• Download App
    wankhadepravin | The Focus India | Page 130 of 1537

    wankhadepravin

    China : चीनने जम्मू-काश्मीरमधील शक्सगाम खोरे आपले असल्याचे सांगितले, म्हटले- पाकिस्तानपर्यंतचा रस्ता हद्दीत बांधत आहोत, भारताने बेकायदेशीर ताबा म्हटले

    चीनने जम्मू-काश्मीरमधील शक्सगाम खोऱ्याचा परिसर आपला असल्याचा दावा केला आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) द्वारे पाकिस्तानपर्यंत रस्ता बांधत आहे, जो या परिसरातून जात आहे.

    Read more

    ICC : ICCने म्हटले– बांगलादेशला भारतातच T20 विश्वचषक खेळावा लागेल; स्थळ बदलण्याची मागणी फेटाळली

    आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) ची टी-20 विश्वचषकाचे ठिकाण बदलण्याची मागणी फेटाळून लावली आहे. ICC ने स्पष्ट केले की, विश्वचषकाच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही. वृत्तसंस्था ANI ने X वर ICC च्या हवाल्याने ही बातमी दिली. मात्र, नंतर ही पोस्ट हटवण्यात आली आणि ICC सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती देत दुसरी पोस्ट करण्यात आली.

    Read more

    Iran Violence : इराण हिंसाचार- तेहरानमधील रुग्णालयासमोर प्रेतांचा ढिगारा, 15 दिवसांत 544 लोकांचा मृत्यू

    इराणमध्ये गेल्या 15 दिवसांपासून हिंसक निदर्शने सुरू आहेत. इराणच्या मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या वृत्तसंस्थेनुसार (HRANA), हिंसाचारात आतापर्यंत 544 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात 8 मुलांचाही समावेश आहे. तर, 10,681 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

    Read more

    Marco Rubio : ट्रम्पनंतर कोण होणार अमेरिकेचा कारभारी, उपराष्ट्रपती व्हेन्सऐवजी परराष्ट्र मंत्री रुबिओ यांचा दर्जा वाढला

    अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्या पुढील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनण्याच्या शक्यता अचानक खूप वाढल्या आहेत. ब्रिटिश वृत्तपत्र द इंडिपेंडंटच्या अहवालानुसार, याचे कारण व्हेनेझुएलावर अमेरिकेने केलेली कारवाई आहे.

    Read more

    Trump : ट्रम्प म्हणाले- इराणसोबत व्यापार केल्यास 25% शुल्क लावणार; नियम तत्काळ लागू, यात भारताचाही समावेश

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत व्यवसाय करणाऱ्या देशांवर 25% शुल्क (टॅरिफ) लावण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी सोमवारी रात्री ट्रुथ सोशलवर पोस्ट करून सांगितले की, जो देश इराणसोबत व्यापार करेल, त्याला अमेरिकेसोबतच्या व्यापारात 25% शुल्क आकारले जाईल.

    Read more

    20 वर्षांपूर्वी वेगळे झालात, त्यावेळी काय महाराष्ट्र छोटा होता का??; तुम्ही स्वार्थासाठी एकत्र आलात; ठाकरे बंधूंना एकनाथ शिंदेंचा टोला!!

    आज तुम्ही म्हणताय, कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे म्हणून आम्ही एकत्र आलो. मग 20 वर्षांपूर्वी तुम्ही वेगळे झालात, त्यावेळी काय महाराष्ट्र छोटा होता का??, असा खोचक सवाल करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंच्या ऐक्याची शिवाजी पार्कवर पोलखोल केली.

    Read more

    व्यंगचित्रकारांकडून राज ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली; म्हणे, अदानी कंपनीच्या प्रचाराचीच दिली फुल्ल टू गॅरेंटी!!

    व्यंगचित्रकारांकडून राज ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली; म्हणे अदानी कंपनीच्या प्रचाराचीच दिली फुल्ल टू गॅरेंटी!!, असाच प्रकार राज ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरल्या भाषणानंतर समोर आला.

    Read more

    Venezuela : अमेरिकेवर व्हेनेझुएलामध्ये सोनिक शस्त्रे वापरल्याचा आरोप; प्रत्यक्षदर्शी गार्ड म्हणाला- हल्ल्यादरम्यान सैनिकांना रक्ताच्या उलट्या झाल्या

    अमेरिकेवर व्हेनेझुएलाने सोनिक शस्त्रे वापरल्याचा आरोप केला आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, या ऑपरेशनदरम्यान अमेरिकन सैन्याने एक अत्यंत शक्तिशाली आणि आतापर्यंत न पाहिलेले शस्त्र वापरले, ज्यामुळे व्हेनेझुएलाचे सैनिक पूर्णपणे हतबल झाले होते.

    Read more

    OpenAI : ऑफिस कामात माणसांना मागे टाकणार एआय; OpenAI खऱ्या कामातून प्रशिक्षित करत आहे नवीन मॉडेल, नोकऱ्यांवर गंडांतर?

    आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल होणार आहे. याचा थेट परिणाम ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर होऊ शकतो. वायर्डच्या एका अहवालानुसार, चॅटजीपीटी (ChatGPT) बनवणारी कंपनी ओपनएआय (OpenAI) एक प्रगत प्रणाली (अ‍ॅडव्हान्स सिस्टिम) तयार करत आहे. ही प्रणाली ऑफिसमधील जवळपास प्रत्येक दैनंदिन काम माणसांपेक्षा अधिक अचूक आणि चांगल्या प्रकारे स्वतःहून करण्यास सक्षम असेल.

    Read more

    अजितदादांच्या तथाकथित “गेमचेंजर” डावात फडणवीसांनी मारली पाचर; मेट्रोच्या फुकट प्रवासाची केली पोलखोल!!

    पुणे महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांनी हमीपत्र जारी करून जो “गेमचेंजर’ डाव टाकला, त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाचर मारली. अजितदादांच्या मेट्रोच्या फुकट प्रवासाची पुरती पोलखोल केली. त्यामुळे अजितदादांचा तथाकथित “गेमचेंजर” डाव मतदानापूर्वीच उधळला गेला.

    Read more

    Mani Shankar Aiyar : मणिशंकर अय्यर म्हणाले- ऑपरेशन सिंदूर संपवले पाहिजे, भारत सरकारने पाकिस्तानशी चर्चा करावी; भाजपचा पलटवार- काँग्रेसची ओळख, पाकिस्तान माझा भाईजान

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मणिशंकर अय्यर यांनी म्हटले आहे की, भारताने त्वरित ऑपरेशन सिंदूर थांबवावे आणि पाकिस्तानसोबत कोणत्याही विलंबाशिवाय चर्चेच्या टेबलावर परत यावे. अय्यर यांनी हे एका मुलाखतीत सांगितले आहे. याचा व्हिडिओ रविवारी समोर आला आहे. त्यांच्या विधानावर उत्तर देताना भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी काँग्रेसला “इस्लामाबाद नॅशनल काँग्रेस” म्हटले.

    Read more

    Owaisi : ओवैसी म्हणाले- आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात ट्यूबलाइट; त्यांना संविधानाची समज नाही; हिमंता म्हणाले- हे हिंदू राष्ट्र आहे, पंतप्रधानही हिंदूच असेल

    ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी रविवारी सांगितले की, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या डोक्यात ट्यूबलाइट आहे. ते म्हणाले की, सरमा यांना संविधानाची समज नाही.

    Read more

    Trump : ग्रीनलँडवर हल्ल्यासाठी ट्रम्प यांची तयारी सुरू असल्याचा अहवाल, विशेष कमांडोंना जबाबदारी; जनरल म्हणाले- राष्ट्रपतींचा हट्ट 5 वर्षांच्या मुलासारखा

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर ताबा मिळवण्यासाठी योजना तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. डेली मेलनुसार, ट्रम्प यांनी जॉइंट स्पेशल ऑपरेशन्स कमांड (JSOC) ला ही जबाबदारी सोपवली आहे. मात्र, लष्करी अधिकारी या विचाराशी सहमत दिसत नाहीत. ते याला कायदेशीरदृष्ट्या चुकीचे मानतात.

    Read more

    मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम : ‘मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी; विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

    देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) १५ व्या निवडणुकीचा ज्वर सध्या शिगेला पोहोचला आहे.

    Read more

    mohan bhagwat : भागवत म्हणाले- आरएसएस बदलत नाहीये, वेळेनुसार आपले स्वरूप समोर आणत आहे; संघावर बनलेल्या ‘शतक’ चित्रपटाचे म्युझिक लाँच

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी सांगितले की, संघ बदललेला नाही, तर तो हळूहळू विकसित होत आहे आणि वेळेनुसार त्याचे स्वरूप समोर आले आहे. ते म्हणाले की लोक याला बदल म्हणून पाहत आहेत, तर मूळ विचार आणि चारित्र्य तेच आहे.

    Read more

    Haka Protest : न्यूझीलंडमध्ये दुसऱ्यांदा नगर कीर्तनाला विरोध; कीवी ग्रुपने हाका डान्स केला; म्हणाले- या आमच्या गल्ल्या, तलवारी फिरवण्याची परवानगी कोणी दिली

    न्यूझीलंडमध्ये पुन्हा एकदा शीख नगर कीर्तनाला विरोध करण्यात आला आहे. 20 दिवसांच्या आत ही दुसरी वेळ आहे. मात्र, यावेळी नगर कीर्तन थांबवण्यात आले नाही. याविरोधात डेस्टिनी चर्चशी संबंधित ब्रायन टमाकी यांच्या गटाने रस्त्यावर उतरून हाका नृत्य केले. टमाकी आणि त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजीही केली.

    Read more

    अजितदादांच्या तथाकथित “गेमचेंजर” डावात फडणवीसांनी मारली पाचर; मेट्रोच्या फुकट प्रवासाची केली पोलखोल!!

    पुणे महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांनी हमीपत्र जारी करून जो “गेमचेंजर’ डाव टाकला, त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाचर मारली. अजितदादांच्या मेट्रोच्या फुकट प्रवासाची पुरती पोलखोल केली.

    Read more

    Mukesh Ambani : मुकेश अंबानी म्हणाले- जिओ AI प्लॅटफॉर्म लाँच करणार; गुजरातमध्ये ₹7 लाख कोटींची गुंतवणूक करणार

    रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी रविवारी व्हायब्रंट गुजरात रिजनल कॉन्फरन्समध्ये पाच मोठ्या घोषणा केल्या आहेत. अंबानी म्हणाले की, लवकरच जिओचे पिपल-फर्स्ट एआय प्लॅटफॉर्म लॉन्च होईल, जे गुजरातपासून सुरू होऊन प्रत्येक नागरिकाला त्याच्या भाषेत एआय सेवा देईल.

    Read more

    PM Modi : पीएम मोदी म्हणाले-राजकोटला मिनी जपान म्हणालो तेव्हा माझी खिल्ली उडवली, आज येथे स्क्रू ड्रायव्हरपासून रॉकेटपर्यंतचे भाग बनतात

    पंतप्रधान मोदी रविवारी म्हणाले की, भारताला जगात मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्यात सौराष्ट्र-कच्छचे मोठे योगदान आहे. राजकोटमध्ये 2.50 लाखांहून अधिक MSME आहेत. येथे वेगवेगळ्या औद्योगिक क्लस्टर्समध्ये स्क्रू ड्रायव्हरपासून ते ऑटो पार्ट्स मशीन टूल्स, एरोप्लेन, फायटर प्लेन आणि रॉकेटपर्यंतचे पार्ट्स बनवले जातात.

    Read more

    Fadnavis : काँग्रेस बरोबरच सत्तेत राहून काँग्रेसवर दादागिरी करणाऱ्या अजितदादांकडून फडणवीसांची संयमाची अपेक्षा; हा राजकीय विनोद की…??

    महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांनी घेतलेल्या मैत्रीपूर्ण लढतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून संयमाची अपेक्षा केली होती. प्रत्यक्षात त्यांचा संयम ढळला आणि अजितदादांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे बेछूट आरोप केले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये वेगळी स्ट्रॅटेजी करावी लागली.

    Read more

    Nitesh Rane : मंत्री नीतेश राणेंच्या बंगल्याजवळ बेवारस बॅग आढळल्याने खळबळ, खुलाशात समोर आली अनोखी गोष्ट

    रविवार, ११ जानेवारी २०२६ रोजी दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्हवरील मंत्री नितेश राणे यांच्या बंगल्याजवळ मुंबई पोलिस आणि बॉम्ब निकामी पथकाला (बीडीडीएस) एक बेवारस बॅग सापडली. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, सुरक्षा कर्मचाऱ्यांना सकाळी ९:३० वाजता नोकरांच्या क्वार्टरजवळ एक संशयास्पद बॅग दिसली आणि त्यांनी पोलिसांना कळवले, ज्यामुळे घेराबंदी आणि झडती घेण्यात आली. तपासादरम्यान, बॅगमध्ये बूट, कपडे आणि बॅग मोकळी असल्याचा दावा करणारी चिठ्ठी आढळली.

    Read more

    Iran Protests : इराण हिंसाचार- 538 जणांचा मृत्यू, 10 हजार जणांना अटक; इराणने अमेरिका आणि इस्रायलला दिली धमकी

    इराणमध्ये १५ दिवस चाललेल्या हिंसक निदर्शनांमध्ये आतापर्यंत ५३८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०,६०० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. एपी वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मृतांमध्ये ४९० निदर्शक आणि ४८ सुरक्षा कर्मचारी आहेत. या निदर्शनांमध्ये, इराणने अमेरिकेला इशारा दिला आहे की, जर त्यांनी हल्ला केला तर ते अमेरिकन सैन्य आणि इस्रायलला लक्ष्य करतील.

    Read more

    Mahayuti BMC : महापालिकेसाठी महायुतीचा वचननामा- मुंबई झोपडपट्टी मुक्त करणार:बेस्ट बसच्या तिकीटात महिलांना 50 टक्के सूट

    मुंबई महापालिकेसाठी महायुतीकडून वचननामा जाहीर करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजप व शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी मुंबईमधल्या मराठी माणसांसाठी तसेच येथील गिरणी कामगारांसाठी हक्काचे घर तयार करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच लाडक्या बहिणींना बेस्ट बसच्या तिकीटात 50 टक्के सूट देण्याचे आश्वासन महायुतीच्या वचननाम्यातून देण्यात आले आहे.

    Read more

    Prakash Mahajan : तुमच्या डोक्यावर कोणी नाही म्हणून बेलगाम; राज ठाकरेंच्या आरोपांवर प्रकाश महाजनांचा घणाघात; उद्धव ठाकरेंवरही निशाणा

    मुंबई विमानतळ बंद करण्यात येऊन ती जागा हडपण्याचा डाव असल्याची शंका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उपस्थित केली होती. राज ठाकरेंनी केलेल्या या आरोपावर आता शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पलटवार केला आहे. मुंबईतील सांताक्रुज विमानतळ बंद झाले, ते काय विकले का सरकारने? असा सवाल महाजन यांनी राज ठाकरेंना उद्देशून विचारला आहे.

    Read more

    BMC Election 2026 : निवडणूक कर्तव्यात कसूर करणाऱ्या 4,521 कर्मचाऱ्यांवर आजपासून पोलिस कारवाई, एकूण 6 हजार 871 अधिकारी-कर्मचाऱ्यांना नोटिसा

    मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त असूनही प्रशिक्षणास आणि कर्तव्यावर गैरहजर राहणाऱ्या ४ हजार ५२१ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर उद्या, सोमवारपासून थेट पोलिस कारवाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी या संदर्भात कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

    Read more