• Download App
    बारामतीच्या ज्येष्ठ नागरिक संघात पवारांनी दिली वय वाढल्याची कबुली, पण...!!now myagehas also turned 84 expressed sharad pawar

    बारामतीच्या ज्येष्ठ नागरिक संघात पवारांनी दिली वय वाढल्याची कबुली, पण…!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : एरवी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्या कार्यक्रमात किंवा अन्य कुठल्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आपले वय वाढल्याचे कबूल न देणाऱ्या शरद पवारांनी बारामतीच्या ज्येष्ठ नागरिक संघात मात्र वय वाढल्याची कबुली दिली. मी म्हातारा झालो असं का म्हणता??, तुम्ही माझं काय पाहिलं??, असा खोचक सवाल करून कायम झालेले वय नाकारणाऱ्या पवारांनी बारामतीच्या ज्येष्ठ नागरिक संघात मात्र वय वाढल्याची कबुली दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. now myagehas also turned 84 expressed sharad pawar

    तुमचं आता वय झाला आहे. तुम्ही जेष्ठत्वाच्या नात्याने बाजूला होऊन आमच्यासारख्या तुलनेने तरुण असलेल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना प्रोत्साहन द्यावे. चुकले तर कान धरावा, पण आता राजकारणातून बाजूला व्हावे, असा सल्ला अजित पवारांसह अनेकांनी पवारांना दिला होता. अगदी त्यात त्यांचे अतिशय घनिष्ठ मित्र सायरस पूनावाला यांचा देखील समावेश होता. परंतु या सगळ्यांचा सल्ला पवारांनी फेटाळून लावला होता. उलट आपलं वय झालेलंच नाही, असाच त्यांनी रेटा लावला होता.

    पण आता मात्र बारामतीच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या एका कार्यक्रमात पवारांनी आपले वय 84 झाल्याची कबुली दिली, पण त्याच वेळी याचा अर्थ आपण आपण थकलो असा कोणी घेऊ नये, अशीही वर मखलाशी केली. शरद पवार म्हणाले, वय झालं म्हणून थकायचं नाही. वय झालं म्हणून आपला विचारही सोडायचा नाही. आपण चालत राहू एवढीच खूणगाठ तुम्ही मनाशी बांधा, असा उपदेश पवारांनी ज्येष्ठ नागरिकांना केला.



    आपण ज्येष्ठत्वाकडे झुकलो की कदाचित आपले हात दुखतील. पाय दुखतील पण मेंदू शाबूत असेल तर काळजी करायचे कारण नाही. कारण मेंदू सशक्त असेल, तर आपण पुढची वाटचाल ही चांगली करू शकतो. ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा ठेवा आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या पिढीने पुढच्या पिढीला ज्ञानाचा ठेवा सोपवला आहे. बारामतीला तर ज्ञानपरंपरा फार मोठी आहे. मोरोपंतांनी विपुल लेखन इथेच केले. केकावली लिहिली. श्रीधर स्वामींनी बारामती मधल्याच कसब्यातल्या मंदिरात शिवलीलामृत ग्रंथ लिहिला, याची आठवण पवारांनी सांगितली. त्याचवेळी पुण्यानंतर बारामती हे मोठे ज्ञान केंद्र झाल्याचाही उल्लेख पवारांनी आपल्या भाषणात केला.

    पण या भाषणाचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य ठरले, ते म्हणजे पवारांनी स्वतःचे वय झाल्याचे कबूल केले. कारण कुठल्याच राजकीय कार्यक्रमात पवार स्वतःचे वय कबूल करत नाहीत आणि राजकारणातून वयपरत्वे बाजूला होण्याचाही विचार कबूल करत नाहीत. मात्र, बारामती ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमात त्यांनी आपले वय झाल्याची कबुली दिली हेच या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.

    now myagehas also turned 84 expressed sharad pawar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे विधानसभेत कडाडले; वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही

    PM Modi : पीएम मोदींच्या निमंत्रणावरून युरोपियन कमिशन अध्यक्ष भारत दौऱ्यावर; मुक्त व्यापार करारावर चर्चा