वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मी, नरेंद्र दामोदरदास मोदी, देवाच्या नावाने शपथ घेतो की… या शब्दांसह नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. राष्ट्रपती भवनातील शपथविधी सोहळ्यात एकूण 72 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात 31 कॅबिनेट, 5 स्वतंत्र प्रभार आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरींसह शिवराजसिंह चौहान आणि जेपी नड्डा हे दोन नवे दिग्गज टॉप-५ मंत्र्यांमध्ये सामील झाले. Modi Govt’s Jumbo Cabinet; Out of 71 ministers, 35 are freshers, 4 from TDP-JDU, 30 are cabinet ministers.
३३ नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले असून ३९ चेहऱ्यांची पुनरावृत्ती झाली. अनुराग ठाकूर आणि स्मृती इराणींसह ३३ जुन्या मंत्र्यांना हटवण्यात आले. २०१९ मध्ये २१ नवीन चेहऱ्यांनी शपथ घेतली होती. ३६ जणांना दुसऱ्यांदा संधी मिळाली होती. २४० जागा मिळवलेल्या भाजपतील ६४ खासदार, १६ जागांच्या टीडीपीतील २ आणि १२ जागा असलेल्या जेडीयूच्या २ खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळात पहिल्यांदाच एकूण ५३ जागा असलेल्या १४ मित्रपक्षांच्या ११ खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पूर्वी मित्रपक्षांचे ३ आणि २०१४ मध्ये ५ मंत्री होते. यूपीमधून सर्वाधिक १० आणि बिहारमधून ८ मंत्री झाले. नियमानुसार मोदी एकूण ८१ जणांना मंत्री करू शकतात.
36 वर्षांचे नायडू सर्वात तरुण…
7 माजी मुख्यमंत्री,
7 महिला,
6 राजकीय कुटुंबांतील,
27 ओबीसी,
10 एससी,
5 एसटी,
5 अल्पसंख्याक
उत्तर प्रदेशातील निकालाचा परिणाम मंत्रिमंडळावर झाला. राजनाथ सिंह व हरदीप पुरी हे २ कॅबिनेट मंत्री झाले. रालोदचे १ स्वतंत्र प्रभार व ७ राज्यमंत्री आहेत. गेल्या वेळी यूपीतून ४ कॅबिनेट व १० राज्यमंत्री होते. यूपी (१०) नंतर सर्वाधिक ८ मंत्री बिहारचे आहेत. यात ४ कॅबिनेट व ४ राज्यमंत्री आहेत. गेल्या वेळी ३ केंद्रीय व २ राज्यमंत्री होते. महाराष्ट्रात मोठे धक्के बसूनही २ कॅबिनेट मंत्री, १ स्वतंत्र प्रभार व ३ राज्यमंत्री बनले. महाराष्ट्रात यंदा विधानसभा निवडणुका आहेत. सर्वाधिक ५ कॅबिनेट मंत्री गुजरातचे आहेत. अमित शाह, मांडवीय व सी.आर. पाटील लोकसभेत गेले. जेपी नड्डा, एस जयशंकर हे गुजरातेतून राज्यसभेवर आहेत. एक राज्यमंत्रीही गुजरातचा आहे. गतवेळी ४ कॅबिनेट, ३ राज्यमंत्री होते.
भाजप अध्यक्ष आणि लोकसभा अध्यक्ष कोण होणार?
आता भाजप अध्यक्ष व लोकसभा अध्यक्षांवर चर्चा सुरू झाली आहे. नड्डांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपत आहे. नवीन अध्यक्षपदासाठी सरचिटणीस सुनील बन्सल व विनोद तावडे यांची नावे चर्चेत आहेत. बन्सल हे राजस्थानचे आहेत. या वेळी ओडिशात मोठे यश मिळाले. तावडे हे महाराष्ट्रातील आहेत. शिंदेंना भाजप गोटात आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. आेम बिर्ला यांना सभापतिपदाची पुन्हा संधी मिळू शकते किंवा गुजरातेतील ज्येष्ठ खासदार किंवा मित्रपक्षांपैकी एखादा दावेदार असू शकतो.
Modi Govt’s Jumbo Cabinet; Out of 71 ministers, 35 are freshers, 4 from TDP-JDU, 30 are cabinet ministers.
महत्वाच्या बातम्या
- नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा झाले भारताचे पंतप्रधान!
- सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनत मोदींची नेहरूंच्या रेकॉर्डशी बरोबरी; नड्डा, शिवराज, मनोहरलाल यांच्या मंत्रिपदी शपथविधीने भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची उत्सुकता वाढली!!
- Modi 3.0 : माध्यमांमधली पतंगबाजी सोडून सरकार नेमके काय आणि कसे बदलेल??, आर्थिक, सामाजिक अजेंडा कसा असेल??
- मणिपूरमध्ये वृद्धांच्या हत्येमुळे पुन्हा उसळला हिंसाचार; जिरीबाममधील 200 मैतेईंनी घरे सोडली
- महाराष्ट्रात पुढील 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा; विदर्भाला यलो, सिंधुदुर्गाला रेड अलर्ट, मराठवाड्यातही मुसळधार पावसाची शक्यता
- नितीश कुमार यांचा निर्धार, मी कायम मोदींसोबत असेन, भाषणानंतर पंतप्रधानांचे चरण स्पर्श करू लागले तेव्हा मोदींनी हात धरला