विशेष प्रतिनिधी
जीनिव्हा : भारतात सर्वांत प्रथम आढळलेला कोरोनाचा प्रकार ज्याला ‘डेल्टा’ नाव दिले आहे, तोच एक चिंताजनक आहे, अन्य दोन प्रकारांचा धोका कमी आहे,’ असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. WHO clarify regarding Indian strain
सध्या मोठ्या प्रमाणावर लोकांच्या आरोग्यासाठी ‘बी. १.६१७.२’ हा विषाणूचा प्रकार जास्त धोकादायक असून अन्य प्रकारांमुळे संसर्ग पसरण्याचा वेग कमी आहे, असे कोरोनासंबंधी आरोग्य संघटनेतर्फे जाहीर होणाऱ्या साप्ताहिक निवेदनात म्हटले आहे.
‘बी. १.६१७.२’ हा अद्याप चिंतेचा विषय असून अन्य तीन प्रकारही धोकादायक मानले जात आहे. या प्रकाराने संसर्ग वेगाने पसरत असल्याने तसेच प्राणघातक आणि लशींच्या सुरक्षेला भेदणारे असल्याने कोरोनाच्या मूळ विषाणूपेक्षा हे प्रकार जास्त धोकादायक आहेत.
भारतात कोरोनाची दुसरी लाट जास्त हानिकारक ठरली. यामागे ‘बी.१.६.१७’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या विषाणूचा एक प्रकार कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. हा प्रकार तीन शाखांमध्ये विभागला गेल्याने त्याला ‘ट्रिपल म्युटंट’ असे म्हटले जाते. विषाणूचा हा ‘चिंताजनक प्रकार’ असल्याचे ‘डब्ल्यूएचओ’ने गेल्या महिन्यात जाहीर केले होते. पण या तीन शाखांपैकी एकच प्रकार चिंताजनक आहे, असे आता जाहीर केले.
WHO clarify regarding Indian strain
महत्त्वाच्य बातम्या
- इराणच्या नौदलाच्या सर्वांत मोठ्या युद्धजहाजाला आग लागून जलसमाधी
- डिसेंबरपर्यंत प्रत्येकाला लसीचा डोस देणार ; लसीकरणाबाबत केंद्राची उच्च न्यायालयात हमी
- १०० दिवसांत पर्सिव्हरन्सने पृथ्वीवर पाठविली ७५ हजार छायाचित्रे
- इस्त्राईलने लसीकरणातून मिळवली ‘हर्ड इम्युनिटी’, बहुतांश सारे निर्बंध मागे
- इस्राईलमध्ये प्रथमच माजी अध्यक्षांचा मुलगा देशाचा नवा अध्यक्ष, हेरझॉग यांची निवड
- ब्रिटनमध्ये दहा महिन्यात प्रथमच कोरोनाचा एकही बळी नाही