कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठविली आहे. तुम्ही मुख्यमंत्री होतात किंवा आहात, पण तुमचे राज्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालवित आहे अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठविली आहे. तुम्ही मुख्यमंत्री होतात किंवा आहात, पण तुमचे राज्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालवित आहे, अशी टीका राहुल गांधीयांनी केली आहे.
Rahul Gandhi criticism of our own Chief Minister
सोनिया गांधी यांनी १० जनपथ या निवासस्थानी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली. माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी-वढेरा याही उपस्थित होत्या. यावेळी बोलताना राहुल गांधी बंडखोर नेत्यांना उद्देशून म्हणाले, तुम्ही माझ्या वडिलांबरोबर काम केले आहे. तुम्हाला विश्वासात घेऊन काम करू. मात्र, पक्षांतर्गत संवाद वाढवण्याची गरज आहे. तुम्ही मुख्यमंत्री होतात वा आहात, पण तुमचे राज्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना चालवते.
राहुल गांधी यांचा रोख प्रामुख्याने मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे होता. या दोन्ही ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राहुल गांधी यांना मान्य नव्हती. राजस्थानात सचिन पायलट आणि मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नावांना त्यांची पसंती होती. मात्र, त्यामुळे कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी होती. त्यामुळे २३ ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्यांनी पत्र लिहून सोनिया गांधी यांच्याकडे राहूल गांधी यांच्या नेतृत्वाविषयी शंका व्यक्त केली होती.
Rahul Gandhi criticism of our own Chief Minister
याबाबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कॉंग्रेसची पंचमढी, सिमला बैठकीप्रमाणे चिंतन बैठकही होऊ शकेल. कोरोना साथीमुळे कार्यकारी समिती वा अन्य समित्यांच्या बैठका झाल्या नव्हत्या, पण त्याही घेतल्या जातील. दरम्यान, काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर बदल व्हावेत या मागणीला घेऊन पक्षातील मोठी फळी सध्या नाराज आहे. दुसऱ्या बाजुला कॉंग्रेसमधील हुजऱ्यांची फौज राहुल गांधी यांनाच अध्यक्षपदावर पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.