• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 131 of 1320

    Pravin Wankhade

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान, उत्तराखंड सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या चारधाम यात्रेसाठी विमान सेवा बंद करण्यात आल्या आहेत. केदारनाथसह चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.

    Read more

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर पाकिस्तानी डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स यांचा फोन भारतीय डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन यांना आला.

    Read more

    Judge Cash case : जज कॅश केस, सरन्यायाधीशांनी PM-राष्ट्रपतींना अहवाल सोपवला; तीन न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी

    भारताचे सरन्यायाधीश (CJI) संजीव खन्ना यांनी न्यायमूर्ती यशवंत वर्मा कॅश केसचा तपास अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केला. या प्रकरणाची चौकशी तीन न्यायाधीशांची समिती करत आहे. या अहवालासोबत न्यायमूर्ती वर्मा यांचे उत्तरही पाठवण्यात आले आहे.

    Read more

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??

    भारताने “ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात ceasefire अर्थात शस्त्रसंधी किंवा युद्धविराम झाल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.

    Read more

    Indian Army पाकिस्तानचे कंबरडे मोडल्यानंतरच भारताने सध्या थांबविले फायरिंग; भारतीय सैन्य दलांचा स्पष्ट खुलासा; शस्त्रसंधी शब्द नाही वापरला!!

    भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर पाकिस्तानी डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स यांचा फोन भारतीय डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन यांना आला

    Read more

    Operation sindoor : भारत – पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, पण फक्त फायरिंग थांबवल्याचा भारताचा खुलासा!!

    ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेनंतर भारताने कुठल्याही दहशतवादाला युद्ध समजूनच ठोकायचे असा धोरणात्मक निर्णय बदलल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.

    Read more

    Indo Pak ceasefire : भारताने धोरणात्मक निर्णय बदलल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात यांच्यात शस्त्रसंधी, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

    भारताचे ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर भारताने आपली भूमिका अधिक ताठर करत कुठल्याही प्रकारच्या दहशतवादाला act of war असे समजूनच ठोकून काढले जाईल

    Read more

    Shri Siddhivinayak Temple : श्री सिद्धिविनायक मंदिरात आता नारळ, हार अन् प्रसाद बंदी

    मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या व्यवस्थापनाने शुक्रवारी सांगितले की, सुरक्षेच्या कारणास्तव ११ मे पासून मंदिरात नारळ, हार आणि प्रसाद अर्पण करण्यास परवानगी दिली जाणार नाही. दक्षिण मुंबईतील प्रभादेवी परिसरात असलेले हे मंदिर एक लोकप्रिय धार्मिक स्थळ आहे जे मोठ्या संख्येने भाविकांना आकर्षित करते. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर म्हणाले की, मंदिराला दररोज हजारो लोक भेट देतात आणि ते दहशतवाद्यांच्या ‘हिटलिस्ट’वर आहेत.

    Read more

    Marco Rubio and S Jaishankar : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी एस जयशंकर यांच्याशी केली चर्चा

    भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानी सैन्य सीमेवर वारंवार गोळीबार करत आहे आणि नागरिकांना लक्ष्य करत आहे. शुक्रवारी मध्यरात्री, पाकिस्तानी सैन्याने ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांचा वापर करून भारतीय लष्करी तळ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी झाला. भारतीय सैन्याने बहुतेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेत पाडले आहेत. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली आहे.

    Read more

    Asaduddin Owaisi : पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला असदुद्दीन ओवैसींनी सुनावले, म्हणाले..

    भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. ९ आणि १० मे रोजीच्या रात्री पाकिस्तानी सैन्याने भारतावर हल्ला करण्याच्या उद्देशाने क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि लढाऊ विमानांचा वापर केला. तथापि, भारतीय लष्कर आणि भारतीय संरक्षण यंत्रणेने हे हल्ले हाणून पाडले. यानंतर, भारतीय हवाई दलाने कारवाई करत क्षेपणास्त्र हल्ल्यात पाकिस्तानचे 6 हवाई तळ उद्ध्वस्त केले. याशिवाय, भारतीय सैन्याने अनेक रडार सिस्टीम देखील नष्ट केल्या आहेत. दरम्यान, पाकिस्तान वापरत असलेले ड्रोन तुर्कीने बनवलेले असल्याचे समोर आले आहेत.

    Read more

    Operation Sindoor impact : भारत इथून पुढे दहशतवादाला act of war समजूनच ठोकणार, म्हणजे नेमके काय करणार??

    “ऑपरेशन सिंदूर” मध्ये भारताने पाकिस्तानचे 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारल्यानंतर तसेच 7 लष्करी आणि हवाई तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानची भाषा थोडी बदलली. आम्हाला युद्ध नको

    Read more

    Fatah-2′ missile : चीनने पाकिस्तानला दिलेले ‘फतह-२’ क्षेपणास्त्र भारताने पाडले

    पाकिस्तानने शनिवारी भारताविरुद्ध ‘ऑपरेशन बुनयान उल मर्सूस’ सुरू केले, ज्यामध्ये त्यांनी भारतावर फतह-II (फतह-2) क्षेपणास्त्र डागले. पण भारतीय सुरक्षा दलांनी हरियाणातील सिरसा येथे हे क्षेपणास्त्र रोखले आणि हवेतच ते उद्ध्वस्त केले. या क्षेपणास्त्रामुळे, पाकिस्तानचे वाईट हेतूही तिथेच नष्ट झाले जिथे त्यांचे फतह-२ पडले होते.

    Read more

    Indian Army : भारतीय लष्कराने जारी केला एक व्हिडिओ अन् पाकिस्तानच्या खोटेपणचा बुरखा फाटला

    भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवरील तणाव शिगेला पोहोचला आहे आणि पाकिस्तानने सलग दुसऱ्या दिवशी भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे.

    Read more

    Operation sindoor : अणुबॉम्ब टाकायचाय की युद्ध नकोय??, पाकिस्तानातल्या नेत्यांमध्येच गोंधळ; त्यात विमानतळ आणि लष्करी तळांच्या नुकसानीची भर!!

    भारतावर अणुबॉम्ब टाकायचा आहे की भारताबरोबर युद्धच नकोय??, या मुद्द्यावर पाकिस्तानी नेत्यांमध्येच गोंधळ झाला आहे

    Read more

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    मागील काळात अडीच वर्षे अडचणी आल्या होत्या. त्या काळात मेट्रो शेडचा देखील वाद उभा राहिला होता. त्या सर्व अडचणींवर मात करून आता आपली मेट्रो अंतिम टप्प्यात पोहोचली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तो अडीच वर्षांचा काळ नसता तर मुंबईची मेट्रो किमान एक ते दिड वर्षे आधी पूर्ण झाली असती, असा टोला देखील त्यांनी लगावला. या माध्यमातून उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्य काळावर निशाणा साधला आहे.

    Read more

    BSF : बीएसएफने पाकिस्तानचे अनेक दहशतवादी लाँच पॅड केले उद्ध्वस्त

    भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी अड्डे नष्ट केले. या हल्ल्यानंतर पाकिस्तान हताश झाला आहे आणि तो सतत भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे, जो भारतीय सैन्य हाणून पाडत आहे.

    Read more

    Operation sindoor : सियालकोट, चकलाला यांच्यासह 7 पाकिस्तानी हवाई आणि लष्करी तळांवर भारताचे हल्ले; ब्राह्मोस आणि S400 सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचे पाकिस्तानचे दावे खोटे!!

    ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय हवाई दल आणि लष्कराने सियालकोट चकलाला यांच्यासह सात पाकिस्तानी हवाई आणि लष्करी तळांवर हल्ले केले. पण पाकिस्तानने ब्राह्मोस आणि S400 सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचे दावे केले. ते भारताने फेटाळून लावले.

    Read more

    Pakistani terrorists : BSF ने 7 पाकिस्तानी दहशतवाद्यांना केले ठार; S400-आकाशने पाकिस्तानी ड्रोन नष्ट केले

    बुधवारी रात्री जम्मू आणि काश्मीरमधील जम्मू आणि पठाणकोटसह ११ भागात पाकिस्तानने १०० हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर केला, परंतु क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली S400 आणि आकाशने हा हल्ला उधळून लावला.

    Read more

    Ganga Expressway : पाकिस्तान युद्धात गंगा एक्सप्रेसवे गेम चेंजर; राफेलपासून हरक्यूलिस उतरले

    ऑपरेशन सिंदूरद्वारे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढला आहे. दोन्ही देशांची तयारी तीव्र झाली आहे. या परिस्थितीत, शाहजहांपूरच्या गंगा एक्सप्रेसवेचे महत्त्व अलिकडे आणखी वाढले आहे. भारतीय हवाई दलाने २ मे रोजी येथे पहिले रात्रीचे लँडिंग करून एक विक्रम प्रस्थापित केला होता. हा केवळ रात्रीच्या लँडिंगसाठीचा सराव नव्हता तर युद्धादरम्यान एक मोठा गेम चेंजर ठरेल.

    Read more

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्कालीन सुरक्षा बैठक घेतली. या बैठकीचा उद्देश सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेणे आणि राज्यभरातील सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेणे होता. दरम्यान महाराष्ट्राला अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

    Read more

    Terrorist Tahawwur Rana : दहशतवादी तहव्वुर राणा 6 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत; सुरक्षेच्या कारणास्तव एक दिवस आधी हजेरी

    २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वुर राणा याला शुक्रवारी एनआयए रिमांडमधून पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले. एनआयएच्या विशेष न्यायालयाने तहव्वुरला ६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव, राणाला नियोजित तारखेच्या एक दिवस आधी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयीन कोठडीत पाठवल्यानंतर राणाला तिहार तुरुंगात नेण्यात आले.

    Read more

    Tani community : तानी समुदायाच्या लोकांची मागणी, तानीलँडची निर्मिती करा; पोलिसांनी युनायटेड तानी आर्मीची टोळी पकडली

    अरुणाचल प्रदेश पोलिसांनी गुरुवारी सांगितले की त्यांनी राज्यात अतिरेकी भरती, शस्त्रास्त्रांची तस्करी आणि सीमापार गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे.

    Read more

    Mumbai soldier : पाकविरोधात लढताना मुंबईचा जवान शहीद; मुरली नाईक यांना उरीमध्ये लढताना वीरमरण

    भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उडवले. यात जवळपास 100 दहशतवादी ठार झाले आहेत. त्यानंतर पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले,

    Read more

    Neeraj Chopra : आयपीएल नंतर आता ‘ही’ क्रीडा स्पर्धा देखील भारतात झाली स्थगित

    भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या लष्करी तणावामुळे आयपीएल २०२५ मध्येच स्थगित करण्यात आले आहे. एका आठवड्यानंतर ते पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. आता २४ मे पासून बंगळुरू येथे होणारी नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धाही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

    Read more

    India-Pakistan : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर

    भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील एकूण सुरक्षा व्यवस्थेचा आणि आपत्कालीन तयारीचा सखोल आढावा घेतला. वर्षा निवासस्थान, मुंबई येथे घेतलेल्या या उच्चस्तरीय बैठकीत राज्याच्या गृह, आरोग्य, पोलिस, प्रशासन, आणि महापालिकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चर्चा झाली. संभाव्य संकट परिस्थितीत नागरिकांचा जीवित व मालमत्तेचा धोका कमी करणे आणि प्रशासन सज्ज ठेवणे यावर भर देत मुख्यमंत्री यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले.

    Read more