• Download App
    संदेशखालीतल्या महिला अत्याचाराचा मास्टरमाईंड शेख शहाजहानला अटक; पण 354 कलमाचा मामालाच नाही, बंगाल पोलिसांची "चलाखी"!!|Sheikh Shahjahan, the mastermind of Sandeshwala women's atrocities, arrested; But not only Article 354, Bengal Police's "cleverness"!!

    संदेशखालीतल्या महिला अत्याचाराचा मास्टरमाईंड शेख शहाजहानला अटक; पण 354 कलमाचा मामालाच नाही, बंगाल पोलिसांची “चलाखी”!!

    वृत्तसंस्था

    कोलकाता : पश्चिम बंगालच्या 24 प्रकरण जिल्ह्यातील संदेशखाली मधील महिला अत्याचाराचा मास्टरमाईंड शेख शहाजहानला तब्बल 55 दिवसांनी पोलिसांनी अटक केली. पण ती अटक करताना त्याच्याविरुद्ध महिला अत्याचाराशी संबंधित असलेले 354 हे कलमच लावले नाही. शेख शहाजहानला अटक करताना ममता बॅनर्जींच्या पोलिसांनी ही कायदेशीर चलाखी केली. त्याला विविध गुन्ह्यांमध्ये अटक केली, जे गुन्हे त्याच्याकडे त्याच्यावर 2 – 3 वर्षांपूर्वीपासूनच लावले होते. पण महिला अत्याचाराशी संबंधित असलेले 354 कलम त्याच्या विरोधात न वापरल्याने त्याला कोर्टातून लगेच जामीन मिळण्याची शक्यता आहे.Sheikh Shahjahan, the mastermind of Sandeshwala women’s atrocities, arrested; But not only Article 354, Bengal Police’s “cleverness”!!



    संदेशखाली मध्ये शेख शहाजहान हा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा मोठा पदाधिकारी होता. रेशन घोटाळ्यात त्याच्यावर आरोप होता आणि त्याच संदर्भात ईडीच्या पथकाने संदेशखालीत जाऊन त्याच्या ठिकाणांवर छापे घातले. त्यावेळी शेख शहाजहानच्या गुंडांनी ईडीच्या पथकावर हल्ला केला होता. त्यानंतर गेली 55 दिवस तो फरार होता.

    दरम्यानच्या काळात त्याने आणि त्याच्या गुंडांनी ज्या महिलांवर अत्याचार केले, लैंगिक छळ केला, त्या महिला पुढे आल्या आणि त्यांनी पोलिसांमध्ये तक्रारी दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु ममतांच्या पोलिसांनी त्यांच्या तक्रारीच सुरुवातीला दाखल करून घेतल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी संदेशखालीत मोठा मोर्चा काढला. त्यावेळी सगळ्या भारताचे लक्ष त्या मोर्चावर गेले हळूहळू संदेशखालीतील महिला अत्याचाराच्या प्रकरणातल्या गंभीर बाबी समोर येत गेल्या. महिलांनी शेख शहाजान यांच्या भावाच्या फार्म हाऊसवर हल्ला करून ते जाळून टाकले. बळजबरीने कब्जा केलेल्या जमिनी सोडवून घेतल्या.

    दरम्यानच्या काळात कोलकत्ता हायकोर्टात पीआयएल दाखल झाली आणि हायकोर्टाने ममता सरकारला फटकारले. शेख शहाजहान याला मनीखनी भागातून पश्चिम बंगाल पोलिसांनी अटक केली. परंतु ती अटक करताना त्याच्याविरुद्ध 354 कलम वापरले नाही. त्यामुळे त्याच्यावर अधिकृत पातळीवर महिला अत्याचाराचे गुन्हेच लागले नाहीत. त्या ऐवजी पश्चिम बंगाल पोलिसांनी दोन-तीन वर्षांपूर्वीच्या वेगळ्याच गुन्ह्यांमध्ये त्याला अटक केली.

    Sheikh Shahjahan, the mastermind of Sandeshwala women’s atrocities, arrested; But not only Article 354, Bengal Police’s “cleverness”!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य