विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सुरक्षेचा भंग करून नव्या संसदेच्या लोकसभेत गॅलरीतून उडी मारणाऱ्या दोन युवकांपैकी एक युवक लातूरचा असल्याचे समोर आले आहे. संसदेतल्या गॅलरीतून दोघांनी सभागृहात उडी मारल्याची घटना घडली आहे. तर एकाला संसदेच्या बाहेरच्या परिसरातून सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलं आहे. घुसखोरांपैकी एक जण मराठवाड्यातल्या लातूरचा असल्याची माहिती आहे. One of the three intruders who breached the security of the Parliament is from Latur
अमोल शिंदे या आंदोलकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तो लातूरचा असल्याची माहिती आहे. या घुसखोरांनी म्हैसूरच्या खासदारामार्फत पास बनवल्याची माहिती आहे. घुसखोरांपैकी दुसऱ्याचे नाव सागर सांगितले जात आहे. तर तिसरी तरुणी नीलम सिंग असल्याची माहिती समोर आली आहे. सागरने सभागृहाच्या आतमध्ये घुसखोरी केली होती.
दरम्यान, संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला आजच २२ वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्याच दिवशी संसदेत तरुणांनी घुसखोरी करुन खासदारांच्या बेंचवर उडी मारल्याने एकच गोंधळ उडाली. दुपारपर्यंत संसदेचं कामकाज तहकूब करण्यात आलेलं आहे. सुरक्षा यंत्रणा या घटनेचा कसून तपास करीत असून घुसखोरीमागचं नेमकं कारण काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेचे कामकाज पुन्हा सुरू करून निवेदन केले त्यामध्ये दोन युवकांना संसदेत आणि दोन युवकांना बाहेर अटक केल्याची माहिती त्यांनी दिली संसदेत सध्या सुरक्षाभंगाविषयी चर्चा सुरू आहे.
One of the three intruders who breached the security of the Parliament is from Latur
महत्वाच्या बातम्या
- देशात काँग्रेस असताना वेगळ्या Money Heist फिक्शनची गरजच काय??; पंतप्रधान मोदींचा निशाणा!!
- राज्य मागासवर्ग आयोगातून राजीनामा सत्र; पण ताबडतोब नव्या नियुक्त्या; अध्यक्षपदी न्या. सुनील शुक्रे; तीन सदस्यही नेमले!!
- पाकिस्तानमध्ये आत्मघातकी हल्ल्यात 23 जणांचा मृत्यू, पोलीस स्टेशनची इमारत कोसळली
- ”देशात राहणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांची आकडेवारी गोळा करणे अशक्य”