Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सत्य पचवत नाहीत तोपर्यंत त्यांचा पराभव होत राहणार
जोपर्यंत हे लोक सत्य पचवत नाहीत तोपर्यंत त्यांचा पराभव होत राहणार, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला आहे.बिहारच्या निवडणुकीत भाजप व एनडीए आघाडीने विक्रमी बहुमत मिळविले आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजप आणि एनडीए या सर्व घटक पक्षांच्या बिहार युनिटचे मी अभिनंदन करतो आणि बिहारच्या जनतेचे आभार मानतो. त्यांनी मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन, नितीश कुमार यांच्या सुशासनावर विश्वास ठेऊन आणि आमच्या घटक पक्षाला त्या ठिकाणी एनडीएच्या माध्यमातून प्रचंड मोठे बहुमत दिले आहे. 2010 चा सुद्धा रेकॉर्ड तुटू शकेल इतके बहुमत मिळाले आहे.