मुंबई : महायुती मधील वादामध्ये सुरुवातीला सहज सुटेल असा वाटणारा पण नंतर गले की हड्डी बनलेला नाशिक मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला. बऱ्याच भवती न भवती नंतर नाशिक मध्ये अखेर शिंदे यांचे गोडसेच आले. त्यामुळे एवढे सगळे करून हेमंत गोडसेंनाच उमेदवारी द्यायची होती, तर महायुतीतल्या नेत्यांनी एवढा घोळ का घातला?? चर्चेचे एवढे गुऱ्हाळ का चालवले??, असा सवाल आता नाशिककर विचारत आहेत. lokshabha candidate nashik hemant godse declared
शिवसेना – भाजप राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये नाशिकच्या जागेचा तिढा अक्षरशः काट्याचा नायटा झाला होता. सुरुवातीला नाशिकमध्ये हा वाद किरकोळीत सुटू शकेल, असे वाटत होते परंतु मध्यंतरी माझी उमेदवारी थेट मोदी आणि शाह यांनीच निश्चित केली आहे, असे सांगून छगन भुजबळांनी मोठी राजकीय राळ उडवली होती. त्यामुळे नाशिकच्या जागेमध्ये थेट मोदी आणि शाह यांनीच लक्ष घातले असल्याने महायुतीचे बाकीचे प्रदेश पातळीवरचे नेते बॅकफूटवर गेल्याचे भासले. छगन भुजबळ यांनी यानिमित्ताने नाशिकवर परत ग्रीप मिळवल्याचे चित्र काही काळ निर्माण झाले. परंतु तरी देखील छगन भुजबळांची उमेदवारी कुठलाच पक्ष जाहीर करेनासा झाला. कल्याण मध्ये जसे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी पुढे येऊन श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली होती, तसे आपल्या बाबतीत होईल, असा भुजबळांचा सुरुवातीला होरा होता. परंतु, महायुतीच्या नेत्यांनी भुजबळांना भरपूर वाट पाहायला लावली आणि अखेरीस भुजबळ यांनी स्वतःहून उमेदवारीच्या दाव्यातून आपली माघार जाहीर केली.
नाशिकमध्ये भाजप भाकरी फिरवेल असे याच काळात बोलले गेले होते. त्यामुळे अजय बोरस्तेंच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. अजय बोरस्ते साधारण 8 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना एकटेच जाऊन भेटले होते. त्यांची रात्री बैठक झाल्याची “गुप्त” बातमी नंतर फुटली होती. त्यामुळे नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंचाच उमेदवार असेल, पण तो अजय बोरस्ते यांच्या रूपाने कधीतरी भाजपच्या मांडवाखाली जाऊन आलेला उमेदवार असेल, असे बोलले गेले. त्याला भाजपच्या प्रदेश पातळीवरील अति वरिष्ठांनी दुजोरा देखील दिला होता. परंतु भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री गिरीश महाजन नाशिक मध्ये आले त्यांनी छगन भुजबळ यांच्यासह बऱ्याच नेत्यांशी चर्चा केली. काहींची समजूत घातली, काहींकडून समजून घेतले.
प्रत्यक्षात बरीच भवती न भवती झाली. त्यात अंतर्गत नाराजी रुसवे फुगवे झाले, जे नावानिशी फारसे बाहेर येऊ शकले नाहीत. नाशिक मधल्या भाजपच्या तिन्ही आमदारांनी लोकसभेतील उमेदवार निवडीच्या वादापासून स्वतःला दूर ठेवले. या तिन्ही आमदारांची नावे माध्यमांनी चर्चेत आणली तरीसुद्धा स्वतः आमदारांनी उघडपणे कुठलेच मत व्यक्त केले नव्हते. भाजप आमदारांनी भाजपच्या प्रदेशश्रेष्ठींवर दबाव आणल्याच्या वाद बातम्या माध्यमांनी दिल्या. परंतु, त्याला फारसा कुठे आधार दिसला नाही. कारण भाजपच्या तिन्ही आमदारांची भाजपच्या प्रदेश पातळीवरच्या श्रेष्ठींवर दबाव आणण्याची कुठली स्थितीच नव्हती.
अशा परिस्थितीत जो काही दबाव किंवा परिस्थितीजन्य निर्णय घ्यायचा होता तो एकनाथ शिंदेंनाच घ्यायचा होता आणि एकनाथ शिंदेंनी अखेर आपले वजन विद्यमान खासदार हेमंत गोडसेंच्याच पारड्यात टाकले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी भाकरी फिरवली नसल्याची चर्चा नाशकात सुरू झाली. आता हेमंत गोडसे यांचा सामना त्यांचेच एकेकाचे शिवसेनेतले सहकारी आमदार राजाभाऊ वाजे यांच्याशी होणार आहे. पण या सगळ्यात हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी द्यायची होती, तर महायुतीतल्या नेत्यांनी चर्चेचा एवढा घोळ का घातला??, तिन्ही पक्षांनी उमेदवारी आपल्याकडे खेचून घेण्यासाठी एवढे का ताणून धरले??, असाच प्रश्न नाशिककरांच्या मनात उद्भवला.
lokshabha candidate nashik hemant godse declared
महत्वाच्या बातम्या
- IMF कडून पाकला 9 हजार कोटी रुपयांची मदत; भारताने तिसऱ्या हफ्त्याच्या बाजूने मतदान केले नाही
- ठाकरे आणि पवार त्यांच्या मुलांसाठीच फिरत असल्याची कबुली देत ठाकरेंची मोदींवर वखवखलेल्या आत्म्याची टीका!!
- मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा झटका, सहावेळा आमदार झालेले रामनिवास रावत यांचा भाजपमध्ये प्रवेश!
- “… पण असे असूनही दक्षिणेत भाजपच्या जागा वाढतील” ; राजीव चंद्रशेखर यांचे विधान!