वृत्तसंस्था
मुंबई : रिलायन्स उद्योगसमूहाची सूत्रे नव्या पिढीकडे जाणार आहेत. मुकेश अंबानी यांनी तसे संकेतच दिले आहेत. रिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. Mukesh Ambani hints at handing over Reliance Industries clues to new generation; Intended to be managed by a trust
मुकेश अंबानी म्हणाले,, मोठी स्वप्ने आणि लक्ष्य पूर्ण करण्यासाठी योग्य लोकांना सोबत घेणे आणि योग्य नेतृत्व असणे आवश्यक आहे. रिलायन्स समूह महत्त्वपूर्ण नेतृत्व बदलाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. माझ्या पिढीतील सहकाऱ्यांच्या हातातून नव्या पिढीच्या हाती सूत्रे सोपवण्याची ही प्रक्रिया असेल.
मुकेश अंबानी यांनी संपत्ती वाटपाबाबतची प्रक्रिया सुरू केल्याचे वृत्त होते. ब्लूमबर्गनुसार, मुकेश अंबानी यांनी वॉल्टन परिवाराच्या संपत्ती वाटपाच्या सूत्राला पसंती दिल्याचे वृत्त होते. याच आधारे रिलायन्समध्ये नेतृत्व बदल आणि संपत्ती वाटप होणार असल्याची चर्चा आहे. रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकलपासून दूरसंचार, ई-कॉमर्स आणि ग्रीन एनर्जीच्या उद्योगात रिलायन्स उद्योगसमूह कार्यरत आहे.
मुकेश अंबानी यांना ईशा अंबानी-पिरामल, आकाश आणि अनंत ही तीन मुले आहेत. ते महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. मुकेश अंबानी हे कुटुंबाच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करून एका ट्रस्टसारख्या संस्थेत रुपांतर करण्याचा त्यांचा विचार आहे. ही ट्रस्ट रिलायन्स उद्योगसमूहाचे व्यवस्थापन करणार असल्याची चर्चा आहे.