• Download App
    वोट बँकेच्या राजकारणातूनच राजीवजींच्या हत्यांच्या सूचना – पुराव्यांकडे दुर्लक्ष | The Focus India

    वोट बँकेच्या राजकारणातूनच राजीवजींच्या हत्यांच्या सूचना – पुराव्यांकडे दुर्लक्ष

    • मुख्य तपास अधिकारी अमोद कंठ यांच्या पुस्तकात खळबळजनक दावा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येबाबत वर्षभरापूर्वीच सूचना आणि पुरावे मिळाले होते. पण तामिळ वोट बँकेच्या राजकारणाच्या नादात त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले, असा खळबळजनक दावा माजी आयपीएस अधिकारी अमोद कंठ यांनी ‘खाकी इन डस्ट स्टॉर्म’ या पुस्तकात केला आहे. rajiv gandhi assasination

    एलटीटीईला एक भीती होती, की राजीव गांधी १९९१ मध्ये पुन्हा पंतप्रधान झाले तर श्रीलंकन सरकारला पाठिंबा देऊन तामिळींच्या हिताकडे दुर्लक्ष करतील. केवळ या भीतीपोटी एलटीटीईने देशाच्या पंतप्रधानाच्या हत्येचा कट रचला होता. अमोद कंठ यांनी ‘खाकी इन डस्ट स्टॉर्म’ नावाने पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात त्यांनी हा दावा केला आहे. अर्थात असे अनेक दावे कंठ यांनी पुस्तकात केले आहेत. ते या हत्याकांडातील मुख्य तपास अधिकारी होते. म्हणून त्यांच्या दाव्यांना तपास नोंदी यादृष्टीने महत्त्व आहे. rajiv gandhi assasination

    राजीव गांधी यांची मे १९९१ मध्ये एका आत्मघाती हल्ल्यात हत्या करण्यात आली होती. मात्र, हत्येपूर्वीच याबाबत पूर्वसूचना मिळाली होती. मात्र, वोट बँक राखण्यासाठी तत्कालीन तामिळनाडू सरकारने याकडे दुर्लक्ष केले होते, असा दावा कंठ यांनी केला आहे.

    लिबरेशन ऑफ टाइगर्स आणि तमिळ इलम (एलटीटीई) बद्दल सहानुभूती बाळगणाऱ्यांनी तामिळ मतदारांच्या समाधानासाठी या महत्त्वाच्या सूचनांकडे आणि पुराव्यांकडे दुर्लक्ष केले. राजीव गांधींच्या हत्येपूर्वी एक वर्षापूर्वी सर्व पुरावे मिळाले होते. एलटीटीई मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती. श्रीलंकन तामिळ नेत्यांचीही १२ सहकाऱ्यांसह १५ जून १९९० मध्ये हत्या झाली होती. विशेष म्हणजे राजीव गांधी आणि तामिळ नेत्याच्या हत्येची मोडस ऑपरेंडी एकच होती. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली होती. तरी देखील या प्रकरणी काहीही दक्षता घेण्यात आली नाही.



    त्यावेळच्या राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने केला नाही. १९९१ लोकसभा निवडणुकीदरम्यान तामिळ मतदारांना डोळ्यासमोर ठेवून या प्रकरणाच्या तपासाकडे दुर्लक्ष केले. पद्मनाभ हत्याकांड प्रकरणावेळी तामिळनाडूत डीएमकेचे सरकार होते. त्यानंतर जानेवारी १९९१ नंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

    rajiv gandhi assasination

    डीएमकेचे खासदार आणि प्रवक्ते टीकेएस एलनगोवन यांनी मात्र अमोद कंठ यांचा दावा फेटाळून लावला आहे. ते म्हणाले, “आम्ही राजीव गांधी सरकारवर १३ वी घटनादुरुस्ती लागू करण्यासाठी दबाव आणला होता. भारताचे शांतता पथक श्रीलंकेत पाठवण्यात आले तेव्हा तेथे तामिळींच्या हत्या करण्यात येत होत्या. तामिळींवर होत असलेल्या अत्याचारांविरोधात आमचे नेते करुणानिधी यांनी राजीव गांधींचे स्वागत करण्यास नकार दिला होता.”

    पद्मनाभ यांच्या हत्येनंतर कट्टरवादी श्रीलंकेत पळून गेले होते आणि राजीव गांधी यांच्या हत्येपूर्वी १९९१ मध्ये तामिळनाडूत परतले होते. राजीव गांधी यांची हत्या घडवून आणणारी धनू ही त्यांच्यासोबत तामिळनाडूत आली होती. त्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी हत्या करणाऱ्यांची ओळख पटवली होती. परंतु, तामिळनाडू पोलीस फार आधीपासून राज्यात होत असलेला हिंसाचाराबद्दल शांत होते. त्या हिंसाचारात एलटीटीईचा हात होता.

    Related posts

    अबकारी धोरण प्रकरणः न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत केली वाढ.

    पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला समर्पित केल्या ७ नवीन संरक्षण कंपन्या, म्हणाले- ‘१५ -२० वर्षांपासून प्रलंबित होते हे काम!’

    महाराष्ट्र बंद : सोलापुरात युवासेना आक्रमक ; रस्त्यावर टायर जाळून केली बंदची सुरुवात , पहा व्हिडिओ