• Download App
    मुंबईत कोविड सेंटरच्या उद्घाटनात राष्ट्रवादीने शिवसेनेला दाखविला कात्रजचा घाट…!! NCP leadres inaugarated covid 19 vaccination centre in vikroli, mumbai, but Shiv Sena leaders kept away

    मुंबईत कोविड सेंटरच्या उद्घाटनात राष्ट्रवादीने शिवसेनेला दाखविला कात्रजचा घाट…!!

    प्रतिनिधी

    मुंबई – मुंबईतील कोरोना नियंत्रणात आणल्याचे श्रेय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सतत पुढे येऊन आपल्या पदरात पाडून घेत असतानाच, मुंबईत आम्हीही आहोत असे राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी दाखवून दिले. NCP leadres inaugarated covid 19 vaccination centre in vikroli, mumbai, but Shiv Sena leaders kept away

    शिवसेना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात रस्त्यावर उतरलेली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विक्रोळीत उभारल्या गेलेल्या भारतातील पहिल्या तृतीय पंथीयांसह समलैंगिक समुदायातील नागरिकांसाठी कोविड-१९ लसीकरण केंद्राचे लोकार्पण करून घेतले… आणि एक प्रकारे मुंबईत शिवसेनेला कात्रजचा घाट दाखविला. हिंदुस्थान पोस्टने ही बातमी दिली आहे.



    मुंबई महापालिका एन-प्रभागच्या सहकार्याने सेंट जोसेफ शाळा विक्रोळी (पश्चिम) येथे तृतीय पंथीयांसह समलैंगिक समुदायातील नागरिकांसाठी विशेष कोविड-१९ प्रतिबंधक मोफत लसीकरण केंद्राचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. ते तृतीयपंथी आणि समलैंगिक समुदायाला समर्पित केलेले भारतातील पहिले मोफत लसीकरण केंद्र आहे.

    मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आल्याचे लक्षात घेता एरवी कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईच्या महापौरांच्या उपस्थित करण्याची शिवसेना नगरसेवकांची घाई असते. पण विक्रोळीतील कोविड लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोणताही सुगावा शिवसेना नेत्यांना लागू दिला नाही.

    राष्ट्रवादी काँग्रेसने हा कार्यक्रम परस्पर आटोपून घेत भविष्यात युतीची स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. मुंबईत झालेल्या लसीकरण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात प्रथमच राजेश टोपे यांनी हजेरी लावली. ही हजेरी लावताना महापौर, महापालिका सार्वजनिक आरोग्य समितीच्या अध्यक्ष उपस्थित राहू शकणार नाहीत याची काळजी घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रेयातील वाटेकऱ्यांना दूर ठेवले.

    NCP leadres inaugarated covid 19 vaccination centre in vikroli, mumbai, but Shiv Sena leaders kept away

    Related posts

    पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे विधानसभेत कडाडले; वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही

    PM Modi : पीएम मोदींच्या निमंत्रणावरून युरोपियन कमिशन अध्यक्ष भारत दौऱ्यावर; मुक्त व्यापार करारावर चर्चा