• Download App
    शेतकरी आंदोलनाचा हरियाणातील उद्योग, रोजगारावर गंभीर परिणाम | The Focus India

    शेतकरी आंदोलनाचा हरियाणातील उद्योग, रोजगारावर गंभीर परिणाम

    • कुंडली इंडस्ट्रीज असोसिएनशनने मांडली वस्तुस्थिती

    वृत्तसंस्था

    चंडीगड : पंजाबी श्रीमंत शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा हरियाणातील उद्योगावर तसेच रोजगारावर गंभीर परिणाम झाल्याची वस्तुस्थिती हरियाणातील कुंडली इंडस्ट्रीज असोसिएशनने मांडली आहे. असोसिएशनचे सदस्य धीरज चौधरी यांनी ही परिस्थिती माध्यमांसमोर मांडली आहे. Farmers’ protest made transportation of raw material

     

    • राज्यात शेती हा प्रमुख व्यवसाय आहेच त्याच बरोबरीने शेती पुरक उद्योग तसेच औद्योगिकीकरण झाल्याने रोजगाराच्या मोठ्या संधी छोट्या आणि मध्यम उद्योगांच्या टाऊनशीपमुळे उपलब्ध झाल्या आहेत. यापैकीच कुंडली ही महत्त्वाची इंडस्ट्रीय़ल टाऊनशीप आहे. तेथील उद्योगावर तसेच शेती पुरक उद्योगावर शेतकरी आंदोलनाचा गंभीर परिणाम दिसत आहे.
    • राज्यातील सर्वच उद्योगांच्या कच्च्या मालाचा पुरवठा जवळजवळ थांबला आहे. इतर राज्यांमधील वाहतूक ठप्प झाल्याने शिल्लक कच्च्या मालावर कमी मनुष्यबळात उत्पादन सुरू ठेवावे लागत आहे.
    • अनलॉक होत असताना उद्योगक्षेत्र ६०% सुरू झाले होते. कामावर येणाऱ्या कामगारांची संख्या वाढत होती. रोजगाराला पुन्हा चालना मिळत होती. परंतु, तेवढ्यात शेतकरी आंदोलन सुरू झाले. त्याच परिणाम उद्योग आणि रोजगारावर झाला.
    • सध्या उद्योगक्षेत्र ३०% मनुष्यबळावर सुरू आहे. कच्च्या मालाची आवक पूर्ण थांबली आहे. उत्पादित वस्तूंची जावकही थांबल्याने माल कंपन्यांच्या गोदामात पडून आहे. ऑर्डर वेळेवर पोहोचल्या नाहीत. त्याची पेमेंट अडलेली आहेत. त्यातून कामगारांची देणीही थकली आहेत.
    • शेतकरी आणि सरकार यांच्यात चर्चा होऊन शेतकरी आंदोलनावर लवकरात लवकर तोडगा निघण्याची उद्योग क्षेत्राला आशा आहे.

    Farmers’ protest made transportation of raw material

    Related posts

    अबकारी धोरण प्रकरणः न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत केली वाढ.

    पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला समर्पित केल्या ७ नवीन संरक्षण कंपन्या, म्हणाले- ‘१५ -२० वर्षांपासून प्रलंबित होते हे काम!’

    महाराष्ट्र बंद : सोलापुरात युवासेना आक्रमक ; रस्त्यावर टायर जाळून केली बंदची सुरुवात , पहा व्हिडिओ