विशेष प्रतिनिधी
मुंबई : अख्खे वर्ष ‘मातोश्री’त बसून कारभार करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सरकारच्या वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर घराबाहेर पडून वर्षावर राहिले… तर त्याची चक्क फोटोस्टोरी झाली.
वाट्टेल तेवढ्या बाहेरच्या टीकेला आणि आतल्या सल्ल्यांना न जुमानता उद्धव ठाकरे यांनी अख्खे वर्ष मातोश्रीत बसून कारभार पाहिला. पण वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर बाहेर पडून त्यांनी तीन दिवस मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान वर्षावर मुक्काम केला. त्याचे अप्रूप वाटून त्याची फोटोस्टोरी लोकसत्ताने छापली. uddhav thackeray news
मलबार हिल येथील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी म्हणजे वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासमवेत तीन दिवस वास्तव्यास होते. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे कुटुंबीयांसह सदस्यांसोबत शनिवार (२८ नोव्हेंबर), रविवार (२९ नोव्हेंबर) आणि सोमवारी (३० नोव्हेंबर) वर्षा बंगल्यावर वास्तव्यास होते. uddhav thackeray news
“पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब रात्री मुक्कामासाठी वर्षा बंगल्यावर असल्याचे दिसले”, असे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले. गेल्या वर्षी २८ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, पण त्यानंतर वर्षा बंगल्यावर वास्तव्य करण्याऐवजी त्यांनी मातोश्रीवरच राहणेच पसंत केले होते.
वांद्रे येथील कलानगर परिसरात असलेले मातोश्री हे ठाकरे यांचे निवासस्थान गेली अनेक वर्षांपासून राजकारणातील एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते. नोव्हेंबर २०१९ मध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून उद्धव ठाकरे मातोश्री आणि वर्षा बंगला असा प्रवास करताना दिसतात.
वर्षा बंगला हा केवळ मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी आणि बैठकांसाठी वापरला जातो. फ्रेब्रुवारीमध्ये दादरला झालेल्या एका कार्यक्रमात ठाकरे यांनी वर्षा बंगल्यापेक्षा मातोश्रीवर वास्तव्य करण्यास जास्त पसंत असल्याचे सांगितले होते.
uddhav thackeray news
पण शनिवारी पहिल्यांदाच ठाकरे कुटुंब वर्षा बंगल्यावर तीन दिवस वास्तव्यास आले. मातोश्रीबाहेर पडून मुख्यमंत्री आपल्या कुटुंबासमवेत खास वर्षा बंगल्यावर का राहिले, याचे कारण अद्याप समजले नाही. काही दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावर काही अत्यधुनिक सोयी सुविधांबद्दलच्या सुधारणा करण्यात आल्याचे बोलले जाते. त्यानंतर मुख्यमंत्री २८ ते ३० नोव्हेंबर येथे वास्तव्य केल्याची माहिती समोर आली.