• Download App
    नाशिक मध्ये संजय राऊतांच्या ताफ्यासमोर शिंदे गटाच्या शिवसैनिकांची घोषणाबाजी आणि निदर्शने shiv Sainiks of the Shinde faction chant slogans and demonstrate

    नाशिक मध्ये संजय राऊतांच्या ताफ्यासमोर शिंदे गटाच्या शिवसैनिकांची घोषणाबाजी आणि निदर्शने

    प्रतिनिधी

    नाशिक : शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत संजय राऊत यांनी थुंकून बेताल वक्तव्य केल्यानंतर नाशिकमध्ये शिंदे गटाने संजय राऊत यांच्या गाड्यांच्या ताफ्यापुढे जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने करून राऊतांचा निषेध केला. यामुळे काही काळ त्या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. In front of Sanjay Raut’s convoy in Nashik, Shiv Sainiks of the Shinde faction chant slogans and demonstrate

    खासदार संजय राऊत हे त्र्यंबकेश्वर येथे दर्शनाला गेले होते. तिथला कार्यक्रम संपवून राऊत शासकीय विश्रामगृह येथे जेवणासाठी जात असताना शिंदे गटाचे कार्यालय असलेल्या मायको सर्कल येथील रस्त्याने जाणार असल्याची माहिती शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. ज्यावेळी संजय राऊत यांचा ताफा कार्यालयासमोरून जात होता त्यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी राऊतांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना ताफ्यासमोर येण्यापासून थांबविल्याने पुढील अनर्थ टळला. यामुळे काही काळ या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

    पुणे, ठाणे येथेही संजय राऊतांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. पुणे शहर शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुडलक चौक येथे संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारले, तर ठाण्यात माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

    In front of Sanjay Raut’s convoy in Nashik, Shiv Sainiks of the Shinde faction chant slogans and demonstrate

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे विधानसभेत कडाडले; वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही

    PM Modi : पीएम मोदींच्या निमंत्रणावरून युरोपियन कमिशन अध्यक्ष भारत दौऱ्यावर; मुक्त व्यापार करारावर चर्चा