- मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या एककल्ली कारभारामुळे तृणमूल कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कलह वाढला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते बंडखोरीच्या तयारीत आहेत.
वृत्तसंस्था
कोलकाता : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या एककल्ली कारभारामुळे तृणमूल कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कलह वाढला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते बंडखोरीच्या तयारीत आहेत. सुवेंद्र अधिकारी यांनी परिवहन मंत्रीपदाचा राजीनामा देऊन याची सुरूवात केली आहे. अधिकारी अद्याप तृणमूलमध्ये असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यांची नाराजी कायम आहे. त्यामुळेच त्यांच्या स्वत:च्या पश्चिम मिदनापूर मतदारसंघात झालेल्या ममता बॅनर्जी यांच्या सभेला उपस्थित राहिले नाहीत. Trinamool Congress escalated
अधिकारी हे एकमेव ज्येष्ठ नेते नाराज आहेत असे नाही तर त्यांच्यासोबत अनेकजण आहेत. नाराजांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. याचे कारण म्हणजे खासगी व्यावसायिक संस्थांकडे निवडणुकीची जबाबदारी सोपविल्याने जुनेजाणते नेते नाराज झाले आहेत. त्यांच्याकडूनच पक्ष चालविला जात असल्याचा आरोप केला जात आहे. तृणमूल कॉंग्रेसने रणनितीकार प्रशांत किशोर आणि त्यांची इंडियन पॉलिटिकल अँक्शन कमीटी (आय-पॅक) यांच्याकडे निवडणुकीची रणनिती आखण्याचे काम दिले आहे. त्यांच्यावर नाराजीही वाढत आहे. Trinamool Congress escalated
कूचबिहारचे आमदार मिहिर गोस्वामी यांनी यापूर्वीच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. आत्तापर्यंत आमदार, खासदार आणि मंत्री यांच्यासह तृणमूल कॉंग्रेसच्या आठ नेत्यांनी पक्षामध्ये लोकशाही नाही. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही, असा आरोप केला आहे. पक्षामध्ये गटबाजी ही नवीन गोष्ट नसते. परंतु, आत्तापर्यंत स्थानिक पातळीवर असलेले वाद आता थेट ममता बॅनर्जी यांच्याविरुध्दच्या नाराजीत रुपांतरीत झाले आहेत.
वन मंत्री राजिब बँनर्जी यांनीही पक्षनेतृत्वाविरुध्द बंडाचा झेंडा फडकाविला आहे. वरिष्ठ नेत्यांच्या अस्वस्थतेमागील कारणे समजून घ्यायलाच पक्ष तयार नाही, असा जाहीर आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सुवेंदु अधिकारी यांनी पक्ष सोडल्यास त्याचा मोठा फटका बसणार आहे. पक्षामध्ये मोठी पोकळी निर्माण होईल. उत्तर २४ परगना जिल्ह्यातील बैरकपूर येथील ज्येष्ठ आमदार सिलभद्र दत्ता यांनीही प्रशांत किशोर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांच्या कार्यपध्दतीविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत.
Trinamool Congress escalated
नाराज असलेल्या बहुतांश नेत्यांनी ममता बॅनर्जी यांच्याभोवती गोळा झालेल्या नेत्यांविषयी नाराजी व्यक्त केली आहे. या नेत्यांच्या हातात सत्तेचे केंद्रीकरण झाले आहे, असा त्यांचा आरोप आहे.