गाझा पट्टीतून हमासच्या दहशतवाद्यांनी 2 तासांत इस्रायलच्या 3 शहरांवर 5000 हून अधिक रॉकेट डागले
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इस्रायलमध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यावर अनेक देशांनी टीका केली आहे. त्याचबरोबर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इस्रायलचे समर्थन केले आहे. इस्रायलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वृत्ताने आपण दुखावलो असल्याचे ते म्हणाले. We stand with Israel PM Modi
पंतप्रधान मोदी म्हणाले, “इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्यांची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. आमचे संवेदना आणि प्रार्थना निष्पाप बळी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आहेत. या कठीण प्रसंगी आम्ही इस्रायलसोबत एकजुटीने उभे आहोत.”
पॅलेस्टनी दहशतवादी संघटना हमासच्या दहशतवाद्यांनी इस्राईल मधल्या तेल अविव आणि अश्कलो शहरावर रॉकेट हल्ला करताच तो हल्ला परतवताना इस्राईलच्या हवाई दलाने गाझापट्टीत एअर स्ट्राइक केला आहे.इस्राईलच्या डझनभर लढाऊ विमानांनी एकाच वेळी गाजा पट्टीतल्या अनेक ठिकाणांवर शेकडो क्षेपणास्त्रे डागून हमास दहशतवादी संघटनेचे अड्डे उध्वस्त केले आहेत.
हमासने दोन तासांत पाच हजारांहून अधिक रॉकेट हल्ले केल्याने इस्रायलनेही केली युद्धाची घोषणा
पॅलेस्टिनी हमास दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी आज सकाळीच काही रॉकेट्स डागली. त्यातली काही रॉकेट्स तेल अविव आणि अश्कलो मधल्या नागरी वस्त्यांवर पडली. त्यामुळे इस्राइलने ताबडतोब युद्धमान परिस्थिती जाहीर केली. इस्राईलचे हवाई दल आणि लष्कर सज्ज झाले आणि सुमारे एक डझन इस्रायली विमानांनी गाजा पट्टीत घुसून हमास दहशतवादी संघटनेच्या अड्ड्यांवर शेकडो क्षेपणास्त्रे डागली. त्यामुळे हमासचे प्रचंड मोठे नुकसान झाले.