• Download App
    Sharad Pawar मोदी तिकडे पाकिस्तानला कायमचा धडा शिकवायच्या बेतात; पवार इकडे दहशतवाद्यांच्या धर्मांधतेच्या चिखलात!!

    मोदी तिकडे पाकिस्तानला कायमचा धडा शिकवायच्या बेतात; पवार इकडे दहशतवाद्यांच्या धर्मांधतेच्या चिखलात!!

    नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी तिकडे पाकिस्तानला धडा शिकवायच्या बेतात आलेत, पण शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते मोदींच्या पाठीशी ठाम उभे राहून त्यांना “मार्गदर्शन” करण्याऐवजी दहशतवाद्यांच्या धर्मांधतेच्या चिखलातच अडकलेत!!

    पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या घातल्या. पण पाकिस्तानला कायमचा धडा शिकवायचा इशारा देताना पंतप्रधान मोदींनी कुठेही धर्म – जातपात अशी भाषा वापरली नाही. त्यांनी फक्त पाकिस्तानला संपवायचेच टार्गेट भारतीय सैन्य दलांना दिले, पण शरद पवारांनी मात्र दहशतवाद्यांचा धर्म विचारू नका, अशा धोशा लावला. वास्तविक शरद पवार ज्या गनबोटे आणि जगदाळे कुटुंबांना पुण्यात भेटले होते त्या दोन्ही कुटुंबांनी शरद पवारांना दहशतवाद्यांनी हिंदू म्हणूनच गोळ्या घातल्या, असे स्पष्ट सांगितले होते. पण तरी देखील शरद पवारांनी दहशतवाद्यांना धर्म नसतो. दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या घातल्या की नाही माहिती नाही, असे बोलून सगळ्या महाराष्ट्राची दिशाभूल केली.

    तिकडे मोदींनी तिकडे मोदींनी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय सैन्य दलांना पूर्णपणे मोकळी दिली. भारतीय सैन्य दलाने त्यांची टार्गेट्स, वेळ आणि मोडस ऑपरेंडी ठरवावी. त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप बिलकुल होणार नाही, अशी ग्वाही दिली. त्यावेळी देखील मोदींनी कुठेही जात धर्म यांचा उल्लेख देखील केला नाही. मोदींनी सर्व वरिष्ठ मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका घेतल्या. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय परिस्थितीपासून ते देशांतर्गत कायदा सुव्यवस्थे पर्यंत आणि देशाच्या आर्थिक स्थिती पर्यंत सर्व विषयांवर चर्चा केली, पण कुठेही जात – धर्म या विषयावर चर्चा केली नाही. त्यांनी सर्व बैठकांमध्ये फक्त पाकिस्तानला धडा शिकवण्याची बात केली, देशहितापलीकडे ते कुणाशी काहीही बोलले नाहीत. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देखील मोदींची भेट घेतली. या दोघांच्या चर्चेतले कुठलेही तपशील बाहेर आले नाहीत तरीदेखील दोघांमध्ये देशहिताच्या विषयांपेक्षा अन्य कुठली चर्चा झाली असेल, असा कुणी कयास बांधला नाही.

    पण या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पुन्हा एकदा दहशतवाद्यांचा धर्म आणि हत्या झालेल्यांचा धर्म याच विषयाच्या चर्चेचे गुऱ्हाळ मांडले. पहलगामात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याबाबत चर्चा करताना त्यामध्ये कुठेही जात – धर्म चर्चेत आणू नका, असे शरद पवार आज पुन्हा एकदा म्हणाले.‌ ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रेरणेतून बांधलेल्या प्रति तुळजापूर मंदिरात त्यांनी तुळजाभवानीची पूजा केली. पूजेचे अवडंबर माजवायला मला आवडत नाही, असे त्यांनी सांगितले. पण त्यांनी केलेल्या वक्तव्याचा सगळा भर दहशतवाद्यांचा धर्म आणि हत्या झालेल्यांचा धर्म याच विषयावर राहिला.

    Sharad Pawar again covered up Islamic terrorism in Pahalgam

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    RSS chief Mohan Bhagwat प्रचंड राजकीय धकाधकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत मोदींच्या भेटीला; दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा, पण नेमके गूढ काय??

    PM Modi : पाकिस्तानात घुसून मारताना भारतीय सैन्य दलांमध्ये आता राजकीय हस्तक्षेप नाही, पण तो केव्हा आणि कुणी केला होता??

    Pahalgam attack : एकीकडे काँग्रेसचा मोदी सरकारला पाठिंब्याचा दावा; दुसरीकडे सरकारच्या आक्रमक रणनीतीत खोडा घालायचा कावा!!