• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 100 of 1317

    Pravin Wankhade

    Mahua Moitra : TMC MP महुआ मोईत्रा BJD नेत्याशी विवाहबद्ध; पिनाकी मिश्रा पुरीचे माजी खासदार

    तृणमूल काँग्रेसच्या लोकप्रिय खासदार महुआ मोईत्रा यांनी बीजेडी नेते पिनाकी मिश्रा यांच्याशी दुसऱ्यांदा लग्न केले आहे. दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. असा दावा केला जात आहे की दोघांनी ३ मे रोजी जर्मनीमध्ये लग्न केले. तथापि, हा सोहळा पूर्णपणे खासगी ठेवण्यात आला.

    Read more

    Bengaluru : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई, RCBचा मार्केटिंग हेड अटक

    बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. त्याअंतर्गत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मार्केटिंग हेड निखिल सोसाळे यांना अटक करण्यात आली आहे. तो मुंबईला पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. तथापि, तो विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याशिवाय इतर तीन जणांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या बंगळुरू पोलिस चौकशी करत आहेत. बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

    Read more

    Kamal Hasan : राज्यसभा निवडणुकीसाठी कमल हसन यांनी दाखल केला अर्ज

    प्रसिद्ध अभिनेते आणि एमएनएम प्रमुख कमल हसन यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन देखील उपस्थित होते

    Read more

    PM Modi : ‘NDA’ला ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान मोदींचा देशाला खास संदेश

    एनडीएच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तरुणांना संदेश दिला. त्यांच्या सरकारच्या प्रयत्नांची माहिती देताना पंतप्रधान मोदी यांनी तरुणांना सक्षम करण्याबद्दल सांगितले आहे. ते म्हणाले की आज तरुण राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत याचा मला आनंद आहे.

    Read more

    Mohan Bhagwat : दबावाने धर्मांतर म्हणजे हिंसा, स्वेच्छेने केल्यास हरकत नाही, सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत

    दबावाने किंवा लोभाने धर्मांतर घडवणे ही एक प्रकारची हिंसाच आहे. मात्र, जर एखाद्याने स्वेच्छेने धर्मांतर केले तर त्यास संघाचा विरोध नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

    Read more

    Rahul Gandhi : राहुल गांधांच्या ‘त्या’ विधानावरून दिव्यांगजण संतप्त; कारवाई झाली नाहीतर संसदेपर्यंत धडकणार!

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लंगड्या घोड्याच्या विधानावरून मध्य प्रदेशात गोंधळ सुरू झाला आहे. राहुल गांधींच्या शब्दांवर दिव्यांगांनी आक्षेप घेतला आहे आणि ते अपमानास्पद म्हटले आहे.

    Read more

    Satish Shukla : पुरोहित संघाचा वाद न्यायालयापर्यंत खेचण्याची खुमखुमी; अविश्वास ठराव मंजूर होऊनही सोडवेना खुर्ची!!

    गंगा गोदावरी पुरोहित संघाचा वाद न्यायालयापर्यंत खेचण्याची खुमखुमी; विश्वास ठराव मंजूर होऊनही सोडवेना खुर्ची!! असला प्रकार नाशिक मध्ये घडला.

    Read more

    Tharoor : थरूर म्हणाले- देशाच्या हितासाठी काम करणे पक्षविरोधी नाही, सीमेपलीकडे आम्ही फक्त भारतीय आहोत

    भारत सरकारच्या शिष्टमंडळाचा भाग म्हणून अमेरिका दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते शशी थरूर यांनी गुरुवारी पक्षविरोधी वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले – जे लोक राष्ट्रीय हितासाठी काम करणे पक्षविरोधी कृती मानतात, त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे.

    Read more

    Rekha Gupta : खळबळजनक! दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना जीवे मारण्याची धमकी

    आरोपीने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. Rekha Gupta विशेष प्रतनिधी नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतून सध्या मोठी बातमी समोर आली […]

    Read more

    Ahmadiyya Muslims : पाकिस्तानात अहमदिया मुस्लिमांना ईद साजरी करण्यास बंदी; 5 लाख रुपयांच्या दंडाची धमकी

    पाकिस्तानच्या सिंध आणि पंजाब प्रांतात, अहमदिया मुस्लिमांना ईद साजरी करण्यापासून रोखण्यासाठी शपथपत्रे भरण्यास भाग पाडले जात आहे. पंजाबमध्ये, अहमदियांना इशारा देण्यात आला आहे की जर त्यांनी ईद साजरी केली तर त्यांना 5 लाख रुपये दंड भरावा लागेल.

    Read more

    अजूनही “टाळी”, “पावले”, “फोन कॉल” पर्यंतच युतीची भाषा; पण ठाकरे बंधू अजूनही एकमेकांशी बोलेनात!!

    अजूनही “टाळी”, “पावले” आणि “फोन कॉल” या शब्दांपर्यंतच युतीची भाषा; पण ठाकरे बंधू अजूनही एकमेकांशी बोलेनात!!, अशी शिवसेना मनसे युतीची आजही अवस्था आहे.

    Read more

    Bhagwat : ऑपरेशन सिंदूरवर भागवत म्हणाले- सर्व पक्षांनी सहकार्य केले; सरकारने कारवाई केली आणि दोषींना शिक्षा झाली

    नागपूरमधील कामगार विकास कार्यक्रमानिमित्त पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, पहलगाम हल्ल्यानंतर दिसणारी राजकीय एकता कायम राहिली पाहिजे.

    Read more

    गवत खाऊन अणुबॉम्ब बनविण्याची भाषा करणाऱ्या आजोबाच्या नातवाची पाण्यावरून अणुबॉम्ब युद्धाची भाषा!!

    गवत खाऊन अणुबॉम्ब बनविण्याची भाषा करणाऱ्या आजोबाच्या नातवाने आता पाण्यावरून अणुबॉम्ब युद्ध भडकवणारी भाषा केली. पाकिस्तानी शिष्टमंडळाच्या अमेरिका भेटीत हे घडले.

    Read more

    Reserve Bank : रिझर्व्ह बँकेने रेपो रेट घटविला, गृह कर्जाचा हप्ता किती रुपयांनी कमी होणार??, सामान्यांना किती फायदा??, वाचा आकडा!!

    भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रेपो रेटमध्ये कपात केली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर याबाबतची घोषणा केली.

    Read more

    Delhi High Court : दिल्ली हायकोर्टाने म्हटले- फी न भरल्याबद्दल धमकी देऊ शकत नाहीत; शाळा केवळ उत्पन्नाचे साधन नाही

    शाळेची फी न भरल्याबद्दल ३१ विद्यार्थ्यांना निलंबित केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी दिल्ली पब्लिक स्कूल, द्वारकाला फटकारले. न्यायमूर्ती सचिन दत्ता यांच्या एकल खंडपीठाने म्हटले की, शाळेची फी न भरल्याबद्दल मुलांना धमकावता येणार नाही. अशा कृती मानसिक छळासारख्या आहेत आणि विद्यार्थ्यांचा स्वाभिमान दुखावतात.

    Read more

    Reserve Bank : रिझर्व्ह बँकेचा सर्वसामान्यांना दिलास! व्याजदरात ०.५० टक्के कपात; रेपो दर ५.५ टक्के झाला

    भारतीय रिझर्व्ह बँकेने आज सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कपात केली आहे. यावेळी RBI ने रेपो दरात ५० बेसिस पॉइंट्स म्हणजेच ०.५० टक्के कपात केली आहे.

    Read more

    Gaza : गाझा युद्धबंदी प्रस्तावाला अमेरिकेचा व्हिटो; म्हटले- इस्रायलला स्वतःचे रक्षण करण्याचा अधिकार

    गाझामध्ये युद्धबंदी लागू करण्याच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) ठरावाला अमेरिकेने व्हिटो केला आहे. बुधवारी UNSC मध्ये यासाठी मतदान झाले ज्यामध्ये १५ पैकी १४ देशांनी गाझामध्ये युद्धबंदीच्या बाजूने मतदान केले.

    Read more

    Bawankule’s : सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशावर बावनकुळेंचे स्पष्टीकरण, भाजपचे दरवाजे सर्वांसाठी खुले

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरूवारी नाशिकमध्ये बोलताना पक्षवाढीसाठी आपल्या पक्षाची कवाडे सर्वांसाठी खुली असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या सुधाकर बडगुजरांसाठी भाजपने अवघ्या 24 तासांतच आपले दरवाजे खुले केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक 15 ऑगस्टला लागेल, असा अंदाजही बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.

    Read more

    Fadnavis : फडणवीस सरकारचा धाडसी निर्णय; राज्यातील 903 योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द

    राज्याच्या तिजोरीवर माझी लाडकी बहीण योजनेचा ताण पडत असल्याच्या बातम्या चर्चेत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्यभरातील 903 योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. या योजनांची मागील 3 वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे अंमलबजावणी होत नव्हती. परिणामी, सरकारने या योजनाच गुंडाळण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे

    Read more

    CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘समृद्धी’चे लोकार्पण; नाव न घेता एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकमधील इगतपुरी ते ठाण्यातील आमणे पर्यंतच्या 76 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन आज झाले आहे. यामुळे एका अर्थाने मागील वेळी मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी पाहिलेले स्वप्न आता पूर्ण झाले आहे. यामुळे नागपूर ते मुंबई मधील अंतर कमी झाले असून वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.

    Read more

    Supriya Sule’s : भारताच्या भूमिकेची जागतिक स्तरावर ठाम मांडणी; शिष्टमंडळाच्या दौऱ्यानंतर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य

    पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून कठोर कारवाई केली. या कारवाईनंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरोधात अपप्रचार सुरु केला. याला उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारने भारताचा स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोन जागतिक पातळीवर मांडण्यासाठी सर्वपक्षीय खासदार आणि निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवले.

    Read more

    Elon Musk : ‘मी नसतो तर ट्रम्प निवडणूक जिंकले नसते’

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क रिपब्लिकन कर विधेयकावरून समोरासमोर आले आहेत. त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाल्याचे दिसून येते. डोनाल्ड ट्रम्प यांनी कर विधेयकावर नाराजी व्यक्त केली तेव्हा मस्क यांनी असे उत्तर दिले, की जर ते नसते तर डोनाल्ड ट्रम्प निवडणूक जिंकले नसते.

    Read more

    Congress : काँग्रेसच्या कर्मावर आणि भाजपच्या वर्मावर बोट ठेवत तिसऱ्या आघाडीला तोंड फुटले!!

    लोकसभा निवडणूक अजून 4 वर्षे लांब आहे. काही राज्यांच्या निवडणुका 2025 – 26 मध्ये आहेत, पण त्यांचा परिणाम लोकसभा निवडणुकीपर्यंत टिकेलच याची कुठलीही गॅरंटी नाही. त्यामुळे तिसऱ्या आघाडीची चर्चा दूरच्या राजकीय क्षितिजावर पण दिसत नव्हती.

    Read more

    Devendra Fadnavis : जोतिबा डोंगर परिसरातील जंगल पुन्हा ‘दख्खन केदारण्य’ या नावाने निर्माण करण्याचा संकल्प!

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते जोतिबा डोंगर (कोल्हापूर) येथे राष्ट्रीय महामार्ग, वनविभाग, जिल्हा प्रशासन व पश्चिम देवस्थान समिती कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 10,000 वृक्षारोपण कार्यक्रम, ‘दख्खन केदारण्य’ची निर्मिती व श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरणाचा (ऑनलाईन) शुभारंभ पार पडला.

    Read more

    Rahul Gandhi : राहुल गांधींनी हरियाणात जाऊन मारल्या merit च्या बाता; पण उथळ काँग्रेसने शेअर केल्या Narender – Surrender च्या टोप्या!!

    राहुल गांधींनी हरियाणात जाऊन मारल्या मेरीच्या बाता; पण उथळ काँग्रेसने शेअर केल्या Narender – Surrender च्या टोप्या!! असे एकाच दिवशी घडले.

    Read more