• Download App
    भावी मुख्यमंत्री पदाची वीणा नानांच्या गळ्यात; त्या पाठोपाठ विशाल पाटलांनी टाकली विश्वजीत कदमांची रिंग रिंगणात!! The talk about the start of the race for the post of Chief Minister started

    भावी मुख्यमंत्री पदाची वीणा नानांच्या गळ्यात; त्या पाठोपाठ विशाल पाटलांनी टाकली विश्वजीत कदमांची रिंग रिंगणात!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पंढरपूरात आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाच्या दर्शनाला आलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या गळ्यात त्यांच्या समर्थकांनी भावी मुख्यमंत्री पदाची वीणा घातली. त्या पाठोपाठ सांगलीचे खासदार विशाल पाटलांनी मंत्री विश्वजीत कदमांच्या नावाची रिंग मुख्यमंत्री पदाच्या रिंगणात टाकली. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीत अजून जागावाटपाच्या चर्चाही सुरू झाल्या नसताना मुख्यमंत्री पदाची शर्यत सुरू झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. The talk about the start of the race for the post of Chief Minister started

    सांगलीमध्ये शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत आसगावकर यांनी शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला सांगलीचे खासदार विशाल पाटील, पलूस-कडेगावचे आमदार विश्वजीत कदम यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना खासदार विशाल पाटील यांनी विश्वजीत कदम यांची ओळख करून देत असताना “आपल्या जिल्ह्याचे माजी मंत्री, आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला. तसेच पाटील म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला भविष्यवाणी करावी लागत नाही. त्यासाठी काही पंचांग वगैरे गोष्टी बघाव्या लागत नाहीत. विशाल पाटलांच्या या वक्तव्यावर एकच हशा पिकला.

    विशाल पाटलांच्या या वक्तव्यानंतर विश्वजीत कदम यांनी देखील भाषण केलं. यावेळी कदम म्हणाले, “बोलण्याच्या ओघात खासदार विशाल पाटील यांनी माझा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला. परंतु. याची कोणीही बातमी करू नका. याची बातमी केली तर सगळं जग बाजूला राहील आणि दुसरीच यंत्रणा माझ्या मागे लागेल. कदमांच्या या वक्तव्यावरही उपस्थितांनी हसून दाद दिली.

    सांगलीच्या राजकारणात सध्या खासादर विशाल पाटील व आमदार विश्वजीत कदम या जोडीची बरीच चर्चा रंगतेय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली होती. महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील उभे राहिले. मात्र या निवडणुकीत विशाल पाटलांनी चंद्रहार पाटलांसह माजी खासदार संजयकाका पाटलांना पराभूत केलं. या निवडणुकीच्या काळात विशाल पाटलांना उमेदवारी मिळावी यासाठी विश्वजीत कदमांनी बरेच प्रयत्न केले. मात्र, काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर विशाल पाटलांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. या काळातही कदमांनी पाटलांची साथ दिली. आता विधानसभेच्या निवडणुकीत विशाल पाटील विश्वजीत कदमांसाठी मोर्चेबांधणी करत आहेत.

    – राजकीय चर्चेला उधाण

    महाविकास आघाडीचा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरल्याने काँग्रेसचं वजन वाढलं आहे. हे चित्र मविआच्या जागावाटपातही दिसेल. अशातच विशाल पाटलांनी विश्वजीत कदमांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केल्याने नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. विशाल पाटील हे अपक्ष खासदार असले तरी मागील तीन पिढ्यांपासून त्यांचं कुटुंब काँग्रेसमध्ये आहे. लोकसभेतील विजयानंतर विशाल पाटलांनी काँग्रेसला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे काँग्रेसशी संलग्न खासदाराने भावी मुख्यमंत्री म्हणून विश्वजीत कदमांचा उल्लेख केल्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

    The talk about the start of the race for the post of Chief Minister started

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!

    Devendra Fadnavis : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला राजमान्यता – देवेंद्र फडणवीस