नाशिक : लोकसभा निवडणुकीत महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला चांगले यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी विधानसभा निवडणुकीवर फोकस करून आपापली रणनीती आखली आहे. यापैकी शरद पवारांनी ताटातलं वाटीत हा जुनाच फॉर्म्युला अवलंबून आपल्या जुन्या समर्थकांना गोळा करण्यासाठी त्यांनी आपले शिलेदार कामाला लावले आहेत. महायुतीत ज्यांना तिकिटे मिळणारच नाहीत असे मदन भोसले, हर्षवर्धन पाटील, समरजीत सिंग घाटगे वगैरे नेते पवारांच्या गळाला लागले आहेत, जे पूर्वीचे त्यांचेच समर्थक होते. BJP high command assigned pawar to control thackeray and Congress from within MVA
लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात पवारांनी मोहिते पाटील घराण्याला गळाला लावले. त्याच्याच पुढचा टप्पा म्हणून दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रात आपले जुने समर्थक गळाला लावण्याचा म्हणजेच ताटातलं वाटीत घेण्याचा पवारांचा प्रयत्न आहे. त्या पलीकडे जाऊन पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रात कुठल्या नव्या दमाचे आणि नव्या क्षेत्रातले कार्यकर्ते पवारांच्या पक्षाला मिळण्याची अवस्था आणि शक्यता नाही. त्यामुळे पवारांकडे फारसा नवा कुठला फॉर्म्युला दिसत नाही.
पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या काँग्रेसी संस्कृतीत वाढलेल्या नेत्यांनी 2014 नंतर भाजपची सत्तेची वळचण गाठली होती. मात्र 2024 मध्ये वारे फिरायची लक्षणे पाहून यातल्या काहींनी माघारी फिरून पवारांच्या पक्षाची वळचण गाठली. यापलीकडे फारसे काही घडले नाही.
भाजपची रणनीती
त्या उलट लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा धडा घेत भाजपने प्रचाराच्या रणनीतीत मोठा बदल केला असून. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने नवी व्यूहरचना तयार केली असल्याची बातमी आहे. या नव्या रणनीतीत “टूलकिट” हा कळीचा शब्द असून त्यानुसार विधानसभा मतदारसंघ या युनिटवर फोकस न करता पंचायत समिती सर्कल या युनिटवर फोकस करून मतदानाची टक्केवारी वाढवण्यावर भाजपने भर दिला आहे.
वेगवेगळ्या राज्यांमधल्या स्थानिक ते लोकसभा निवडणुकीच्या राजकारणाचा अनुभव असलेल्या नेत्यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची असाइनमेंट देऊन कामाला लावण्याचा भाजप श्रेष्ठींचा इरादा आहे.
लोकसभा निवडणुकीत पक्षनिष्ठांना डावलले गेल्याचा तक्रारी आल्या. त्यातून योग्य तो धडा घेत आता अनुभवी व्यक्तींना प्राधान्य देण्याचा भाजप श्रेष्ठींनी निर्णय घेतला आहे.
भाजपचा फॉर्म्युला
- बूथप्रमुख रचना कायम ठेवत त्याला वेगळ्या समांतर रचनेची जोड
- प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्की राजकीय समज असणा-या 15 जणांची टीम
- टूलकीट क्रमांक 1 : निवडणुका जिंकण्याचा, लढण्याचा अनुभव असलेले स्थानिक नेते आणि इतर जाणकार यांचे मार्गदर्शन
- टूलकीट क्रमांक 2 : 15 जणांपैकी प्रत्येक जण 300 जणांची टीम तयार करेल
- 300 जण मग प्रत्येकी 150 या प्रमाणे 45000 जणांच्या टीम तयार करतील
- प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कमीत कमी 1500 महिलांच्या उपस्थितीत 15 मेळावे घेण्याचे नियोजन
- हे सगळे प्रचारात उतरणारे पक्के कार्यकर्ते असणार आहेत.
केंद्रीय नेत्यांना प्रचाराच्या मैदानात उतरवण्यासह इतर अनेक नव्या मुद्द्यांचा समावेश नव्या रणनीतीमध्ये आहे. या संदर्भात मुंबईत प्रभारींसह राज्यातील नेत्यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक भाजपच्या प्रदेश मुख्यालयात होणार आहे. तब्बल 45000 हजार कार्यकर्त्यांचे जाळं विणून विधानसभा निवडणूक जिंकण्याचा चंग भाजपने बांधला आहे.
मुख्य म्हणजे महाराष्ट्रात लोकसभेच्या पराभवानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही विधानसभा निवडणुकीसाठी पुढाकार घेतल्याने विधानसभा निवडणुकीच्या मैदानात भाजप पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पवारांना “असाइनमेंट”
बाकी भाजपच्या श्रेष्ठींनी पवारांना महाराष्ट्रात महाविकास आघाडीत “आतून” सुरुंग लावण्याची “असाइनमेंट” देऊन काँग्रेस आणि ठाकरे जोडगोळीला रोखण्याची तजवीज केल्याची बातमी अंतर्गत वर्तुळातून सुटून बाहेर फिरू लागली आहे. “आतून” काम करून माणसे निवडून आणण्यापेक्षा पाडण्याचे जास्त कौशल्य असणाऱ्या पवारांच्या बाबतीत ही बातमी खरी असल्याचे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे. भाजपच्या रणनीतीचा हा सर्वाधिक महत्त्वाचा भाग असल्याचे बोलले जात आहे.
BJP high command assigned pawar to control thackeray and Congress from within MVA
महत्वाच्या बातम्या
- Sunita Williams : सुनीता विल्यम्सबद्दल मोठी बातमी, NASA ने सांगितले अवकाशातून कधी परतणार?
- Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमुळे विरोधक अस्वस्थ ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- देशभरात BNSचे कलम 479 लागू करा, शिक्षेचा एक तृतीयांश काळ भोगलेल्या अंडरट्रायल कैद्याला जामिनाची तरतूद
- Ajit Pawar : मुलींवर हात टाकणाऱ्या विकृताचे सामानच काढले पाहिजे; यवतमाळच्या लाडकी बहीण मेळाव्यात