• Download App
    महाराष्ट्रात रविवार गारेगार, तापमानात घट; थंडीची लाट वाढणार Sunday garegar in Maharashtra, temperature drops; The cold wave will increase

    महाराष्ट्रात रविवार गारेगार, तापमानात घट; थंडीची लाट वाढणार

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. ती अजून वाढण्याची चिन्हे आहेत. रविवारी मुंबईतील सांताक्रूझ येथील किमान तापमान १३.८ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले, तर खासगी हवामान अभ्यासकांच्या नोंदणीत पश्चिम उपनगरातील बहुतांश स्थानकांमध्ये किमान तापमान १२, तर बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात किमान तापमान 10 अंशापर्यंत खाली घसरले. तापमानात घट नोंदवली जात असल्याने रविवारी सकाळी प्रभातफेरीसाठी बाहेर पडणा-या मुंबईकरांना चांगलीच हुडहुडी भरली. महाराष्ट्रात तर इतरत्र थंडीची लाट आहे. Sunday garegar in Maharashtra, temperature drops; The cold wave will increase

    जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात उत्तर कोकणात सुद्धा थंडी वाढली. गेल्या आठवड्यात राज्यात उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट आली होती. परंतु थंडीच्या कडाक्याचा कोकणवासीयांना अनुभव घेता नाही आला. मुंबई, ठाणे, पालघर परिसरातही किमान तापमानात फारशी घसरण झाली नाही. मात्र वीकेण्डपासून मुंबई व नजीकच्या परिसरात सायंकाळी थंडीचे वारे वाहू लागले. परिणामी, सकाळच्या तापमानात घट होऊ लागली.

    दोन दिवसांपासून प्रवासादरम्यान मुंबईकरांनी स्वेटर, शाल पांघरायला सुरुवात केली आहे. दुपारनंतरही थंडीच्या प्रभावाने डोक्यावर टोपी घालूनच कित्येकांचा प्रवास सुरु होता. थंडीमुळे सायंकाळी कमाल तापमानातही घट नोंदवली जाईल. कमाल तापमान २६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरेल, असाही अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.

    मुंबईत हुडहुडणारी थंडी सोमवारीही जाणवेल, त्यामुळे सोमवारी आठवड्याची सुरुवातही थंडीसोबतच होईल. त्यानंतर हळूहळू किमान तापमान दोन अंशाने वाढत जाईल. पण महाराष्ट्रात इतरत्र थंडीची लाट वाढण्याचा अंदाज आहे.

    Sunday garegar in Maharashtra, temperature drops; The cold wave will increase

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Pakistani Minister : पाकिस्तानी मंत्री म्हणाले- भारत पाण्याला शस्त्र बनवतोय; जाणूनबुजून पाणी सोडले, ज्यामुळे पूर आला

    Discontent in Pimpri Chinchwad BJP : पिंपरी चिंचवड भाजपमध्ये नाराजीचा सूर ; तुषार हिंगे यांचा राजीनामा

    मुंबईत मोनो रेल अधांतरी अडकली; 2 तासानंतर काचा फोडून प्रवाशांची सुखरूप सुटका, चेंबूर ते भक्ती पार्क मार्गावरील घटना