• Download App
    महाविकास आघाडीचे नेते मोदींना थेट अंगावर घेऊ शकत नाहीत; प्रकाश आंबेडकरांचा नागपुरातून टोला Prakash Ambedkar's procession from Nagpur

    महाविकास आघाडीचे नेते मोदींना थेट अंगावर घेऊ शकत नाहीत; प्रकाश आंबेडकरांचा नागपुरातून टोला

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : महाविकास आघाडीचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट अंगावर घेऊ शकत नाहीत. ती क्षमता फक्त आपल्यातच आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांची अडचण झाली. म्हणूनच आपण महाविकास आघाडीत गेलो नाही, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाच्या नेत्यांना लगावला. प्रकाश आंबेडकरांनी आज नागपूरात पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीचे अक्षरशः वाभाडे काढले. दिल्लीतल्या “इंडिया” आघाडीच्या आजच्या सभेत ते सामील झाले नाहीत. Prakash Ambedkar’s procession from Nagpur

    महाविकास आघाडीसोबत न जमल्याने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वेगळा मार्ग निवडला आहे. मविआ आणि इंडिया आघाडीसोबत बिघाडी झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेच्या निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार उतरवले आहेत. तसेच, त्यांनी आठ उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. त्यानंतर आज प्रकाश आंबेडकरांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच, त्यांनी महाविकास आघाडीशी कुठे आणि का बिनसलं हे देखील सांगितले. महाविकास आघाडी ही थेट मोदी आणि भाजपला अंगावर घेत नाही, माझ्यात ती ताकद आहे, हेच त्यांच्यासाठी अडचणीचे ठरले, असा टोला प्रकाश आंबेडकरांनी हाणला.

    प्रकाश आंबेडकर म्हणाले :

    तुम्ही आधी तुमची भांडणं मिटवा म्हणजे आम्हाला मतदारसंघ मागायला सोपे होतील, अशी आम्ही सातत्याने भूमिका घेतली होती. पण, त्यांचेच भांडण मिटत नव्हते. म्हणून वंचित आम्हाला जागा देत नाही, कुठल्या पाहिजे ते सांगत नाही, असं त्यांच्याद्वारे प्रसार माध्यमांमधून समोर येऊ लागले. जिथे त्यांचेच ठरत नाही तिथे आम्ही जाऊन आणखी बिघाड होण्याची परिस्थिती होती ती टाळण्याच्या दृष्टीकोनातून, तसेच निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही स्वतंत्र भूमिका घेतली.

    काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा देणार, असे पत्र आम्ही काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिले. कोल्हापूर, नागपूर जागांवरील पाठिंबाही जाहीर केला, इतर जागांबाबत त्यांच्याकडून निर्णय आल्यावर पाठिंबा जाहीर करु.

    • या सगळ्या गोंधळात काही सामाजिक राजकीय परिस्थिती अशी झाली आहे की ज्यामध्ये एकाच विचाराची माणसं आणि संघटना एकमेकांविरोधात लढत आहेत. 14 – 15 मतदारसंघात ही स्थिती आहे.
    • भाजपबाबत जी चर्चा सुरु आहे त्यानुसार त्यांना इतके पक्ष-लोक घ्यायची काय गरज आहे. तर त्यालाही हेच कारण आहे की जिथे ते लढले नाहीत तिथे त्यांचे प्राबल्य नाही, ते मिळवण्यासाठी म्हणून ते उमेदवार पळवण्याचा, पक्ष फोडून भाजपात सामील करण्याचा प्रकार करत आहेत. तसेच, मनसे सारखा पक्षही आपल्यात घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.
    • पारंपारिक ज्या ठिकाणी आपण लढत आलेले आहात, त्याची फेरमांडणी जर केली, तर आपल्याला रिझल्ट चांगल्या पद्धतीने मिळेल अशी परिस्थिती आहे. पण, त्यात दुर्दैवाने दोन गोष्टींची अडचण आहे, असे मी मानतो.
    • पहिलं म्हणजे प्रस्थापितांचे राजकारण, वंचितांचे, विस्थापितांचे राजकारण. प्रस्थापित आणि विस्थापित यांचा समन्वय आपण या निवडणुकीत करु, त्याला तिनही पक्षांचा विरोध आहे. यातून बाहेर पडायचे कसे म्हणून आम्ही तुम्हाला तीन-दोन जागा देतो असे त्यांनी सांगितले.
    • मुंबईतील राहुल गांधींच्या सभेत, आमचं मोदींशी भांडण नाही, अदृश्यशक्तीशी भांडण आहे, असे दिसले. निवडणुकीत जो सत्ताधारी पक्ष आहे, त्याला अंगावर घ्यावे लागते, त्यावर टीका करावी लागते, त्यांचा 10 वर्षांचा काळ लोकांसमोर कसा हितकारक नाही हे मांडावे लागते, हे मी मांडेन म्हणून त्या सभेत मला फक्त ५ मिनिटे देण्यात आली. भाजप, आरएसएस आणि मोदी यांना सरळ अंगावर घेण्याची ताकद, ही महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी अडचणीची होती.
    • दुसरा भाग म्हणजे, विस्थापितांना सत्तेत सहभागी करुन घेण्यास प्रस्थापितांचा कायम विरोध राहिला आहे. या प्रस्थापितांनीच काँग्रेस, भाजप, एनसीपी, शिवसेना ताब्यात घेतली आहे. त्यामुळे यांचे निवडून आलेले आमदार-खासदार एकमेकांशी निगडीत आहेत.

    Prakash Ambedkar’s procession from Nagpur

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे विधानसभेत कडाडले; वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही

    PM Modi : पीएम मोदींच्या निमंत्रणावरून युरोपियन कमिशन अध्यक्ष भारत दौऱ्यावर; मुक्त व्यापार करारावर चर्चा