विशेष प्रतिनिधी
मुंबई : शौचालय घोटाळा आणि नवी मुंबई मार्केट कमिटी घोटाळ्यात अडकलेले साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या कथित अटकेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र पेटण्याची भाषा करणाऱ्या शरद पवारांच्या इशाऱ्यानंतर अचानक मनोज जरांगे कार्ड पुन्हा ऍक्टिव्हेट झाले. हा योगायोग महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात 2 दिवसांपासून सुरू झाला आहे. Pawar’s warning of burning Maharashtra
शशिकांत शिंदे यांच्याविरुद्ध शौचालय घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर त्यांना कोर्टाने दोन महिन्यांपूर्वीच जामीन मंजूर केला, पण दोनच दिवसांपूर्वी पोलिसांनी नवी मुंबई मार्केट कमिटीच्या दुसऱ्या घोटाळ्यात त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आणि त्यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली. ऐन निवडणुकीत शशिकांत शिंदे यांना अटक होण्याची शक्यता बघितल्यावर शरद पवारांनी महाराष्ट्र पेटण्याची भाषा केली. त्याचवेळी संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही शांततेत आंदोलन उभे करू, अशी मखलाशी पवारांनी केली.
पण पवारांच्या या मखलाशी नंतर अचानक मनोज जरांगे कार्ड ऍक्टिव्हेट झाले. जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना सतत महाराष्ट्रात यावे लागते, हा मराठा समाजाचा विजय असल्याचा दावा केला. त्याच वेळी त्यांनी छगन भुजबळांवर देखील नेहमीप्रमाणे टीकास्त्र सोडले. वास्तविक नरेंद्र मोदींना महाराष्ट्राकडे लक्ष देण्याची गरज नव्हती. सहसा ते भाजपचे कमळ चिन्ह सोडून दुसऱ्या कुठल्या चिन्हावर उभे असलेल्या उमेदवाराच्या प्रचाराला जात नाहीत, पण महाराष्ट्रात मराठा समाजाविषयी एवढी भीती निर्माण झाली आहे की, नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात सतत यावे लागते आहे, हा मराठा समाजाचा विजय आहे, असा दावा मनोज जरांगे यांनी केला.
पण मोदींनी आत्तापर्यंत तर अनेकदा महाराष्ट्राचा दौरा केला. अगदी पहिल्या टप्प्यात आपल्या मतदानाच्या वेळी देखील मोदी महाराष्ट्रात तीन ठिकाणी येऊन गेले. मोदींचे हे दौरे सर्वच राज्यात नियमित होतात, तसे ते महाराष्ट्रातही झाले, पण शरद पवारांनी महाराष्ट्र पेटण्याची भाषा केली आणि त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्याच दिवशी मनोज जरांगे यांचे कार्ड अचानक ऍक्टिव्हेट झाले, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वेगळा संशय निर्माण झाला आहे. शरद पवारांचा दौरा झाल्यानंतर मनोज जरांगे हे आता सोलापुरात जाऊन ज्याला पाडायचे त्याला पाडा, असे सांगणार असल्याची बातमी समोर आली आहे.
पण ऐन निवडणुकीच्या मध्यावर जरांगे कार्ड पुन्हा ऍक्टिव्हेट करून वारा फिरल का??, हा खरा सवाल तयार झाला आहे.
Pawar’s warning of burning Maharashtra
महत्वाच्या बातम्या
- हेमंत सोरेन यांना पुन्हा धक्का! ED कोर्टाने फेटाळला अंतरिम जामीन
- उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!
- ममता बॅनर्जींना अटक करा, अन् ‘TMC’ला दहशतवादी संघटना घोषित करा’
- कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!