विशेष प्रतिनिधी
पुणे : कोरोनाच्या दोन्ही लाटेमध्ये होरपळलेल्या पुणे शहरावर मंगळवारी (दि. ११ मे) कोसळू पाहणारे भीषण ऑक्सिजन संकट टळले आणि त्यामध्ये केंद्र सरकारने अतिशय महत्वाची भूमिका निभावली. अगदी मोक्याच्या क्षणी केंद्राने तब्बल ८८ टन ऑक्सिजन पुणे शहराला पुरविला. त्यापैकी ३० टन फ्रान्सकडून मिळालेल्या मदतीतून तर ऑक्सिजन एक्सप्रेसमधून ओडिसातील अंगुलमधून आणलेला ५८ टन आॅक्सिजनचा समावेश आहे. With Centers prompt response Pune escaped from last minute oxygen crisis
त्याचे असे झाले, की पुण्याला ऑक्सिजन पुरवठा करणारे टायो निप्पाॅन आणि लिंडे इंडिया हे प्रकल्प अचानकपणे सोमवारी (दि. १० मे) रोजी बंद पडले. टायोकडून दररोज ३० टन, तर लिंडेकडून १२० टन ऑक्सिजनचा दररोज पुरवठा केला जातो. अचानक उदभवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे एकाचवेळी दोन कंपन्यांतून ऑक्सिजन मिळणार नसल्याचे लक्षात येताच महापालिका प्रशासन हवालदिल झाले. काहीही करून पुरवठा झाला नाही तर पुण्यावर भीषण संकट कोसळू शकते, याची जाणीव झाली आणि वरिष्ठ स्तरांवरून प्रयत्न सुरू झाले.
भारताच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेल्या फ्रान्सने भारताला ४० टन ऑक्सिजनचा पुरवठा केला होता. केंद्रातील संबंधितांशी बोलून यापैकी तब्बल ३० टन ऑक्सिजन महाराष्ट्राला दिला गेला आणि तो थेट पुण्याला पोहोचला. त्याचवेळी ओडिशातील अंगुल येथून नागपूरला निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस पुण्याला वळविण्यात आली आणि त्यातून चार टँकरद्वारे ५८ टन पुरवठा पुण्याला मिळाला. असा एकूण ८८ टन पुरवठा मिळाल्याने पुण्यातील रूग्णालयांना होणारया ऑक्सिजन पुरवठ्यावर कोणताही परिणाम झाला नाही आणि भीषण संकट टळले गेले. याशिवाय रायगडमधील डाॅल्व्ही कंपनीमधूनही ४५ टन पुरवठा झाला.
कोरोनाविरोधात लढण्यासाठी अदानी ग्रुपचे योगदान, ऑक्सिजन वाहतुकीसाठी ४८ क्रायोजेनिक टॅँकरची खरेदी
सुदैवाने, टायो निप्पाॅन व लिंडे या दोन कंपन्यांमधील तांत्रिक अडचणी दूर होऊन निर्मिती सुरू झाली आहे. पण उत्पादनासाठी किमान १८ तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे हा नियमित पुरवठा गुरूवार (दि. १३ मे) पासून सुरू होईल, असे समजते.
महाराष्ट्राला मदत देण्यामध्ये केंद्र सरकार दुजाभाव करते आहे, असा आरोप ठाकरे-पवार सरकार सातत्याने करीत आहे. तसेच परदेशी मदत कोठे गेली, असा सवालही काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राच्या तत्पर मदतीने पुण्यावरील भीषण संकट टळले आहे. विशेष म्हणजे, मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनीही केंद्राकडून दुजाभाव होत नसल्याचे स्पष्टपणे नुकतेच नमूद केले होते. केंद्राच्या ग्रेट हेल्पमुळेच मुंबईतील ऑक्सिजन संकट टळल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगतिले होते.
केंद्राच्या मदतीने असे टळले पुण्यावरील संकट…
- पुण्याला आॅक्सिजन पुरवठा करणारया दोन्ही कंपन्यांचे प्रकल्प एकाचवेळी अचानकपणे बंद पडले आणि भीषण संकटाची स्थिती निर्माण झाली.
- मात्र, केंद्राने तत्काळ मदत करून फ्रान्सकडून मिळालेली ३० टनची मदत थेट पुण्याकडे वळविली.
- तसेच ओडिशातील अंगुलहून नागपूरकडे निघालेली आॅक्सिजन एक्स्प्रेस पुण्याकडे वळविली आणि त्यातून ५८ टन आॅक्सिजन मिळाला.
- असा ८८ टन आॅक्सिजन मोक्याच्या क्षणी मिळाला नसता तर भीषण स्थिती ओढविण्याची भीती होती.
With Centers prompt response Pune escaped from last minute oxygen crisis
महत्त्वाच्या बातम्या