- नेताजींच्या पुस्तकांचे पुनःप्रकाशन
- आयएनएच्या योद्धांना प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे नेतृत्व करण्यासाठी निमंत्रण विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप, कोलकात्यात संग्रहालयही
- प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्र सरकार नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त देशभर मेगा इव्हेंट करण्याच्या विचारात आहे. नेताजींच्या 125 व्या जयंतीचे 23 जानेवारीपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. त्यांची पुस्तके पुन्हा छापण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे.
netaji subhash 125 jayanti
तसेच विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप सुरू करण्याचा देखील विचार करत आहे आयएनएच्या योद्धांना प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे नेतृत्व करण्यासाठी आमंत्रित केले जाण्याची शक्यता आहे.
सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे प्रस्ताव आले आहेत. बोस कुटुंबातील सदस्य, नेताजी सुभाषचंद्र बोस आयएनए ट्रस्ट, शिक्षणतज्ज्ञ, इतिहासकार आणि नेताजीशी संबंधित विविध संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते.
netaji subhash 125 jayanti
बैठकीत बोलताना प्रल्हाद पटेल म्हणाले की, बोस कुटुंबीय आणि आयएनएच्या सदस्यांकडे मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक कागदपत्रे, क्लिपिंग्ज, छायाचित्रे, व्हिडिओ आणि इतर साहित्य आहेत, ते एका ठिकाणी आले पाहिजेत. कोलकाता येथे सुभाषबाबूंच्या बोस नावाने एक विस्तीर्ण संग्रहालय बांधण्याचा प्रस्तावही ठेवला आहे.