विशेष प्रतिनिधी
पुणे : पंढरपूर ते पंजाब मधले घुमान असे 2300 किलोमीटरची भक्ती सायकल अभियान भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ आणि श्री नामदेव दरबार कमिटी, घुमान यांनी सुरू केले आहे. Pandharpur to Ghuman 2300 KM Bhakti Cycle Mission
संत शिरोमणी नामदेव महाराजांची 753 वी जयंती शीख धर्म संस्थापक प्रथम गुरु नानक यांचे 554 प्रकाश पर्व आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या 727 व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त ही भक्ती सायकल यात्रा आयोजित केली आहे.
70 यात्रेकरू असलेल्या या भक्ती सायकल अभियानात अभियानाची सुरुवात आषाढी एकादशीच्या दिवशी 23 नोव्हेंबर रोजी पंढरपूर मधून झाली. ही यात्रा आता तापी नदी ओलांडून मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर कडून मार्गस्थ झाली आहे.
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय आणि भागवत धर्माचे अध्वर्यू संतश्रेष्ठ शिरोमणी नामदेव महाराज यांनी तेराव्या शतकात महाराष्ट्रातून पंजाब मध्ये जाऊन भक्ती संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. अमृतसर पासून नजीक असलेल्या घुमान मध्ये तब्बल 20 वर्षे नामदेव महाराज राहिले. शीख धर्मीयांच्या पवित्र गुरुबणिमध्ये संत नामदेवांच्या अभंगांचा समावेश झाला महाराष्ट्र आणि पंजाबची ही भक्तीधारा अविरत चालत राहिली ती तशीच पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टीने पंढरपूर ते घुमान हे भक्ती सायकल अभियान सुरू करण्यात आले आहे. ते 23 डिसेंबर 2023 रोजी घुमानला पोहोचेल.
या भक्ती सायकल यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे यात सहभागी झालेले सर्व 70 यात्रेकरू वयाची पन्नाशी ओलांडलेले आहेत आणि या यात्रेत दोन महिला देखील उत्साहाने सहभागी झाल्या आहेत. यात्रेकरू दररोज साधारण 100 किलोमीटर सायकल चालवतात आणि मग विवक्षित ठिकाणी मुक्काम करतात. अनेक ठिकाणी नामदेव शिंपी समाजाने त्यांची निवास व भोजन व्यवस्था केली आहे. तसेच अनेक संस्था आणि संघटनांची यात्रेकरूंना विशेषत्वाने मदत झाली आहे. सूर्यकांत भिसे आणि आनंद कंसल हे या यात्रेचे आयोजक आहेत.
9 डिसेंबर 2023 रोजी ही यात्रा चंडीगड मध्ये पोहोचेल तिथे राजभवनावर राज्यपाल बनवारीलाल पुरोहित हे यात्रेचे स्वागत करतील. 12 डिसेंबर 2023 रोजी ही सायकल बघती यात्रा घुमान मध्ये पोहोचेल. तेथे एक दिवसाचे कार्यक्रम करून परतीची यात्रा सुरू करून 23 डिसेंबर 2023 रोजी पुन्हा पंढरपूर मध्ये येऊन यात्रेचा समारोप होईल.
Pandharpur to Ghuman 2300 KM Bhakti Cycle Mission
महत्वाच्या बातम्या
- ‘मिग्जोम’ चक्रीवादळ आता आंध्र प्रदेशात धडकणार; चेन्नईत पाच जणांचा मृत्यू
- Chhattisgarh Result : हिंसाचारात मुलगा गमावलेल्या ईश्वर साहूंनी भाजपच्या तिकीटावर लढत काँग्रेसच्या मंत्र्याचा केला पराभव!
- मिझोराममध्ये ZPM विजयी, MNF सत्तेतून बाहेर, कॉंग्रेसला मिळाली फक्त एक जागा
- I.N.D.I.A. आघाडीच्या बैठकीला ममता बॅनर्जी जाणार नाही, म्हणाल्या…