• Download App
    wankhadepravin | The Focus India | Page 136 of 1537

    wankhadepravin

    Kharge : खरगे म्हणाले- मोदी ट्रम्पसमोर का झुकत आहेत, त्यांना मान डोलवण्यासाठी PM म्हणून निवडले नाही; व्हेनेझुएलामध्ये निर्माण झालेली परिस्थिती योग्य नाही

    काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानांवरून पंतप्रधान मोदींवर टीका केली. ते म्हणाले- मोदी ट्रम्पसमोर का झुकत आहेत, हे मला समजत नाहीये. हे देशासाठी योग्य नाही. तुम्ही देशासाठी उभे राहिले पाहिजे. देशाने तुम्हाला पंतप्रधान म्हणून मान डोलवण्यासाठी निवडले नाही.

    Read more

    Chandrakant Patil : अजितदादा जनता खुळी नाही; तुमची सत्ता असताना विकास का नाही केला? चंद्रकांत पाटलांचा पलटवार

    राज्यातील महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातच आता जुंपल्याचे पाहायला मिळत असून, विशेषतः पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये उभय पक्षांतील संघर्ष शिगेला पोहोचला आहे

    Read more

    पुण्यातला काँग्रेसचा अखेरचा धुरंधर!!

    सुरेश कलमाडी लक्षात राहतील, ते पुण्यातल्या काँग्रेसचे अखेरचे धुरंधर नेता म्हणून!! कर्नाटकातून पुण्यात येऊन संपूर्ण पुणे शहर काँग्रेसचे नेतृत्व मिळविणे तसे सोपे नव्हते. कारण सुरेश कलमाडी ज्यावेळी पुण्यात आले, त्यावेळी पुण्याच्या काँग्रेसमध्ये मोठ्या दिग्गज नेत्यांची मांदियाळी होती. विठ्ठलराव गाडगीळ, जयंतराव टिळक यांचे नेतृत्व तेव्हा पुण्याच्या क्षितिजात चमकत होते. आजच्या भाषेत बोलायचे झाले, तर गाडगीळ आणि टिळक हे दोघे पुण्याचे “कारभारी” होते. त्यावेळी पुण्यात काँग्रेसचे दोन गट होते. एक गट गाडगीळांचा, तर दुसरा गट टिळकांचा.

    Read more

    लातूर मधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील म्हटल्यावर काँग्रेसवाले भडकले; पण…

    लातूर मधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील, असे उद्गार रवींद्र चव्हाण यांनी काढल्यावर काँग्रेसवाले भडकले

    Read more

    Suresh Kalmadi : माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे निधन; बऱ्याच काळापासून आजारी होते; कॉमनवेल्थ गेम्ससारख्या जागतिक स्पर्धा भारतात आणण्यासाठी प्रसिद्ध होते.

    माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. कलमाडी यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी पहाटे ३:३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

    Read more

    Nicolas Maduro : व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांची न्यूयॉर्क कोर्टात हजेरी; मादुरो म्हणाले- मी सुसंस्कृत व्यक्ती, माझ्यावरील सर्व आरोप चुकीचे; पुढील सुनावणी 17 मार्च रोजी

    व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना न्यूयॉर्क न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांनी न्यायालयात स्वतःवरील सर्व आरोप चुकीचे असल्याचे सांगितले. मादुरो म्हणाले की त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. ते एक सुसंस्कृत व्यक्ती आहेत. आजची सुनावणी न्यायालयात पूर्ण झाली आहे. पुढील सुनावणी 17 मार्च रोजी होईल.

    Read more

    Devendra Fadnavis : लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार, मी मुख्यमंत्री असेपर्यंत योजना बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीसांची घोषणा

    आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आता जोरदार प्रचार सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज परभणीच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या सभेत बोलताना लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली. देवा भाऊ मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे विधान फडणवीसांनी केले आहे.

    Read more

    Chandrashekhar Bawankule : बिनविरोध निवडी हा चांगला पायंडा; यामध्ये नियमांचे उल्लंघन होण्यासारखे काय आहे? चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांना सवाल

    बिनविरोध निवडीवरून राजकारण तापलेले असतानाच, निवडणूक बिनविरोध व्हायला काय हरकत आहे? हा एक चांगला पायंडा आहे. यामध्ये नियमाचे उल्लंघन होण्यासारखे काय आहे? असा प्रतिसवाल भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. ते आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद होते. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावरही बोचरी टीका केली. राज ठाकरे यांच्या सभांना आता पूर्वीसारखी गर्दी होत नसेल, म्हणूनच ते आता मुंबईतील शिवसेना-मनसेच्या शाखांना भेटी देत फिरत आहेत,” असे ते म्हणाले.

    Read more

    Bombay High Court : बिनविरोध निवडीविरोधात मनसे-काँग्रेस हायकोर्टात; चौकशीची मागणी, आयोगाच्या तटस्थतेवर प्रश्नचिनह

    राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना व काँग्रेसने अखेर महापालिका निवडणुकांत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे या दोन्ही पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या प्रकरणाची हायकोर्टाच्या निगराणीखाली चौकशी करण्याची मागणी केली आहे.

    Read more

    Odisha : ओडिशाच्या ढेंकनाळमध्ये दगडी खाणीतील खडक कोसळला; 4 मजुरांचा मृत्यू, अनेक अजूनही अडकले

    ओडिशातील ढेंकनाळ जिल्ह्यात एका दगडाच्या खाणीत खडकाचा एक मोठा भाग कोसळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली, जेव्हा गोपालपूर गावाजवळच्या खाणीत काही मजूर ड्रिलिंग आणि दगड काढण्याचे काम करत होते. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, या अपघातात 4 मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर काही अजूनही अडकले आहेत.

    Read more

    Republic Day : 5 जानेवारीपासून मिळतील प्रजासत्ताक दिन परेड-2026 ची तिकिटे; किंमत ₹20 ते ₹100

    संरक्षण मंत्रालयाने रविवारी कर्तव्य पथावर २६ जानेवारी रोजी होणाऱ्या परेडसाठी तिकिटांच्या विक्रीची घोषणा केली आहे. एका निवेदनानुसार, ७७ व्या प्रजासत्ताक दिनाची मुख्य परेड, बीटिंग रिट्रीटची फुल ड्रेस रिहर्सल आणि मुख्य बीटिंग रिट्रीट समारंभाच्या तिकिटांची विक्री ५ जानेवारीपासून सुरू होईल.

    Read more

    ठाकरे बंधूंचे फक्त मुंबई, ठाण्याकडे लक्ष; मराठवाडा, विदर्भाकडे पूर्ण दुर्लक्ष!!

    ठाकरे बंधूंचे फक्त मुंबई, ठाण्याकडे लक्ष; मराठवाडा विदर्भाकडे पूर्ण दुर्लक्ष!!, अशीच अवस्था ठाकरे बंधूंच्या महापालिका निवडणुकीच्या रणनीतीतून समोर आली. बलाढ्य भाजपचे आव्हान परतवून लावण्यासाठी ठाकरे बंधूंनी मुंबई आणि ठाण्यामध्ये युती केली. त्यांनी त्याच पद्धतीने निवडणुकीची पूर्ण रणनीती आखली. मुंबई आणि ठाणे या परिसरात आणि फार तर छत्रपती संभाजी नगर मध्ये ठाकरे बंधूंनी प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली, पण मराठवाडा आणि विदर्भातल्या महापालिकांकडे पूर्ण दुर्लक्ष केले. इतकेच काय पण ठाकरे बंधूंनी पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या सगळ्या महापालिकांकडे देखील लक्ष दिले नाही.

    Read more

    सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार काँग्रेसच्या नेत्यांनी केला हे खरेच, पण…

    गजनीच्या मोहम्मदाने पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ वर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले. या आक्रमणाला 1000 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच त्या 1000 वर्षांमध्ये प्रचंड संघर्ष झाले. सोमनाथाचे मंदिर पुन्हा दिमाखाने उभे राहिले. याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खास लेख लिहिला. भारतावर झालेल्या आक्रमणाची आणि भारतीयांनी संघर्ष करून मिळविलेल्या विजयाची आज आठवण करून दिली.

    Read more

    China : चीनने म्हटले- अमेरिकेने मादुरोंची त्वरित सुटका करावी; राष्ट्रपतींचे अपहरण करणे चुकीचे; उत्तर कोरियाचे व्हेनेझुएलाला समर्थन

    चीनने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीची व्हेनेझुएलातून तत्काळ सुटका करण्याची मागणी केली आहे. दोघेही सध्या अमेरिकेच्या ताब्यात आहेत. अमेरिकन सैन्याने त्यांना व्हेनेझुएलाची राजधानी कराकस येथून ताब्यात घेतले आणि अमेरिकेत नेले.

    Read more

    महापालिका निवडणूक प्रचाराच्या धबडग्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तरेश्वराच्या यात्रेला दरे गावात!!

    एकीकडे महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा धबडगा सुरू असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दरेगावातल्या उत्तरेश्वराच्या यात्रेला विसरले नाहीत. त्यांनी प्रचारातून थोडा अवधी बाजूला काढून दरे गावाला भेट दिली आणि उत्तरेश्वराच्या यात्रेत महापूजा केली.

    Read more

    दोन्ही मुलांना व्यवस्थित settle करून नारायण राणे सन्मानाने निवृत्तीच्या दिशेने…, पण…

    दोन्ही मुलांना व्यवस्थित settle करून नारायण राणे सन्मानाने निवृत्तीच्या दिशेने निघालेत…, पण महाराष्ट्रातल्या सगळ्यात ज्येष्ठ नेत्याला अजून काही निवृत्त होण्याचा विचार मनाला शिवत नाही. मनाला शिवला, तरी तो अंमलात आणता येत नाही.

    Read more

    Elon Musk : मस्क म्हणाले- Grok इनपुटनुसार कंटेंट देईल, जबाबदारी टूलची नाही, वापरकर्त्याची; भारत सरकारने Grok ला अश्लील कंटेंट काढण्यास सांगितले होते

    सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X चे मालक एलन मस्क यांचे भारत सरकारच्या कारवाईवर विधान आले आहे. मस्क यांनी शनिवारी सांगितले की, काही लोक म्हणत आहेत की Grok आक्षेपार्ह चित्रे तयार करत आहे, पण हे असे आहे, जसे एखाद्या वाईट गोष्टीसाठी पेनला दोष देणे. पेन हे ठरवत नाही की काय लिहिले जाईल. हे काम त्याला पकडणारा करतो.

    Read more

    Sudhanshu Trivedi : राहुल गांधी व्हिएतनामच्या दौऱ्यावर, परदेशात जाऊन भारताच्या विरोधात विष ओकतात; यामागे काय उद्देश? भाजपचा सवाल

    भाजपने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व्हिएतनाम दौऱ्यावर गेल्याचा दावा केला आहे. तसेच, त्यांनी आरोप केला आहे की ते व्हिएतनाममध्ये भारतविरोधी लोकांचे पाहुणे बनून देशाविरुद्ध बोलतील.

    Read more

    एकेकाळी पंतप्रधान पदाच्या नावांची स्पर्धा; आता राज्यसभेची सीट तरी मिळेल की नाही, याची चर्चा!!

    एकेकाळी पंतप्रधान पदाच्या नावांमध्ये स्पर्धा; आता राज्यसभेची सीट तरी मिळेल की नाही, याची चर्चा!! अशा अवस्थेत शरद पवारांचे राजकारण येऊन पोहोचले.

    Read more

    PM Modi : पीएम मोदी म्हणाले- बनारसमध्ये उत्साह जास्त राहील; GenZच्या हातात तिरंगा पाहून अभिमान वाटतो

    वाराणसी येथे 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल चॅम्पियनशिपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्चुअली उद्घाटन केले. यावेळी त्यांनी खेळाडूंना काशीची एक म्हण ऐकवली. ते म्हणाले- आमच्या बनारसमध्ये म्हटले जाते, ‘बनारस के जानय के चाहत हऊवै तो बनारस आवै के पड़ी।’ म्हणजे, बनारसला जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला बनारसला यावेच लागेल. तुम्ही सर्वजण आता बनारसमध्ये आला आहात, तर बनारसला जाणूनही घ्याल.

    Read more

    North Korea : उत्तर कोरियाने जपानच्या दिशेने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली; टोकियोचा आणीबाणीचा इशारा जारी

    उत्तर कोरियाने रविवारी जपानच्या परिसरात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने याबाबत तातडीचा अलर्ट जारी केला.

    Read more

    Govinda Chandra Pramanik : बांगलादेशात हिंदू नेत्याला निवडणूक लढवण्यावर बंदी; शेख हसीनांच्या जागेवर गोविंद यांचा उमेदवारी अर्ज रद्द

    बांगलादेशात एका हिंदू नेत्याला निवडणूक लढवण्यापासून रोखण्यात आले आहे. बांगलादेशात 12 फेब्रुवारी रोजी निवडणुका होणार आहेत. गोविंद चंद्र प्रमाणिक यांनी संसदीय निवडणुकांसाठी गोपालगंज-3 मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, परंतु निवडणूक अधिकाऱ्यांनी शनिवारी त्यांचा अर्ज परत केला.

    Read more

    Ajit Pawar : अजित पवार म्हणाले- कार्यकर्त्यांना बाजूला करणे महाराष्ट्राची संस्कृती नाही; पुण्याचा कारभारी बदलण्याची वेळ

    पुण्याचा कारभारी बदलण्याची वेळ आली आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी व्यक्त केले. कार्यकर्त्यांना निवडणुकीवेळी खड्यासारखे बाजूला करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असेही ते म्हणाले. बानेर परिसरातील प्रभाग क्रमांक नऊमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बाबुराव चांदेरे, अमोल बालवडकर, पार्वती निम्हण आणि गायत्री मेढे कोकाटे यांच्या प्रचारार्थ आयोजित विजयी संकल्प सभेत ते बोलत होते.

    Read more

    BJP’s Amit Satam : भाजपचा पलटवार- ठाकरेंचा महापौर झाला, तर मुंबई पाकिस्तान होईल; 25 वर्षांत मुंबई पालिकेत 3 लाख कोटी लुटले

    मुंबई महानगरपालिकेमध्ये १९९७ ते २०२२ या २५ वर्षांच्या कालावधीत उद्धव ठाकरेंनी देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा खळबळजनक आरोप भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केला आहे. देशात आजवर झालेले २जी, कोल स्कॅम किंवा कॉमनवेल्थ यांसारख्या मोठ्या घोटाळ्यांचा आकडा १ लाख ७६ हजार कोटींच्या वर गेला नाही, मात्र ठाकरेंनी एकट्या मुंबई पालिकेत ३ लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा दावा अमित साटम यांनी केला आहे. तसेच महापौर ठाकरेंचा झाला, तर मुंबई पाकिस्तान होईल, असा दावा अमित साटम यांनी केला.

    Read more

    Amit Shah : अमित शहा म्हणाले- तामिळनाडूमध्ये देशातील सर्वात भ्रष्ट सरकार, एप्रिल 2026 मध्ये एनडीए सरकार स्थापन होईल

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, जर संपूर्ण भारतात कुठे सर्वात भ्रष्ट सरकार असेल, तर दुर्दैवाने ते तामिळनाडूमध्ये आहे. त्यांनी पुढे सांगितले की, मला स्पष्ट दिसत आहे की एप्रिल 2026 मध्ये तामिळनाडूमध्ये एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे.

    Read more