विनायक ढेरे
नाशिक : भारताचा माजी क्रिकेटपटू गोलंदाज व्यंकटेश प्रसाद हा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. त्याने नुकताच एक विडिओ आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. तो बराच लोकप्रिय झाला आहे. Venkatesh Prasad recites Ramstuti by Goswami Tulsidas
या विडिओत तो स्वतः गोस्वामी तुलसीदास यांनी १६ शतकात रचलेली रामस्तुती गाताना दिसतोय. एवढेच नाही तर त्या रामस्तुतीचा इंग्रजीतून अर्थही समजावताना दिसतोय. रामस्तुती गाताना व्यंकटेशचा आवाजही बऱ्यापैकी लागलेला दिसतोय. त्यातून त्याची रामभक्ती प्रतीत होतेय…
…पण व्यंकटेश प्रसाद तमाम भारतीयांच्या लक्षात राहिला आहे, तो म्हणजे पाकिस्तानची मस्ती एका झटक्यात उतरविणारा धडाकेबाज गोलंदाज म्हणून… १९९६ च्या विश्वचषकात पाकिस्तानविरोध्दच्या सामन्यात पाकिस्तानी फलंदाज सईद अन्वर आणि आमिर सोहेल ही जोडी भारतीय गोलंदाजी फोडून काढत होती. याची पाकिस्तानी फलंदाज आमिर सोहेल याला एवढी मस्ती चढली की त्याने व्यंकटेश प्रसादच्या एका चेंडूवर स्वेअर ऑफला चौकार ठोकला आणि वर त्या दिशेकडे बॅट आणि बोट दाखवून तुला असाच ठोक ठोक ठोकतो, असे खुणावले… झाले…
व्यंकटेश प्रसाद भयानक संतापला. पण त्याने त्याचा संताप पाकिस्तान्यांप्रमाणे आक्रस्ताळेपणाने बाहेर काढला नाही, तर आमिर सोहेलची मस्ती त्याने पुढच्याच चेंडूवर त्याचे दांडके काढून उतरवली… आणि पीचवरून पळताना डाव्या हाताने आमिर सोहेलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखविला.
तो विश्वचषकात भारताला जिंकता आला नाही. पण त्या विश्वचषकात सगळ्यांच्या लक्षात राहिला, तो व्यंकटेश प्रसाद आणि त्याने उतरविलेला पाकिस्तानाचा माज…!! आज त्याच व्यंकटेश प्रसादचे रामस्तुती गायनातून एक वेगळे भक्तिमय रूप या विडिओतून समोर आले आहे. हा विडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाला आहे.
Venkatesh Prasad recites Ramstuti by Goswami Tulsidas
महत्त्वाच्या बातम्या
- दहावीच्या विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली तर जबाबदारी कोण घेणार, उच्च न्यायालयाचे खडे बोल
- कोरोनिल औषधाबाबत खोटी माहिती दिल्याने रामदेवबाबा वादाच्या भोवऱ्यात, न्यायालयाचे समन्स
- केरळमध्ये भाजप नेत्यांना घेरण्याची डाव्या सरकारची खेळी, अनेकांची होणार चौकशी
- रिलायन्सचा कोरोनावरील औषधासाठी प्रस्ताव, सरकारकडून Niclosamide औषधाच्या फेज 2 क्लिनिकल ट्रायलला यापूर्वीच मंजुरी
- LIC IPO : या महिन्यात एलआयसीच्या आयपीओवर निर्णयाची शक्यता, लिस्टिंगसोबतच रिलायन्सला मागे टाकणार कंपनी