• Download App
    मुखर्जी कन्येची मोदीस्तुती काँग्रेस जनांना पुन्हा खटकली!! – The Focus India

    मुखर्जी कन्येची मोदीस्तुती काँग्रेस जनांना पुन्हा खटकली!!

    नाशिक : मुखर्जी कन्येची मोदीस्तुती काँग्रेस जनांना पुन्हा खटकल्याचा प्रकार आज समोर आला. वास्तविक यात नवल काही नाही. कारण कुठलेही काँग्रेस नेते पक्षाकडून काही मिळायचे शिल्लक राहिले नसल्यानंतर परखड होतात आणि पक्षाच्या विरोधात बोलतात किंवा गांधी परिवाराच्या राजकीय अवगुणांच्या विरोधात लिहितात. पण तरीसुद्धा विद्यमान काँग्रेस जणांना जुन्या काँग्रेस नेत्यांचे बोलणे किंवा लिहिणे खटकत राहते.

    – शर्मिष्ठा मुखर्जींचा लेख

    तसेच काहीसे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी इंडियन एक्सप्रेस मध्ये लिहिलेल्या लेखावरून झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीला बारा वर्षे पूर्ण झाल्यानंतर शर्मिष्ठा मुखर्जी यांनी प्रणव मुखर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्या राजकीय नात्यावर प्रकाश टाकणारा लेख इंडियन एक्सप्रेस मध्ये लिहिला. यामध्ये प्रणव मुखर्जींनी 2014 चा मोदींचा विजय कोणत्या दृष्टीने पाहिला?, याविषयी सविस्तर वर्णन केले. अर्थातच मोदींना त्यांच्या नावावर भाजपला बहुमत मिळवून देता आले हे वेगळेपण प्रणव मुखर्जींनी त्यांना सांगितले असल्याचा उल्लेख शर्मिष्ठा मुखर्जी यांनी लेखात केला. बाकी मोदींच्या नेतृत्वाची स्तुती त्यांच्या कामगिरीविषयीची कौतुकाची थाप या सगळ्या बाबी लेखात समाविष्ट राहिल्या.

    शर्मिष्ठा मुखर्जी यांनी लिहिलेल्या लेखावर काँग्रेस जणांनी नाराजी व्यक्त केली. अनेकांनी ती बोलून सुद्धा दाखविली.

    पण शर्मिष्ठा मुखर्जी यांनी मोदींची आज केलेली स्तुती ही काही पहिलीच नव्हती, किंबहुना प्रणव मुखर्जींच्या राष्ट्रपतीपदाच्या कारकिर्दी पासूनच विशेषत: कारकिर्दीच्या उत्तरार्धापासून मुखर्जी पिता – कन्येने मोदींची स्तुती अनेकदा केली. प्रणव मुखर्जी तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात दसऱ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.

    – मुखर्जी आणि काँग्रेस यांच्यातले अंतर

    त्याच वेळेपासून प्रणव मुखर्जी त्यांचे कुटुंबीय आणि काँग्रेस यांच्यातले राजकीय अंतर वाढत गेले. पण प्रणव मुखर्जी चतुर राजकारणी असल्यामुळे त्यांनी काँग्रेस कडून मिळवायची सगळी पदे उपभोगल्यानंतर परखड राजकीय भूमिका स्वीकारली. त्यातूनच त्यांनी राहुल गांधींच्या अवगुणांवर टिप्पणी करणारे लेखन केले‌. शर्मिष्ठा मुखर्जी यांनी त्यांची डायरी नंतर प्रकाशित केली. शर्मिष्ठा मुखर्जी यांना सुद्धा काँग्रेसने दिल्ली विधानसभेची उमेदवारी दिली होती. पण त्या काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक हरल्या. 2021 मध्ये त्यांनी काँग्रेस मधून राजकीय संन्यास घेतला. त्यानंतरच त्यांनी काँग्रेसच्या काही विशिष्ट धोरणांच्या विरोधात लिखाण केले. मुलाखती दिल्या आणि त्या काँग्रेस पासून वैचारिक दृष्ट्या सुद्धा अलग झाल्या.

    – काँग्रेस जन reluctant

    शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आज इंडियन एक्सप्रेस मध्ये लिहिलेल्या लेखात नवीन मुद्दा फारसा कुठला आढळला नाही. त्यांनी केलेली मोदी स्तुती सुद्धा नवीन नाही. पण तरीसुद्धा काँग्रेस जनांना ही मोदी स्तुती खटकली, पण त्यांनी मुखर्जी परिवाराला सर्व राजकीय लाभ काँग्रेसने दिले. ते लाभ भोगून झाल्यानंतर मुखर्जी परिवार काँग्रेसवर उलटला, हे राजकीय वास्तव सांगायला सध्याचे काँग्रेस जन थोडे बिचकले. त्यांनी आडून-आडून शर्मिष्ठा मुखर्जींच्या लेखावर टीका केली.

    Mukherjee’s daughter’s praise for Modi has once again irked Congress members!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : दगड व्यावसायिकाच्या घरी 28 कोटी रोकड, 15 किलो सोने सापडले; नोटा मोजता-मोजता 5 मशीन खराब झाल्या; आरोपीला अटक

    PM Narendra Modi : पंतप्रधान म्हणाले- प्रत्येक राज्य पेपरफुटीमुळे त्रस्त; शिक्षणासंदर्भात सातत्याने पावले उचलत आहोत; दोन्ही सभागृहांमध्ये पेपरफुटी सुधारणा विधेयक मंजूर

    Lovpreet Singh : लवप्रीतची CWG मध्ये रौप्य पदकावर मोहोर; वेटलिफ्टिंगमध्ये 388 किलो वजन उचलले; डिस्कस थ्रोमध्ये सीमाला कांस्यपदक