• Download App
    TVK : मुख्यमंत्री विजयचा शपथविधी समारंभातच फुल टू इमोशनल ड्रामा; राहुल गांधींबरोबरही सेल्फी व्हिडिओ रेकॉर्ड!! – The Focus India

    TVK : मुख्यमंत्री विजयचा शपथविधी समारंभातच फुल टू इमोशनल ड्रामा; राहुल गांधींबरोबरही सेल्फी व्हिडिओ रेकॉर्ड!!

    नाशिक : TVK मुख्यमंत्री विजयचा शपथविधी समारंभातच फुल टू इमोशनल ड्रामा; राहुल गांधींबरोबरही सेल्फी व्हिडिओ रेकॉर्ड!!, हे सगळे आज सकाळी चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियम मध्ये घडले. C Joseph Vijay

    – शपथ घेण्यापूर्वी विजयचे इमोशनल भाषण

    TVK पक्षाचा नेता थलपती विजय जोसेफ याने चेन्नई मधल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियम मध्ये एका जंगी समारंभात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण ती शपथ घेताना आणि शपथ घेतल्यानंतर त्याने फुल टू इमोशनल ड्रामा केला. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी राज्यघटनेनुसार मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यापूर्वी विजय याने भर स्टेजवरून इमोशनल भाषणाला सुरुवात केली. मी कुठल्या राजघराण्यात जन्माला आलो नाही. मी तुमच्यासारखाच एक सर्वसामान्य माणूस आहे. मी कुठला देवदूत नाही. आपण सगळी माणसे आहोत. सर्वसामान्य माणसे आल्यानंतर एकत्र आल्यानंतर आपण काही संकटाशी टक्कर घेऊ शकतो, असे त्याने सांगितले.

    – विजय भाषण करत राहिल्याने राज्यपाल अस्वस्थ

    पण विजय जोसेफ याने मुख्यमंत्री पदाची घटनात्मक शपथ वाचण्याऐवजी विजयने भाषण सुरू केलेले पाहून राज्यपाल राजेंद्र अर्लेकर अस्वस्थ झाले. त्यांनी विजयला मध्येच टोकले. तुम्ही राज्यघटनेने लिहून दिलेली शपथ वाचा. त्यातले शब्द जसेच्या तसे म्हणा असे राज्यपालांनी विजयला स्टेजवरच बजावले. त्यानंतर विजयने राज्यघटनेने लिहून दिलेली मुख्यमंत्री पदाची शपथ वाचली. त्या शपथपत्रावर सही केली. त्यानंतर राज्यपालांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्री विजय याचे स्वागत आणि अभिनंदन केले.

    – नऊ मंत्र्यांना शपथ

    पण विजय जोसेफ याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वीच केलेल्या इमोशनल ड्रामा भाषणामुळे शपथविधी समारंभाला वेगळेच वळण लागले. ते सगळे लाईव्ह रेकॉर्ड झाले. त्यानंतर राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी नऊ मंत्र्यांना मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.

    – राहुल गांधीं बरोबर सेल्फी व्हिडिओ रेकॉर्ड

    पण विजयचा इमोशनल ड्रामा तेवढ्यापुरताच संपला नाही. शपथविधी संपल्यानंतर देखील तो सुरूच राहिला. विजयने आणि अन्य मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर राहुल गांधी स्टेजवर आले. तिथे विजयने राहुल गांधी यांच्याबरोबर आणि उपस्थित गर्दी बरोबर एक सेल्फी व्हिडिओ रेकॉर्ड केला.

    – लोकांच्या एकही पैशाला शिवणार नाही

    त्यानंतर विजय यांनी स्टेजवरून मोठे भाषण केले. मी लोकांच्या एकाही पैशाला शिवणार नाही. त्यांचा एकही पैसा वाया जाऊ देणार नाही. तामिळनाडूची आर्थिक स्थिती काय आहे हे लोकांना कळावे म्हणून मी श्वेतपत्रिका जारी करेन. महिलांना सुरक्षितता देईन. ड्रग्स मध्ये अडकलेल्या युवकांचे पुनर्वसन करेन. ड्रग्स माफियांच्या मुसक्या आवळेन. मी काही राजकारणी नाही किंवा राजकीय घराण्यातून जन्माला आलेलो नाही. मी सर्वसामान्य घरातून पुढे आलो आहे. तामिळनाडूच्या जनतेला मी पारदर्शक सरकार देईन. आपण सगळे मिळून तामिळनाडूला महान राज्य करू, असे विजयने सांगितले. विजयच्या भाषणातील प्रत्येक वाक्यामुळे लोकांच्या उत्साहाला प्रचंड उधाण आल्याचे पाहायला मिळाले.

    Chief Minister of Tamil Nadu and TVK Chief C Joseph Vijay with Rahul Gandhi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : दगड व्यावसायिकाच्या घरी 28 कोटी रोकड, 15 किलो सोने सापडले; नोटा मोजता-मोजता 5 मशीन खराब झाल्या; आरोपीला अटक

    PM Narendra Modi : पंतप्रधान म्हणाले- प्रत्येक राज्य पेपरफुटीमुळे त्रस्त; शिक्षणासंदर्भात सातत्याने पावले उचलत आहोत; दोन्ही सभागृहांमध्ये पेपरफुटी सुधारणा विधेयक मंजूर

    Lovpreet Singh : लवप्रीतची CWG मध्ये रौप्य पदकावर मोहोर; वेटलिफ्टिंगमध्ये 388 किलो वजन उचलले; डिस्कस थ्रोमध्ये सीमाला कांस्यपदक