विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी यांची आज जयंती आहे. २ ऑक्टोबर १८६९ मध्ये या युगपुरुषाचा गुजरातमधील पोरबंदर येथे जन्म झाला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढ्यामध्ये महात्मा गांधी यांचा सिंहाचा वाटा असल्याने महात्मा गांधीं यांना राष्ट्रपिता म्हणून संबोधले जाते. गांधीजींच्या आयुष्यातील महत्त्वाची चळवळ मिठाचा सत्याग्रह /दांडी मार्चला यावर्षी ९१ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी १२ मार्च रोजी आजादी का अमृत महोत्सव साजरा केला जाईल अशी घोषणा केली. १५ ऑगस्ट २०२३ रोजी हा दिवस साजरा केला जाईल. आज माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री (जन्म साल १९०४) यांचीही जयंती आहे.
Remembering ‘युगपुरुष’ Mahatma Gandhi on his 152nd birth anniversary
महात्मा गांधी यांनी आपले मॅट्रिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंग्लंडला जाऊन न्यायशासनाचा अभ्यास केला. बॅरिस्टर ही पदवी मिळवून महात्मा गांधी भारतात परत आले व मुंबईत त्यांनी वकिलीची प्रॅक्टिस केली. दक्षिण आफ्रिकेमध्ये असलेल्या एका भारतीय मित्राला कायदेशीर सल्ला देण्यासाठी गेल्यानंतर गांधीजींच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल झाले. तेथे होत असलेल्या गोऱ्या लोकांचा अन्याय, तसेच भारतीयांशी केला जाणारा भेदभाव अनुभवल्यानंतर गांधीजींनी त्याविरुद्ध लढण्याची प्रतिज्ञा केली.
सत्य आणि अहिंसेचे महत्व त्यांना या चळवळी दरम्यान समजले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी इंग्रजांविरुद्ध सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबून लढा देण्यास सुरुवात केली. १९२० मध्ये नागरी अवज्ञा चळवळ, १९३० मध्ये असहकार चळवळ, मिठाचा सत्याग्रह आणि १९४२ रोजी त्यांनी भारत छोडो आंदोलन पुकारले. महात्मा गांधींच्या या सर्व प्रयत्नांना यश आले. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला.
ब्रिटनच्या मीठाच्या कायद्याचा निषेध करण्यासाठी गांधीनी 1930 मध्ये मिठाचा सत्याग्रह केला होता. मिठासारख्या दैनदिन वापरातील गोष्टीवर सरकारने कर लादला होता. या अन्यायाविरुद्ध गांधीनी मिठाचा सत्याग्रह केला. ह्या सत्याग्रहा नंतर अंदाजे 60,000 भारतीयांना तुरुंगात टाकण्यात आले होते. जानेवारी 1931 मध्ये गांधींची तुरुंगातून सुटका झाली आणि दोन महिन्यांनी त्यांनी लॉर्ड इर्विनसोबत मीठ सत्याग्रह संपवण्याचा करार केला. ज्यामध्ये हजारो राजकीय कैद्यांची सुटका समाविष्ट होती.
भारताच्या जातिव्यवस्थेतील सर्वात खालच्या स्तरावर असलेल्या “अस्पृश्यांना” वर होणार्या भेदभावा विरुद्ध त्यांनी सरकारला सुधारणा करण्यास भाग पाडले होते.
1942 मध्ये ग्रेट ब्रिटन दुसऱ्या महायुद्धात सामिलं होत असल्याचे दिसल्याने, गांधींनी “भारत छोडो” चळवळ सुरू केली होती. देशातून ब्रिटिशांना त्वरित बाहेर काढण्याची मागणी त्यांनी केली होती.
दुर्देवाने ३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींची हत्या झाली. ऑक्टोबर २ हा दिवस गांधीजींच्या आठवणीत ‘Day of non violence’ म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट), प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) आणि त्याचबरोबर २ ऑक्टोबर हा दिवस नॅशनल हॉलिडे म्हणून साजरा केला जातो.
Remembering ‘युगपुरुष’ Mahatma Gandhi on his 152nd birth anniversary
महत्त्वाच्या बातम्या