विशेष प्रतिनिधी
पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सबका साथ सबका विकास या सर्व समावेशक हिंदुत्ववादी धोरणाला छेद देण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येऊन आजमावलेल्या जातीच्या राजकारणाचे विष समाजामध्ये किती खोलवर गेले आहे, याचे प्रत्यंतर बिहारमध्ये आले. किंबहुना बिहारमधल्या जातीच्या राजकारणाचा विंचूदंश असा झाला की, एका निवडून आलेल्या खासदाराने आपण मुस्लिम आणि यादवांसाठी काम करणार नसल्याचे जाहीर केले. त्यावर त्या खासदारावर सगळीकडून भडीमार झाल्यानंतर देखील खासदाराने आपले वक्तव्य मागे घेतले नाही.Won’t work for Yadavs & Muslims, they didn’t vote for me, says Bihar JD(U) MP
त्याचे झाले असे :
नरेंद्र मोदींच्या सर्वसमावेशक हिंदुत्वाला छेद देण्यासाठी सगळ्या विरोधकांनी संपूर्ण देशभर जातीय राजकारणाचे विष पसरवले. जातनिहाय जनगणनेचे पिल्लू सोडून दिले. त्यातून “जिसकी जितनी आबादी, उतनी उसकी हिस्सेदारी”, अशा घोषणा आल्या. जातीच्या राजकारणाचे विष खोलवर पसरले. याचा परिणाम जातीय ध्रुवीकरणात होऊन मतदानाच्या पॅटर्नमध्ये तो दिसला. मुस्लिमांनी एकगठ्ठा भाजप विरोधात मतदान केले. त्यात यादवांचा समावेश झाल्याचे बोलले गेले.
या जातीय राजकारणाच्या विंचू दंशातूनच बिहारच्या सीतामढी मधून निवडून आलेले नितीश कुमार यांच्या जनता युनायटेडचे खासदार देवेश चंद्र ठाकूर यांनी यादव आणि मुस्लिमांनी आपल्याला मते दिलेली नाहीत. त्यामुळे आपण यादव आणि मुस्लिमांसाठी बिलकुल काम करणार नसल्याचे जाहीर करून टाकले. आप हमारे यहा आये, चाय पीजीए, मिठाई खाईए लेकिन हम आपके लिए काम नही करेंगे हम पब्लिक के लिए काम करेंगे और शायद आपका पर्सनल काम करेंगे!!, असे उद्गार देवेश चंद्र ठाकूर यांनी काढले.
ठाकूर यांच्या उद्गारावर लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल आणि बाकीच्या पक्षाच्या नेत्यांनी आगपाखड केली. पण याच राष्ट्रीय जनता दलाने बिहारमध्ये उघड जातीय प्रचार केला. यादव आणि मुस्लिम एकवटले तर भाजपचा सहज पराभव करू, असे उद्गार तेजस्वी यादवांनी काढले होते. पण देवेश चंद्र ठाकूर यांच्या उद्गारांवर राष्ट्रीय जनता दलाचे नेते भडकले. देवेश चंद्र ठाकूर यांनी माफी मागावी, अशी मागणी लालूंच्या पक्षाच्या नेत्यांनी केली. भाजपच्या ओबीसी मोर्चाने देखील त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. पण बिहारमधल्या जातीय राजकारणाच्या विंचूदंशाचे विष एवढे खोलवर भिनले आहे की, देवेश चंद्र ठाकूर यांनी आपले उद्गार मागे घेतले नाहीत.
Won’t work for Yadavs & Muslims, they didn’t vote for me, says Bihar JD(U) MP
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या अनपेक्षित अपयशाच्या दुष्परिणाम; संसदेभोवती घट्ट आवळला घराणेशाहीचा फास!!
- भारतीय नौदलाच्या ताफ्यात आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या सहा पाणबुड्यांचा समावेश
- राहुल गांधी रायबरेली ठेवणार, वायनाड सोडणार; प्रियांका गांधी तिथून लढणार!!
- अर्थसंकल्प 2024: अर्थमंत्री सीतारामन अर्थसंकल्पापूर्वी उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेणार