताला पूर्ण पाठिंबा दिला आहे. त्यांनी म्हटले की ज्यांनी हा हल्ला केला आणि ज्यांनी हल्ल्याचा कट रचला त्यांच्यावर कठोर कारवाई पाहिजे. ही माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्विट करून दिली.

    Read more

    Himanta Biswa Sarma : ‘’मी खर्गेंना भेटेन अन् गोगोईंच्या..’’ हिमंता बिस्वा सरमाचं विधान!

    आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी सांगितले की ते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटतील आणि विरोधी पक्षाने पाकिस्तानला भेट दिलेल्या खासदार गौरव गोगोई यांना तिकीट का दिले हे विचारतील.

    Read more

    जपानचे संरक्षण मंत्री भारतात आणि त्याचवेळी दुसऱ्या जपानी नेत्याच्या हातूनच भारताचा पाकिस्तानवर economic strike!!

    जपानचे संरक्षण मंत्री जनरल नाकातानी हे आज भारत दौऱ्यावर आले असून नेमका त्याच वेळी दुसऱ्या जपानी नेत्याच्या हातून भारताने पाकिस्तानवर आजच economic strike केला. हा योगायोग वरवरचा वाटत असला तरी तो भारतीय नेतृत्वाने तो कौशल्याने घडवून आणला आहे.

    Read more

    Rajnath Singh : राजनाथ सिंह अन् जपानच्या संरक्षणमंत्र्यांमध्ये द्विपक्षीय बैठक

    संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत-जपान संरक्षण मंत्रीस्तरीय बैठकीला हजेरी लावली. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्यानंतर जपानकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

    Read more

    रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचा पंतप्रधान मोदींना फोन, दहशतवादविरोधी लढ्यात पाठिंबा, पण शी जिनपिंग भेटीपूर्वी केले balancing act!!

    रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज फोन केला. भारताने दहशतवादाविरुद्ध पुकारलेल्या लढ्यात रशियाचा पाठिंबा असल्याचे त्यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले. पण त्यापलीकडे जाऊन पुतिन यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणातले balancing act केले.

    Read more

    Bengal Governor : बंगालचे राज्यपाल म्हणाले- राज्यात कट्टरतावाद-अतिरेकीवाद मोठे आव्हान; राष्ट्रपती राजवटीचा पर्याय सुचवला

    : पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी मुर्शिदाबाद दंगलींबाबत गृह मंत्रालयाला अहवाल सादर केला आहे. यामध्ये, पश्चिम बंगालसाठी कट्टरतावाद आणि अतिरेकीवाद हा एक मोठा धोका असल्याचे वर्णन केले आहे.

    Read more

    ‘पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या जात असताना, ते…’ असंह देवरा म्हणाले आहेत.

    शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी रविवारी (४ मे) ठाकरे गटाचेप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले. उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत ते म्हणाले की, पहलगाममध्ये गोळीबार सुरू असताना ते युरोपमध्ये सुट्टी घालवत होते. मिलिंद देवरा यांनी एक्सवर म्हटले आहे की, ‘उद्धव ठाकरेंच्या युरोप दौऱ्याच्या विपरीत, शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच काळात पीडितांना मदत केली.’

    Read more

    जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला तब्बल 15 वर्षांनी पुण्यात अटक; ATS ची कारवाई!!

    जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप (ताडीवाल रोड, पुणे) यास ATS ने अटक केली. लॅपटॉप एक दोन नव्हे, तर तब्बल 15 वर्षे फरार होता.

    Read more

    Pakistan : पाकिस्तानची पुन्हा एकदा भारतावर अणुहल्ल्याची धमकी; पाक राजदूत म्हणाले- हल्ला केल्यास पूर्ण ताकद वापरू

    पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. रशियातील पाकिस्तानचे राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनी रशिया टुडेशी बोलताना म्हटले आहे की, जर भारतासोबत युद्ध झाले तर पाकिस्तान अण्वस्त्रांचा वापर करेल.

    Read more

    बागलीहार + सलाल + किशनगंगा सगळ्या धरणांची गेट बंद; पाकिस्तानात चिनाब + झेलम नद्या पडल्या कोरड्या!!

    भारताने जम्मू-काश्मीर मधले महत्त्वाचे प्रकल्प बागलीहार + सलाल आणि किशनगंगा या सगळ्या धरणांची गेट बंद केली असून त्याचा परिणाम अवघ्या 16 तासांमध्ये पाकिस्तान दिसला. पाकिस्तानात वाहून जात असलेल्या चिनाब आणि झेलम नद्यांचा जलस्तर 40 % कमी झाला. ऐन उन्हाळ्यात आज जलस्तर कमी झाल्याने पाकिस्तानात पंजाब आणि सिंध प्रांतांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

    Read more

    Jaishankar : युरोपकडून मदतीच्या प्रश्नावर परराष्ट्रमंत्र्यांचा निशाणा, जयशंकर म्हणाले- आम्हाला उपदेशकांची नव्हे तर सहयोगींची गरज

    जेव्हा आपण जगाकडे पाहतो तेव्हा आपण उपदेशक नव्हे तर भागीदार शोधत असतो. विशेषतः ते उपदेशक जे परदेशात जे उपदेश करतात, पण घरी आचरणात आणत नाहीत.

    Read more

    राहुल गांधी तर फक्त “निवडक” चुकांची जबाबदारी घेतली; पण काँग्रेसच्या चुकांची किंमत सगळ्या देशाला मोजावी लागली!!

    लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेसने केलेल्या चुकांची जबाबदारी आपण घेतो असे इंग्लंडमध्ये सांगून आपल्या राजकीय मोठेपणाचा आव आणून दाखविला. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला राहुल गांधी कसे जबाबदार नेते आहेत आणि ते चुका मान्य करून त्याची जबाबदारी देखील कशी घेतात याची वर्णने करणारे ट्विट आणि व्हिडिओ राहुल गांधींच्या समर्थकांनी सोशल मीडियावर शेअर केले. पण राजकीय वस्तुस्थिती पाहिली, तर राहुल गांधींनी चुकांची घेतलेली जबाबदारी आणि प्रत्यक्षात काँग्रेसने केलेल्या चुका आणि त्यामुळे सगळ्या देशाला चुकवावी लागलेली किंमत यातली फार मोठी विसंगती समोर येते.

    Read more

    Himanta Biswa Sarma : आसामात पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या दोघांना अटक; पहलगाम हल्ल्यानंतर 39 जण ताब्यात

    : आसाममधील पहलगाम हल्ल्यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या लोकांवर सतत कारवाई केली जात आहे. आसाम पोलिसांनी शनिवारी दोघांना अटक केली.

    Read more

    Cyber attacks : PDF फाइल्स पाठवून पाकिस्तानी हॅकर्सचे सायबर हल्ले; भारतीय युजर्सचे संगणक, लॅपटॉप आणि फोन टार्गेटवर

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तानी हॅकर्सनी आता सायबर हल्ल्यांद्वारे भारतीय युजर्सना ऑनलाइन फसवणुकीच्या जाळ्यात अडकवण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्यांमध्ये युजर्सचे संगणक, लॅपटॉप आणि फोन लक्ष्य केले जात आहेत.

    Read more

    Warren Buffett : वॉरेन बफे म्हणाले- ही ट्रम्प यांची मोठी चूक, अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर कडाडून टीका

    जगप्रसिद्ध कंपनी बर्कशायर हॅथवेचे सीईओ वॉरेन बफे यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर व्यावसायिक धोरणांवर टीका केली आहे. कंपनीच्या वार्षिक शेअरहोल्डर बैठकीत (एजीएम) ९४ वर्षीय बफेट यांनी ट्रम्प यांना सल्ला दिला की व्यवसायाला शस्त्र बनवू नये. जगाच्या इतर भागांवर दंडात्मक शुल्क लादणे ही एक मोठी चूक आहे.

    Read more

    IMF board : भारताने IMF बोर्डातून कार्यकारी संचालकांना काढून टाकले; 6 महिने कार्यकाळ शिल्लक होता

    भारत सरकारने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मध्ये भारताचे कार्यकारी संचालक म्हणून डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांच्या सेवा तात्काळ प्रभावाने काढून टाकल्या आहेत. हा निर्णय त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपण्याच्या ६ महिने आधी ३० एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आला.

    Read more

    Waqf Act : ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड वक्फ कायद्याच्या विरोधात; हैदराबादेत ‘वक्फ बचाओ, संविधान बचाओ’ मोहीम

    सुधारित वक्फ कायद्याच्या विरोधात रविवारी हैदराबादमधील ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (AIMPLB) ने ‘वक्फ बचाओ, संविधान बचाओ’ या नावाने देशव्यापी निषेध सुरू केला.

    Read more

    Rahul Gandhi : राहुल गांधी म्हणाले- ऑपरेशन ब्लू स्टार ही चूक होती; 80च्या दशकातील काँग्रेसच्या चुकांची जबाबदारी घेण्यास तयार

    राहुल गांधींनी १९८४ चे ऑपरेशन ब्लू स्टार ही चूक होती, हे मान्य केले. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी, अमेरिकेतील ब्राउन विद्यापीठात एका कार्यक्रमादरम्यान, राहुल गांधींना ऑपरेशन ब्लू स्टारवर एक प्रश्न विचारण्यात आला.

    Read more

    निवडणूक आयोग सुपर ॲप लाँच करणार ; जाणून घ्या, ECINET म्हणजे काय?

    निवडणूक आयोग मतदार, निवडणूक अधिकारी आणि राजकीय पक्षांसाठी एक नवीन डिजिटल इंटरफेस ‘ECINET’ विकसित करत आहे. ज्यामध्ये 40 हून अधिक मोबाइल आणि त्याचे वेब अँप्लिकेशन्स एकत्रित करेल.

    Read more

    Pakistan भारतासोबतच्या तणावात पाकिस्तान पडला एकाकी, आता संयुक्त राष्ट्रांसमोर रडगाणे

    पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला नवीनतम प्रादेशिक घडामोडींबद्दल माहिती देण्याचा निर्णय घेतला आहे.

    Read more

    Jammu Kashmir : लष्कराचे वाहन ७०० फूट खोल दरीत कोसळले; ३ जवानांचा मृत्यू

    येथील रामबन जिल्ह्यात रविवारी एक वाहन रस्त्यावरून घसरून ७०० फूट खोल दरीत पडल्याने (Ramban Accident) तीन लष्करी जवानांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सकाळी ११.३० वाजता अपघात झाला. राष्ट्रीय महामार्ग ४४ वर जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या लष्कराच्या ताफ्याचा भाग असलेला हा ट्रक अपघातग्रस्त झाला.

    Read more

    Igla S missile : भारतीय लष्कराला रशियन बनावटीचे इग्ला-एस क्षेपणास्त्र मिळाले

    पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत वाढलेल्या तणावादरम्यान भारतीय सैन्याची क्षमता वाढली आहे. लष्कराला रशियन बनावटीचे इग्ला एस क्षेपणास्त्र मिळाले आहेत. हे खांद्यावरून मारा करणारे क्षेपणास्त्र शत्रूचा नाश करेल. याशिवाय आणखी ९० क्षेपणास्त्रे खरेदी करण्याची तयारी भारताने सुरू केली आहे.

    Read more

    Manoj Tiwari : मनोज तिवारी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला!

    भाजप खासदार मनोज तिवारी यांनी जातीच्या जनगणनेवरून काँग्रेस खासदार राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला. रविवारी बुरारीमध्ये त्यांनी म्हटले की, जातीय जनगणना होऊ द्या, राहुल गांधींनाही त्यांच्या जातीबद्दल सांगावे लागेल. यानंतर संपूर्ण रहस्य उलगडेल. दिल्लीसह संपूर्ण जगाला कळेल की ते कोणत्या जातीचे आहेत.

    Read more