विशेष प्रतिनिधी
गोवा : उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्हा परिषदा भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. एकीकडे महाराष्ट्रातल्या सत्तेच्या बळावर ज्येष्ठ नेते शरद पवार गोव्यात लक्ष घालणार आणि तेथे सत्तांतर घडवून आणणार अशा बातम्या चालविल्या जात असताना स्थानिक निवडणुकीत मात्र भाजपने बाजी मारली आहे. goa bjp won both Zilla Panchayat elections
उत्तर गोव्यात २५ पैकी भाजपने १९ जागा जिंकल्या आहेत. तर दक्षिण गोव्यात लढविलेल्या १७ पैकी १४ जागांवर भाजपने यश मिळविले आहे. दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. goa bjp won both Zilla Panchayat elections
मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर गोव्यातील सत्ता डॉ. प्रमोद सावंत यांच्या हाती आली. त्यांना पक्ष संघटनात्मक आव्हान पेलायचे होतेच त्याचबरोबर पर्रिकरांनी निर्माण केलेले राजकीय संबंधही जपण्याचेही आव्हान होते. छोटे पक्ष, त्यांच्या महत्त्वाकांक्षा संभाळणे कठीण होते.
त्यातच महाराष्ट्रात जनमताचा कौल धुडकावून महाविकास आघाडीने सरकार स्थापन केल्यावर गोव्यातही हालचाली सुरू झाल्याचे भासविण्यात आले. तशा बातम्या महाविकास आघाडीच्या मुखपत्रांमधून आणि टीव्ही चॅनेलवरून प्रसारित करण्यात आल्या.
goa bjp won both Zilla Panchayat elections
ज्येष्ठ नेते शरद पवार हे स्वतः लक्ष घालून महाराष्ट्रासारखा गोव्यातही चमत्कार घडविणार म्हणजे फोडाफोडी करणार अशा बातम्या पसरविल्या गेल्या. या राजकीय पार्श्वभूमीवर डॉ. प्रमोद सावंतांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या टीमने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि छोट्या शिवसेनेला मतदारांकरवी धूळ चारत दोन्ही जिल्हा परिषदांमधील सत्ता राखली आहे.