आता रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी लष्करी कारवाईचे आदेश दिल्यानंतर युक्रेनवर हल्ले होत आहेत. दोन्ही देश एकमेकांच्या सैन्याला उत्तर देत आहेत. रशियाकडे युक्रेनपेक्षा जास्त लष्करी सामर्थ्य आहे. रशियाकडे सुमारे साडेआठ लाख सैनिक आहेत. तर युक्रेनमध्ये फक्त २.५ लाख सैनिक आहेत. रशियाकडे एकूण ४१०० हून अधिक विमाने आहेत, तर युक्रेनकडे तीनशेहून अधिक विमाने आहेत. पुतिन यांच्या लष्कराकडे 750 हून अधिक लढाऊ विमाने आहेत, तर युक्रेन या बाबतीत खूपच मागे आहे. युक्रेनमध्ये सुमारे 70 लढाऊ विमाने आहेत.Russia – Ukraine War: How many days will Ukraine have to face strong Russia? Whose strength, how much military capability? Read more ..
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आता रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी लष्करी कारवाईचे आदेश दिल्यानंतर युक्रेनवर हल्ले होत आहेत. दोन्ही देश एकमेकांच्या सैन्याला उत्तर देत आहेत. रशियाकडे युक्रेनपेक्षा जास्त लष्करी सामर्थ्य आहे. रशियाकडे सुमारे साडेआठ लाख सैनिक आहेत. तर युक्रेनमध्ये फक्त २.५ लाख सैनिक आहेत. रशियाकडे एकूण ४१०० हून अधिक विमाने आहेत, तर युक्रेनकडे तीनशेहून अधिक विमाने आहेत. पुतिन यांच्या लष्कराकडे 750 हून अधिक लढाऊ विमाने आहेत, तर युक्रेन या बाबतीत खूपच मागे आहे. युक्रेनमध्ये सुमारे 70 लढाऊ विमाने आहेत.
रशिया आणि युक्रेन दरम्यान युद्ध
रशियाचे नेतृत्व करणाऱ्या व्लादिमीर पुतिन यांच्या सैन्याकडे १२ हजारांहून अधिक रणगाडे आहेत तर युक्रेनकडे २५०० हून थोडे अधिक रणगाडे आहेत. लढाऊ हेलिकॉप्टरबद्दल बोलायचे झाल्यास, रशियाकडे 540 पेक्षा जास्त हेलिकॉप्टर आहेत. दुसरीकडे पाणबुडीच्या बाबतीत युक्रेन रशियासमोर कुठेही उभा नाही. रशियाकडे ७० हून अधिक पाणबुड्या आहेत. तर युक्रेनकडे एकही पाणबुडी नाही. त्याच वेळी, पुतिन यांच्या सैन्याकडे 49 माइन वॉरवेअर आहेत, तर युक्रेनमध्ये त्यांची संख्या फक्त 1 आहे. रशियाकडे 11 तर युक्रेनकडे फक्त एक फ्रिगेट्स आहेत.
रशिया आणि युक्रेनची तुलनात्मक ताकद
सैनिकांची संख्या
रशिया – 8.5 लाख, युक्रेन -2.5 लाख
रणगाडे
रशिया -12 हजार, युक्रेन – 2500
लढाऊ विमाने
रशिया -772, युक्रेन – 70
लढाऊ हेलिकॉप्टर
रशिया-544, युक्रेन – 30 हून अधिक
पाणबुड्या
रशिया – 70, युक्रेन – 0
सैन्य वाहने
रशिया -30 हजार, युक्रेन – 12 हजार
Russia – Ukraine War: How many days will Ukraine have to face strong Russia? Whose strength, how much military capability? Read more ..
महत्त्वाच्या बातम्या
- रशियाची युक्रेनवर लष्करी कारवाई, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचे पुतीन यांना आवाहन – आपल्या सैनिकांना हल्ले करण्यापासून रोखा!
- रशिया युक्रेनमधील युद्धामुळे भारतीय शेअर बाजारात हाहाकार, सेन्सेक्स 2000 पेक्षा अधिक अंकांनी, तर निफ्टी 600 अंकांनी कोसळला
- नवाब कोठडीत : ३०० कोटींच्या मालमत्तेची अवघ्या ५५ लाखांना खरेदी, अंडरवर्ल्ड कनेक्शनमुळे असे अडकले नवाब मलिक!
- Nawab Malik ED : नवाब मलिकांच्या समर्थनार्थ आंदोलनाकडे शिवसेनेची पाठ; चर्चेला तोंड फुटताच सुभाष देसाईंना पाठवले आंदोलनात!!