• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 129 of 1423

    Pravin Wankhade

    Raghuram Rajan : रघुराम राजन म्हणाले- रशियन तेल खरेदीबाबत पुन्हा विचार व्हावा; याचा फायदा कोणाला?

    रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन म्हणाले की, भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या धोरणावर पुनर्विचार करावा. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत राजन म्हणाले की, रशियाकडून तेल खरेदी करून कोणाला फायदा होत आहे आणि कोणाचे नुकसान होत आहे, हे आपण विचारले पाहिजे.

    Read more

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

    कुठल्याच निवडणुकीमध्ये कुठलेच यश मिळत नाही म्हणून राहुल गांधी आता एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील ते विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!‌ बिहार मधल्या मतदार अधिकार यात्रेतून दिसलेल्या चित्राचा खरा अर्थ आहे.

    Read more

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    राहुल गांधींची वोटर अधिकार यात्रा बिहारमधील चिरैया आणि ढाका येथे पोहोचली, तेव्हा राजकीय वातावरण तापले. शिवहरच्या खासदार लवली आनंद यांनी या यात्रेला पूर्णपणे अपयशी ठरवले आणि काँग्रेसवर दशकांपासून देशातील जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला.

    Read more

    Laxman Hake : महाराष्ट्रात अराजकता निर्माण होऊ शकते; लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना इशारा

    मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनोज जरांगे त्यांच्या समर्थांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर ते उपोषण करणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. यातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका करत थेट इशारा दिला आहे.

    Read more

    मनोज जरांगेंच्या आंदोलनात पवार + ठाकरेंचे नेते घुसले; पण ओबीसीतून मराठ्यांना आरक्षणाबाबत पवार + ठाकरेंची भूमिका संशयाच्या घेण्यात!!

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठा मुंबईत दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर पवार आणि ठाकरे यांच्या नेत्यांनी त्या आंदोलनात घुसखोरी केली आहे. पण त्याचवेळी पवार आणि ठाकरे यांची ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत भूमिका मात्र संशयाच्या घेऱ्यात आली आहे‌

    Read more

    न्यायालयाच्या निर्णयानंतरही मनाेज जरांगेंचा अडेलतट्टूपणा कायम, आझाद मैदानातून उठणार नसल्याची भूमिका

    उच्च न्यायालयाने मराठा आंदाेलक मनाेज जरांगे यांना पाेलीसांच्या परवानगीशिवाय आझाद मैदानात आंदाेलन करण्यास परवानगी नाकारली हाेती.

    Read more

    मराठा आंदोलनामुळे मुंबईत वाहतूक कोंडी; मुंबई पोलिसांनी जारी केली ट्रॅफिक ॲडव्हायझरी!!

    आझाद मैदानापासून ते पार मुंबईच्या वेशीपर्यंत मराठा मोर्चा मुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली असून त्यामुळे गणेश भक्तांची मोठी पंचाईत झाली आहे.

    Read more

    Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंच्या गणपतीचे दर्शन; ठाकरे बंधूंच्या वाढत्या भेटीवर लगावला टोला

    गणेश चतुर्थीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे प्रथमच शिवतीर्थावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घ्यायला गेले होते. तसेच दोन्ही नेत्यांच्या कुटुंबीयांनी स्नेहभोजन देखील केले होते. त्यानंतर आज शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आज राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जात गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

    Read more

    Ramdas Athawale : मंत्री रामदास आठवलेंचा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा; रिपाइंचा ठराव मंजूर

    मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. महाबळेश्वर येथे झालेल्या राज्यस्तरीय विचारमंथन शिबिरात मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत एकमताने हा पाठिंब्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

    Read more

    MLA Amol Khatal : शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला; मंत्री विखे पाटलांनी केला हल्ल्याचा निषेध

    शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. संगमनेर फेस्टिव्हलच्या उद्घाटनावेळी हा हल्ला झाल्याची माहिती आहे. या कार्यक्रमात गेले असता अमोल खताळ यांच्याशी हात मिळवण्यासाठी एक तरुण आला आणि यावेळी त्याने हल्ला केला असल्याचे समजते. मात्र, या हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे.

    Read more

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत म्हणाले- भाजप आणि संघ यांच्यात कोणताही वाद नाही. आमचे फक्त भाजप सरकारशीच नाही, तर सर्व सरकारांशी चांगले संबंध आहेत.सरकारमध्ये निर्णय घेण्याच्या प्रश्नावर भागवत म्हणाले की, सरकारमध्ये सर्व काही संघ ठरवतो असे म्हणणे चुकीचे आहे. आपण सल्ला देऊ शकतो, पण निर्णय ते घेतात. जर आपण निर्णय घेतला असता तर इतका वेळ लागला नसता.

    Read more

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत- कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही; पण मराठा नेत्यांनी अभ्यास करून मागणी करावी

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी ही मराठा समाजासाठी हिताची नाही, असे ते म्हणालेत. तसेच मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजावर अन्याय होणार नाही, याची काळजी सरकार घेईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मराठा समाजाच्या नेत्यांनी अभ्यास करून मागणी करावी, असा टोलाही त्यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे जरांगेंना हाणला.

    Read more

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    सरकारने आता प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर आत्मनिर्भर निधी म्हणजेच पीएम स्वनिधी योजना २०३० पर्यंत वाढवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम स्वनिधी योजनेची पुनर्रचना करण्याचा म्हणजेच त्यात आणखी सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, कर्जाचा कालावधी ३१ डिसेंबर २०२४ वरून ३१ मार्च २०३० पर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

    Read more

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही

    केंद्र सरकारने म्हटले की, विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकांवर राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या कारवाईविरुद्ध राज्ये सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत. केंद्राने म्हटले की, राज्य सरकारे कलम ३२ वापरू शकत नाहीत. कारण मूलभूत अधिकार सामान्य नागरिकांसाठी आहेत, राज्यांसाठी नाहीत.

    Read more

    Cotton : कापड व्यापारी 31 डिसेंबरपर्यंत टॅरिफमुक्त कापूस आयात करू शकतील; वस्त्रोद्योग क्षेत्राला 50% अमेरिकन टॅरिफपासून वाचवण्याचा निर्णय

    केंद्रातील मोदी सरकारने कापसाच्या शुल्कमुक्त आयातीला आणखी तीन महिने मुदतवाढ दिली आहे. आता कापड व्यापारी ३१ डिसेंबरपर्यंत आयात शुल्काशिवाय परदेशातून कापूस आयात करू शकतील. यापूर्वी सरकारने १९ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरपर्यंत यासाठी सूट दिली होती. कापड व्यापाऱ्यांना ५०% अमेरिकन टॅरिफच्या बोज्यातून दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

    Read more

    Justice Nagaratna : न्यायमूर्ती नागरत्ना SCच्या कॉलेजियमशी असहमत; न्यायमूर्ती विपुल पंचोलींच्या SCत नियुक्तीवर आक्षेप

    पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विपुल मनुभाई पंचोली यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याच्या कॉलेजियमच्या शिफारशीला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बी.व्ही. नागरत्ना यांनी मंगळवारी तीव्र विरोध नोंदवला.

    Read more

    जेव्हा संघाने चालविल्या होत्या काँग्रेसच्या NSUI अधिवेशनसाठी खानावळी; डॉ. मोहन भागवतांनी सांगितली त्यांची कहाणी!!

    जेव्हा संघाने चालविल्या होत्या काँग्रेसच्या NSUI अधिवेशनासाठी खानावळी; डॉ. मोहन भागवत यांनी सांगितली त्यांची कहाणी!!, असे आज राजधानी नवी दिल्लीत घडले.

    Read more

    Commonwealth Games : 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारत बोली लावणार; मंत्रिमंडळाची मंजुरी, अंतिम मुदत 31 ऑगस्ट

    २०३० मध्ये अहमदाबादेत होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी भारत दावा करणार आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने बोली प्रस्तावाला मान्यता दिली. यापूर्वी १४ ऑगस्ट रोजी भारतीय ऑलिंपिक संघटनेने (IOA) याला मान्यता दिली होती. आता भारताला ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम बोली प्रस्ताव सादर करावा लागेल. यजमानपद द्यायचे की नाही हे नोव्हेंबरच्या अखेरीस ठरवले जाईल.

    Read more

    Dr. Mohan Bhagwat : संघ सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??; कानपिचक्या की सूचना??

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??, असा परखड सवाल करून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संवादामध्ये उपस्थित असलेल्या सगळ्यांची आणि प्रश्नकर्त्यांची फिरकी घेतली. संघ संवादात तिसऱ्या दिवशी मोहन भागवत यांनी अनेक सवालांची स्पष्ट उत्तरे दिली. त्यापैकीच एक सवाल संघ आणि भाजप यांच्या संबंधांमधला होता. भाजपच्या सगळ्या गोष्टी संघच ठरवत असतो, असे एक विधान त्या सवालात होते.

    Read more

    मराठा आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्या‌ राजकीय पक्षांचे होईल मोठे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा!!

    मराठा आरक्षणाच्या आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जे फायदे उपटायला पाहात आहेत, त्यांचा फायदा होणार नाही. मोठे नुकसानच होईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला‌.

    Read more

    France Returns King Toera : फ्रान्सने मादागास्करच्या राजाची कवटी परत केली; 128 वर्षांपूर्वी शिरच्छेद करून फ्रेंच सैनिकांनी नेली होती

    फ्रान्सने वसाहतकालीन तीन कवट्या मादागास्करला परत केल्या आहेत. यापैकी एक कवटी मालागासी राजा टोएरा यांची असल्याचे मानले जाते१८९७ मध्ये, फ्रेंच सैनिकांनी राजा टोएरा यांचा शिरच्छेद केला. त्यावेळी फ्रान्सने ती ट्रॉफी म्हणून पॅरिसला नेली आणि राष्ट्रीय इतिहास संग्रहालयात ठेवली. इतर दोन कवट्या सकलावा वांशिक गटाच्या आहेत.

    Read more

    Jammu Kashmir : भूस्खलनातील मृतांमध्ये 34 वैष्णोदेवी यात्रेकरू; जम्मू-काश्मिरात पावसाचा कहर; 41 ठार, पुरामुळे रस्ते-पूल तुटले

    गेल्या दोन दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये पाऊस व पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसासंबंधी दुर्घटनांमुळे मृतांचा आकडा ४१ वर पोहोचला आहे. त्यापैकी ३४ भाविक वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जात होते. त्यांचा वाटेत भूस्खलन झाल्याने मृत्यू झाला.

    Read more

    US Treasury अमेरिकेचे अर्थमंत्री म्हणाले- भारतासोबत चांगला करार करू; दोन्ही देशांत चांगले संबंध; 50% टॅरिफवर भारतानेही दिली प्रतिक्रिया

    भारतासोबतच्या टॅरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिका भारतासोबत चांगला करार करू शकेल अशी आशा बाळगून आहे. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांनी बुधवारी एका मुलाखतीत सांगितले की, भारत-अमेरिका संबंध खूपच गुंतागुंतीचे आहेत, परंतु त्यांना विश्वास आहे की दोन्ही देश अखेर एकत्र येतील.

    Read more

    मोदी ट्रम्प पुढे झुकले म्हणून राहुल गांधींची टीका; पण अमेरिकेपुढे झुकायचा रघुराम राजन यांचा सल्ला; हा खरा काँग्रेसची डबल ढोलकीचा बाजा!!

    भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या युद्धात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे झुकले असा दावा करून राहुल गांधींनी त्यांच्यावर टीका केली

    Read more

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- संघाइतका विरोध कोणत्याही संघटनेला झाला नाही, तरीही स्वयंसेवकांच्या मनात समाजाबद्दल प्रेम, म्हणून विरोधाची धार कमी झाली!

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी सांगितले की- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाइतका विरोध इतर कोणत्याही संघटनेला झालेला नाही. असे असूनही, स्वयंसेवकांना समाजाबद्दल शुद्ध सात्विक प्रेम आहे. या प्रेमामुळे आता आमच्या विरोधाची तीव्रता कमी झाली आहे.

    Read more