• Download App
    भारताने अफगणिस्थानला भेट दिलेल्या एमआय-२४ हेलिकॉप्टरवर तालीबानचा कब्जा|Taliban seize Mi-24 helicopter gifted by India in Afghanistan

    भारताने अफगणिस्थानला भेट दिलेल्या एमआय-२४ हेलिकॉप्टरवर तालीबानचा कब्जा

    विशेष प्रतिनिधी

    काबूल : भारताने २०१९ मध्ये अफगणिस्थान एअरफोर्सला एमआय-२४ हेलिकॉप्टर भेट दिले होते. तालीबानने कुंदुज विमानतळावर हल्ला करून या एमआय-२४ हेलिकॉप्टरवर कब्जा मिळविला आहे. मात्र, अफगणिस्थानच्या हवाई दलाने या हेलिकॉप्टरचे इंजिन आणि बाकीचे सुटे भाग अगोदरच काढून नेल्याने ते निकामी झालेले आहे.Taliban seize Mi-24 helicopter gifted by India in Afghanistan

    तालीबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी हेलिकॉप्टरवर ताब्यात घेतल्याचे मान्य केले आहे. यापूर्वी तालीबानने भारताला आवाहन केले होते की भारत सरकारने अफगणिस्थान सरकारला लढाऊ विमाने देऊ नयेत. कारण त्याचा वापर तालीबान आणि सामान्य जनतेवर हल्ले करण्यासाठी करू शकतो.



    तालीबानने कुंदुज प्रांताच्या लष्कराच्या मुख्यालयावरही कब्जा घेतला आहे. अमेरिकेच्या सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने तालीबान अफगणिस्थाच्या शहरांवर ताबा मिळवित आहे.अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेन सैन्याने घेतलेल्या माघारीनंतर तालिबानने मागील पाच दिवसांमध्ये आठ राज्यांच्या राजधानींवर ताबा मिळवला आहे.

    त्यासह अफगाणिस्तानच्या जवळपास ६५ टक्के भूभागाचा ताबा घेतला आहे. यामध्ये निमरूज प्रांताची राजधानी झारंजचा देखील समावेश आहे. याच शहरामध्ये भारताने कोट्यवधी खर्च करून आधुनिक ‘सिल्क रुट’ची उभारणी केली आहे. तालिबानला पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे मार्गदर्शन मिळत असल्याचे म्हटले जात आहे. तालिबानने आपले लक्ष मजार-ए-शरीफ या महत्त्वाच्या शहराकडे वळवले आहे. त्यानंतर काबूलचा ताबा घेण्यासाठी तालिबान प्रयत्न करणार आहे.

    भारताने इराणच्या चाबहार बंदराच्या मार्गे झारंज शहरातून मध्य आशियातील इंधन आणि गॅस साठा असलेल्या ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि किर्गिस्तान या देशांसोबत जोडण्याचा प्रयत्न केला होता. झारंज शहर हे भारतासाठी प्रवेशद्वार होते. भारताने इराणहून अफगाणिस्तानच्या झारंज शहरापर्यंत कोट्यवधी खर्च करून रस्ता तयार केला होता. या नव्या सिल्क रुटच्या माध्यमातून भारत झारंजला हब बनवणार होता. आता या शहरावर तालिबानचा ताबा आहे.

    अफगाणिस्तानमधील ग्रामीण भागावर ताबा मिळवल्यानंतर तालिबानने व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या सीमावर्ती भागातील चौक्या ताब्यात घेतल्या. इराण, पाकिस्तान आणि ताजिकिस्तानच्या मार्गे होणाऱ्या व्यापारावर तालिबानचे नियंत्रण आले आहे. या महिन्याअखेरीस अथवा पुढील महिन्यात तालिबान काबूल ताब्यात घेण्यासाठी निर्णायक लढाई छेडतील.

    Taliban seize Mi-24 helicopter gifted by India in Afghanistan

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Canada : कॅनडात मंदिराच्या भिंतीवर लिहिल्या खलिस्तानी घोषणा; नगर कीर्तनापूर्वी कारवाई

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार