• Download App
    धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधान मोदींची स्तुती; शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट अभिजीत दिपकेच्या घरी!! – The Focus India

    धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधान मोदींची स्तुती; शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट अभिजीत दिपकेच्या घरी!!

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती आणि त्याच दिवशी शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट अभिजीत दिपकेच्या घरी!!, या दोन समांतर राजकीय घडामोडी आज घडल्या.

    नीट पेपर फुटी विरोधात कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला प्रतिसाद देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यायला लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तो निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. नरेंद्र मोदींनी युवकांच्या भावनांना प्राधान्य दिले‌ आणि त्यांनी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला, असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी आज केले.

    – संजय शिरसाट अभिजीत दिपकेच्या घरी

    पण आज दुपारी छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री संजय शिरसाट यांनी कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दिपके याच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी जाऊन त्याच्या पालकांची भेट घेतली. अभिजित दिपके याचे वडील भगवान शंकर दिपके यांनी संजय शिरसाट यांचे स्वागत केले. शिरसाट यांनी निवासस्थानी दिलेल्या भेटीबाबत भगवान दिपके यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “आमच्यासाठी संजय शिरसाट हे आधी नातेवाईक आहेत आणि मग ते मंत्री आहेत.

    ते आम्हाला फोन का करत नाहीत किंवा घरी का येत नाहीत??, असा मला प्रश्न पडायचा; पण त्यांच्या या भूमिकेचा मला खरोखरच अभिमान वाटतो. त्यांनी स्पष्ट केले की, जर त्यांनी त्या काळात आम्हाला फोन केला असता किंवा भेटायला आले असते, तर इतरांनी त्याचा चुकीचा अर्थ काढला असता; म्हणूनच, आम्हाला भेटण्याची तीव्र इच्छा असूनही त्यांनी तसे करणे टाळले. इतके जवळचे नाते असूनही आम्हाला भेटता किंवा फोनही करता येत नाही, याचे त्यांना नक्कीच खूप दुःख झाले असणार. आपले मन मोकळे करण्यासाठी ते स्वतःहून आमच्याकडे आले, ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोलाची आहे.”

    Shinde Sena Minister Sanjay Shirsat visits Abhijit Dipke’s home!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : दगड व्यावसायिकाच्या घरी 28 कोटी रोकड, 15 किलो सोने सापडले; नोटा मोजता-मोजता 5 मशीन खराब झाल्या; आरोपीला अटक

    PM Narendra Modi : पंतप्रधान म्हणाले- प्रत्येक राज्य पेपरफुटीमुळे त्रस्त; शिक्षणासंदर्भात सातत्याने पावले उचलत आहोत; दोन्ही सभागृहांमध्ये पेपरफुटी सुधारणा विधेयक मंजूर

    Lovpreet Singh : लवप्रीतची CWG मध्ये रौप्य पदकावर मोहोर; वेटलिफ्टिंगमध्ये 388 किलो वजन उचलले; डिस्कस थ्रोमध्ये सीमाला कांस्यपदक