• Download App
    आसाममध्ये महिला सशक्तीकरणाचा अरूणोदय; सरकारकडून दरमहा महिलांच्या खात्यात थेट ८३० रूपये | The Focus India

    आसाममध्ये महिला सशक्तीकरणाचा अरूणोदय; सरकारकडून दरमहा महिलांच्या खात्यात थेट ८३० रूपये

    • मुख्यमंत्री सोनोवाल यांच्याकडून घोषणा

    विशेष प्रतिनिधी

    गुवाहाटी : आसाममध्ये महिला सशक्तीकरणाचा अरूणोदय झाला आहे. प्रत्येक महिलेला स्वयंविकासासाठी महत्त्वाकांक्षी अरूणोदय योजनेची सुरवात मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केली आहे. महिलांचे सशक्तीकरण करणारी अरूणोदय योजना ही भारतातील सर्वात मोठी योजना दरमहा ८३० रूपये हे महिनाकाठी महिलांच्या खात्यावर परिवाराला मिळणार आहेत. नुमाली जलाह परेड मैदानावर झालेल्या सोहळ्यात या योजनेची सुरवात झाली. आसामचे अर्थमंत्री डॉ.हिमांता बिस्वा सरमा हे या सोहळ्याचे साक्षीदार होते. arunodoi scheme assam

    या योजनेसाठी यंदाच्या वर्षी आसाम सरकारने २८०० कोटी रूपयांची तरतूद केली आहे. दारिद्रय रेषेखालील लोकांचे निमुर्लन करण्याच्या दृष्टीने आखलेल्या कार्यक्रमांसाठी ही योजना आहे. गरीबांवर किती खर्च केला जाईल हे सरकारने निश्चित केलेले नसलेतरी गरीबांचे आरोग्य आणि पोषण योग्य पध्दतीने होईल, अशी रक्कम सरकार गरीबांच्या खात्यावर वर्ग करणार हे मात्र नक्की आहे. असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. arunodoi scheme assam

    सदृढ आरोग्य राखण्याबरोबरच योग्य पध्दतीने पालनपोषण व्हावे, मुलभूत सुविधा गरीब घरातील लोकांना उपलब्ध व्हाव्यात त्याच पध्दतीने या योजनेची रचना केली आहे. प्रत्येक महिन्यातील कुटूंबाचा औषधांचा होणारा खर्च लक्षात लक्षात ४०० रूपये सहाय्य केले जाईल. त्याचप्रमाणे ५० टक्के सवलत ही ४ किलोपर्यतच्या वस्तूंवर २०० रूपयांपर्यत तर ८० रूपये सवलत ही साखर आणि इतर जीवनावश्यक भाजीपाल्यावर आणि १५० रूपयांच्या फळावर असेल, ही वैद्यकीय आणि पोषणासाठी परिवाराला ८३० रूपयांचे निश्चित सहाय्य ठरणार आहे.

    योजनेची वैशिष्ट्ये

    या योजनेंची अनेक वैशिष्ट्ये आहेत. महत्वाचे म्हणजे या कार्यक्रमातंर्गत देण्यात येणार सर्व रक्कम आणि त्याचप्रमाणे सवलतीची रक्कम ही वेळेत घराची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलेच्या खात्यावर थेट वर्ग होणार आहे. घराची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलेच्या हातात ही रक्कम पडली तर ती या रक्कमेचा विनियोग निश्चितच चांगल्या प्रकारे करू शकेल, असे अधिकाऱ्यांनी केलेल्या संशोधनातून पुढे आले आहे. महिलांच्या खात्याचा गैरवापर, दूरूपयोग होऊ नये,यासाठी महिलांनी आपल्या स्थानिक बॅंकेच्या ठिकाणी संपर्क साधून या योजनेचा फायदा घेता येईल, बेकेत जन धन योजनेच्या बाबतीत बॅका तसेच त्यांच्या प्रतिनिधींनी संपर्क खाते उघडून दिले होते.

    सप्टेंबरमध्येच अर्ज प्रक्रिया सुरू

    यंदाच्या वर्षी सप्टेंबरमध्येच अरूणोदय योजनेसाठीच्या अर्ज प्रक्रियेला सुरवात झाली. घरकाम करणाऱ्या महिलांबरोबरच विधवा, अविवाहित, निराधार व्यक्तींना या योजनेसाठी प्राधान्य दिले जात आहे. घरात चारचाकी वाहन, नोकरी, ट्रँक्टर, फ्रीज, टिव्ही इत्यादी असणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत. पात्र महिलेने या योजनेचा लाभ याच वर्षात यापूर्वी घेतलेला नसावा. एखादी महिला, व्यक्ती पात्र नसतानाही तिने या योजनेसाठी अर्ज भरला तर तिने स्वयंपूर्तीने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा तिचे नाव या योजनेतून वगळण्यात येईल.

    ८३० रूपये लाभार्थ्यांसाठी सरकारची तरतूद

    या योजनेद्वारे ३३ जिल्ह्यातील साधारणतः ९० लाख लोकसंख्येसाठी जवळपास २० लाखांचे संरक्षण मिळाले याहे. त्यात २२७७ ग्रामपंचायत आणि १०० शहरी भाग आहेत. तथापि बिटडा जिल्ह्यात ही योजना तेथील निवडणूकीमुळे थांबविण्यात आलेली आहे, हे निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशावरून केले असून जवळपास ५०४ अरूणोदय सहाय्यक यासाठी मदत करणार आहे. चालु आर्थीक वर्षात २०-२१ पाच महिन्यात (नोव्हेंबर ते मार्च) याप्रमाणे पैसे अदा करण्याचे नियोजन पूर्ण केले आहे.

    arunodoi scheme assam

    भारतातील सर्वात मोठी योजना असणाऱ्या आसाम सरकारने आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांसाठी अरूणोदय योजना निश्चित केली आहे. या योजनेची खास वैशिष्ट्ये अशी

    • आसाम सरकारने लाभार्थीच्या थेट खात्यावर मोठी रक्कम जमा करण्याची विशेष तरतूद म्हणजे एक भेटच म्हणता येईल
    • या योजनेसाठी तरतूद केलेली २८०० कोटी रूपयांची तरतूद ही आतापर्यतच्या इतिहासातील सर्वात मोठी आहे
    • लाभार्थीची लोकसंख्या लक्षात घेत या योजनेसाठी ९० लाख रूपये ही पुरेशी आहे. त्यामुळे विकास साधण्यात उपयोग होईल
    •  ही योजना ३३ जिल्हे, २२९९ ग्राम पंचायत, २७९२७ गावे आणि शहरी भागातील शंभरहुन अधिक भागांचा यात समावेश करण्यात आला असून या सर्वांना लाभ मिळेल. ही योजना लाभार्थीपर्यत पोहचावी तसेच त्यांची योग्य अमंलबजावणी व्हावी, यासाठी ५०४ सहाय्यक कार्यरत आहे.
    • १९ लाख घर परिवारातील सदस्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे,
    • या योजनेचा विधवा, परतिक्त्या आश्रित,अविवाहित,शारीरीक दृष्टया अपंग महिला आणि त्यांचे परिवाराला प्राधान्य दिले जाणार आहे.
    • आसाममधील कायम अथवा सध्या राहत असलेले निवासी परिवार आणि ज्याचे वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा कमी आहे असेही लाभार्थी लाभ घेऊ शकतील.
    • शिधापत्रिका किंवा एनएफएसएस कार्ड नसलेल्या परिवारांना अरूणोदय योजनेचा लाभ देतांना प्राधान्य दिले जाईल.
    • महिलाचे सशक्तीकरण करणारी अरूणोदय योजना ही भारतातील सर्वात मोठी योजना असून १९ लाख रूपये हे लाभार्थींना देण्यात येणार आहे. दरमहा ८३० रूपये हे महिनाकाठी परिवाराला मिळणार आहे.

    Related posts

    अबकारी धोरण प्रकरणः न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत केली वाढ.

    पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला समर्पित केल्या ७ नवीन संरक्षण कंपन्या, म्हणाले- ‘१५ -२० वर्षांपासून प्रलंबित होते हे काम!’

    महाराष्ट्र बंद : सोलापुरात युवासेना आक्रमक ; रस्त्यावर टायर जाळून केली बंदची सुरुवात , पहा व्हिडिओ