• Download App
    सावरकर गौरव यात्रा : छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते म्हणणाऱ्यांनी आम्हाला महापुरुषांच्या सन्मानाविषयी शिकवू नये; नितेश राणेंचे राष्ट्रवादीवर शरसंधानVeer savarkar gaurav yatra : BJP MLA Nitesh rane targets rahul Gandhi and NCP over chatrapati sambhji maharaj dharmaveer issue

    सावरकर गौरव यात्रा : छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते म्हणणाऱ्यांनी आम्हाला महापुरुषांच्या सन्मानाविषयी शिकवू नये; नितेश राणेंचे राष्ट्रवादीवर शरसंधान

    प्रतिनिधी

    सिंधुदुर्ग : राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना – भाजपने वीर सावरकर गौरव यात्रा काढल्या. त्याला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि अन्य महापुरुषांच्या कथित अपमानाचा विषय तापवायचा प्रयत्न केला. या मुद्द्यावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादीवर कठोर शब्दांत टीका केली असून छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, असे म्हणणाऱ्या नेत्यांनी आम्हाला महापुरुषांच्या सन्मानाविषयी शिकवू नये, असे ठणकावले आहे. Veer savarkar gaurav yatra : BJP MLA Nitesh rane targets rahul Gandhi and NCP over chatrapati sambhji maharaj dharmaveer issue



    सिंधुदुर्ग मध्ये वीर सावरकर गौरव यात्रेत आमदार नितेश राणे यांच्यासह भाजप शिवसेनेचे वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. या यात्रेला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात्रेच्या समारोपप्रसंगी आमदार नितेश राणे यांनी राहुल गांधी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा जोरदार समाचार घेतला. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अनेक गैरसमज होते. त्यांचा अभ्यास आतापर्यंत होत नव्हता. पण त्यांच्याविषयी वाचले. अभ्यास केल्यानंतर हे लक्षात आले की सावरकरांच्या एवढा कडवट हिंदू दुसऱ्या कोणी असू शकत नाही. आज जे महापुरुषांच्या अपमानाविषयी आम्हाला शिकवत आहेत, त्यांनीच छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, असे म्हटले होते. मराठा समाजाच्या मोर्चाला मुका मोर्चा असे सामनातून हिणवले होते. त्यांनी आम्हाला महापुरुषांच्या सन्मानाविषयी किंवा अपमानाविषयी शिकवू नये, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी विधानसभेत छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते. धर्मवीर नव्हते असे वक्तव्य केले होते. त्यावेळी त्या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ उठला होता. वीर सावरकर गौरव यात्रेला महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद लाभल्यानंतर राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी इतर महापुरुषांचा अपमान झाला तेव्हा गौरव यात्रा काढल्या नव्हत्या, अशा शब्दांत शिवसेना – भाजपच्या नेत्यांना टोचले होते. या मुद्द्यावरून आज नितेश राणे यांनी परखड शब्दात राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

    Veer savarkar gaurav yatra : BJP MLA Nitesh rane targets rahul Gandhi and NCP over chatrapati sambhji maharaj dharmaveer issue

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Indus water treaty स्थगितीचा परिणाम; कराचीत प्रचंड पाणीटंचाई; पाणीपुरवठा 40 % पेक्षा खाली!!

    Caste Census : जात जनगणना विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडण्याची शक्यता

    पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल